दिनांक 20 April 2018 वेळ 10:12 PM
Breaking News
You are here: Home » विशेष लेख (page 3)

Category Archives: विशेष लेख

निशाणा बीएसइएस वर; घायाळ डहाणू तालुका!

डहाणू थर्मल पॉवर प्रकल्पाला जखडून ठेवण्यासाठी डहाणू ग्रीन झोनची मोर्चेबांधणी भाग ७ वा : बुरे दिन सुरु झाले ! निशाणा बीएसइएस वर; घायाळ डहाणू तालुका! पर्यावरणावादाचा बुरखा पांघरुन डहाणूच्या भल्याची सुपारी घेतलेल्या दलालांनी बीएसइएसच्या डहाणू थर्मल पॉवर प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात विरोध करणे असफल झाल्यानंतर किमान हा प्रकल्प मर्यादेत ठेवण्याच्या व्युहरचनेची आखणी केली. राज्य व केंद्र सरकारांनी ... Read More »

डहाणुतून 3.7 लाख टन खेकडे, पॉपलेट व इतर माश्यांची मासेमारी?

डहाणुतून रोज 1233 टन चिकु उत्पादित होत होता? डहाणुतून 3.7 लाख टन खेकडे, पॉपलेट व इतर माश्यांची मासेमारी? हे पर्यावरणवादी आहेत की फेकाडे? भाग 6 वा : खोटी आकडेवारी सादर करुन फसवणुक डहाणू थर्मल पॉवर प्रकल्पाविरोधातील लढाईचा सर्वोच्च न्यायालयात शेवट झाला असे वाटत असले तरीही पर्यावरणवादी डहाणूची भलतीच चिंता वहात होते. राज्य व केंद्र सरकारची डहाणूचे वाट्टेल तसे 12 वाजवायची ... Read More »

मुंबईच्या गरजेचे थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी डहाणूचा बळी दिला!

मुंबईच्या गरजेचे थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी डहाणूचा बळी दिला! भाग 5 वा : उद्योगबंदीचे 91 नोटिफिकेशन आले   आता अवलोकन करता असे लक्षात येते की, राज्य सरकारने येथे थर्मल पॉवर प्रकल्प उभारायला जुलै 1988 मध्ये तत्वत: मान्यता देताना व केंद्र सरकारकडुन मान्यता मिळवतानाच डहाणू तालुक्याच्या उद्योगबंदीची भुमिका स्विकारली होती. त्या अनुषंगाने 24 सप्टेंबर 1988 रोजी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने उद्योग ... Read More »

थर्मल पॉवर प्रोजेक्टचे विरोधक न्यायालयीन लढाईत तोंडावर आपटले होते

थर्मल पॉवर प्रोजेक्टचे विरोधक न्यायालयीन लढाईत तोंडावर आपटले होते भाग 4 : न्यायालयीन लढाईविषयी ) डहाणू थर्मल पॉवर प्रोजेक्टला राज्य व केंद्र सरकारांनी परवानगी दिल्यानंतर लगेचच 1989 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात बीएसइएसच्या या प्रस्तावित प्रकल्पाच्या विरोधात बॉम्बे एन्वॉयरोन्मेन्ट ऍक्शन गृप या मुंबईतील गृपने याचिका (क्र. 4550/1989) दाखल केली. पाठोपाठ डहाणू तालुका एन्वॉयरोन्मेन्ट वेल्फेअर असोसिएशन नावाने काही लोकांनी याच विषयाची याचिका ... Read More »

मुंबईच्या झगमगाटासाठी डहाणूत आले थर्मल पॉवर स्टेशन

मुंबईच्या झगमगाटासाठी डहाणूत आले थर्मल पॉवर स्टेशन भाग 3 : उद्देश पर्यावरणाचा की घेतलेली सुपारी निभवण्याचा मुंबई महाप्रदेशात विज निर्मीती व वितरण क्षेत्रात 2 कंपन्या कार्यरत होत्या. त्यातील खुद्द मुंबईत टाटा पॉवर ली. तर मुंबई उपनगरात बॉम्बे सबअर्बन इलेक्ट्रीक सप्लाय (बीएसइएस) कं. ली. विज वितरण करीत होते. टाटा पॉवर स्वत:च विज निर्मीती करीत होते. तर बीएसइएस टाटा पॉवर कडुन विज ... Read More »

डहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे?

डहाणूचे भवितव्य घडविणारे / बिघडविणारे नोटिफिकेशन नेमके काय आहे? भाग 2 : असे आहे नोटिफिकेशन संजीव जोशी (दैनिक राजतंत्र च्या दिनांक १४ जुलै २०१५ रोजीच्या अंकात प्रसिद्ध): डहाणू हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील बहुतांशी लोकांना 20 जून 1991 रोजीचे केंद्र सरकारचे नोटिफिकेशन माहीत नाही. त्यापासूनचे फायदे व तोटे देखील माहित नाही. बहुतांश लोकांनी ते कधीही वाचलेले नाही. आता तर ... Read More »

भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा!

भरकटलेल्या पर्यावरणवादाने घोटला डहाणूच्या विकासाचा गळा! दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि वरदान? 20 जून डहाणूसाठी काळा दिवस कि उत्सव? भाग 1 : प्रास्ताविक गेल्या काही दिवसांपासून दैनिक राजतंत्रतर्फे डहाणूच्या विकासाच्या मुद्द्यावर काही प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. विकासाच्या मुद्द्यावर विविध अंगाने चर्चा व्हावी हा या मागचा हेतु होता. दिनांक 20 जून 1991 रोजीचे नोटिफिकेशन डहाणूसाठी शाप कि ... Read More »

प्रश्‍न मराठीच्या अस्तित्वाचा -प्रा. प्रदिप पाटील

जेव्हा जेव्हा मराठी भाषा दिन जवळ येतो तेव्हा तेव्हा भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न मराठी मानसाच्या मनात उगवतो. मराठीच्या अस्तित्वाच्या काळजीचा हा हँहओव्हर फार काळ टिकून राहत नाही. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाचा भाषिक अस्मितेच्या अंगाने अत्यंत वरवरचा, ढोबळ विचार करणारा पण संख्येने अधिक असलेला एक गट तर तिच्या अस्तित्वाचा, स्वरुपाचा अत्यंत गांर्भियाने चिंतन-मननाच्या अंगाने मूलभूत स्वरुपाचा विचार करणारा दुसरा गट. मराठीच्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाचा ... Read More »

मराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे

मराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने हा खरे पाहता एका लेखाचा विषय नसून स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकेल याबद्दल शंका नाही. प्रस्तुत विषयाचा पसारा लेखात मांडताना अनेक घटकांचा केवळ नामोल्लेख करून, तर काहांना  ओलांडून पुढे जावे लागण्याची शक्यता आहे. प्रस्तुत लेखाची ही मर्यादा सुरुवातीलाच मान्य करावी लागेल. अलीकडील काळात भाषिक आस्मता हा त्या त्या भाषिक समाजाचा जिव्हाळ्याचा विषय ठरू पाहात ... Read More »

घरच्या भाषेतून का शिकायचे ? -नीलेश निमकर, शिक्षणतज्ज्ञ

मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांची घटती संख्या हे शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाचा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढ झपाट्याने होते आहे. या शाळानी मराठी माध्यमाच्या शाळांपुढे मोठेच आव्हान उभे केले आहे. टाय बूट असणारा गणवेश, जायला यायला स्कूल बस सारख्या सोयी, शाळेत साजरे केले जाणारे विविध दिवस अशा अनेक क्लुप्त्या वापरून या शाळा ... Read More »

Scroll To Top