दिनांक 23 January 2018 वेळ 3:15 AM
Breaking News
You are here: Home » विशेष लेख (page 2)

Category Archives: विशेष लेख

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात असंतोष

WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1

डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर 2017 रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविण्यात आल्याने पूर्ण निवडणूक कार्यक्रमाचा बोजवारा उडला आहे. लोकांना ऑनलाईन प्रक्रीयेबाबत पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने नगरसेवकपदासाठी एकही अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकला नाही. राजकीय पक्षांनी कसरत करुन उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेतले असले तरी अनेक पक्षीय उमेदवारांना या गोंधळाचा फटका बसला व ... Read More »

डहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा ! विशेष लेख, भाग 3 – संजीव जोशी

IMP (8)

भ्रष्ट्राचाराच्या विळख्यात, डहाणू नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना! डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रमिला पाटील यांच्या कार्यकाळात स्वच्छ महाराष्ट्र अभियान व घनकचरा व्यवस्थापनासाठी 14 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेला निधी डहाणू नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील घोटाळा दाबण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीतून डहाणू शहरातील समुद्रकिनार्‍यावर व अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधता आली असती आणि डहाणू नगरपरिषदेवर शाळांची स्वच्छतागृहे लोकांना उपलब्ध करुन देण्याची वेळ आली नसती. ... Read More »

डहाणू नगरपालिका; दिशा आणि दशा! वशेष लेख, भाग 2 : -संजीव जोशी

facebook_1506002192949

योजनेवरील खर्च 6 कोटी रुपयांनी वाढविल्यामुळे डहाणू नगरपरिषद दिवाळखोरीत गेली. वर्षभराचे स्वत:चे एकूण उत्पन्न (घरपट्टी, पाणीपट्टी) 5 कोटी 96 लक्ष 9 हजार 848 रुपये पेक्षा कमी असल्याने व त्यातून दिवाबत्ती, पाणीपुरवठा, कचरा सफाई अशी विविध कामे करावी लागत असल्याने डहाणू नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडात होता. त्यामुळे डहाणू नगरपरिषदेला स्वत:च्या हिश्याचे 5 कोटी 96 लक्ष 9 हजार 848 रुपये देता न आल्याने ... Read More »

डहाणू नगरपरिषद 2017 निवडणूक वार्तापत्र – संजीव जोशी

facebook_1506002192949

डहाणू नगरपरिषदेच्या दिनांक 13 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष आणि 25 नगरसेवकपदासाठी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शनिवार, 18 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही सर्वच पक्ष एकमेकांचा अंदाज घेऊन आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवणे पसंत करताना दिसत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर असून 22 नोव्हेंबरपासून पक्षांना आपले पत्ते उघड करावे लागतील असा अंदाज आहे. सर्वच पक्षांत आयाराम ... Read More »

राज्यातील नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत पारदर्शकतेला फाटा?

LOGO 4 Online

वैभव पालवे पालघर, दि. 12 : राज्यातील तीन नवनिर्मित नगरपरिषदा व 125 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या 2 नोव्हेंबरला झालेल्या आरक्षणाच्या सोडतीत नगरविकास खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पारदर्शकतेलाच फाटा दिल्याचे उघड होत आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने नवनिर्मिती नगरपंचायती, नगरपरिषदा व डिसेंबरमध्ये मुदत पूर्ण होत असलेल्या नगरपंचायती व नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम लागण्यापूर्वी नगराध्यक्षपदाचे जातीनिहाय व महिलांकरिता आरक्षणाची सोडत काढणे आवश्यक होते. त्यानुसार नगरविकास विभागाने ... Read More »

वाड्यात शिवसेना-भाजपचा कस लागणार

WADA NAGARPANCHAYAT LEKH KARYALAY

वैभव पालवे वाडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागलेत. त्यात प्रथमच नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट पध्दतीने होत असल्याने अनेक कार्यकर्ते गुढग्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, वाडा ग्रामपंचायतीमध्ये गेली दहा वर्ष सलग सत्तेत असलेल्या शिवसेना – भाजप युतीला वाडा शहरात कोणतीच विकासकामे करता आली नाहीत. नागरी समस्यांत दिवसागणिक वाढ होत गेल्याने नागरिक त्रस्त झालेत. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांवर ... Read More »

माधवराव काणे,आदिवासींचे मसीहा

IMG-20170929-WA0021

हा लेख आज लिहण्या मागचा उद्देश म्हणजे आज दसरा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पवित्र मुहूर्त व आजच्या दिवशीच शस्त्र पुजन नविन कार्यारंभ होत असतो. मी ज्यांच्याविषयी लिहीत आहे ते तर आमच्या वैचारीक बैठकीचे अधिष्ठान असून सामाजीक विचारांच्या जडण-घडणीतील एक शास्त्रशूद्ध तत्वज्ञान आहेत आणि म्हणून त्यांचं पुजन होणे गरजेचे आहे आणि तेही दसरा मुहूर्तावर होणे म्हणजे दुग्ध-शर्करा योग होय.       ... Read More »

वाडा नगरपंचायत निवडणुकीचे वाजू लागले पडघम

LOGO 4 Online

वैभव पालवे वाडा, दि. 8 : वाडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन सुमारे पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे लवकरच निवडुका लागण्याची चिन्हे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत असताना सत्तेवर असलेल्या शिवसेना – भाजप युतीमध्ये सध्या बेबनाव असून हे दोन्ही पक्ष स्वबळाचीच भाषा करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागलेल्या भारतीय जनता पक्षाचे गेल्या काही ... Read More »

जागतिक स्तनपान सप्ताह

BREAST FEEDING DAY

जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट या सप्ताहात साजरा केला जातो. डब्लूएचओ युनिसेफ (थकज णछखउएऋ), अशा जागतिक स्तरांवरच्या आरोग्य विषयात काम करणार्‍या अनेक संस्था एकत्र येऊन हा सप्ताह साजरा करतात. अर्थात स्तनपानासाठी स्त्रियांना मानसिक व शारिरिक दृष्ट्या सशक्त बनविने हे या वर्षाचे ध्येय आहे. बालक जन्मानंतर पहिले वर्ष हे अतिशय महत्वाचे असते. म्हणुन मातेचा आहार हा महत्वपुर्ण असतो. ... Read More »

सरकारच्या उदासीन धोरणामुळे रोजगार हमी योजनेचा बोजवारा

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी मोखाडा, दि. २९ : केंद्रीय अर्थसंकल्पात ४८ हजार कोटींची भरघोस तरतूद केली असा प्रचंड गाजावाजा केला असला तरी राज्यातील रोजगार हमी योजनेचा मात्र पुरता बोजवारा उडाला आहे.  मोखाड्यासारख्या दारिद्र्याने गांजलेल्या कुपोषणग्रस्त तालुक्यात आदिवासी मजुरांना रोजगार हमीवर काम देण्यांत आणि त्यांनी केलेल्या कामाची मजुरी देण्यांत सरकारचा पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या भागात महिन्याला सरासरी  ४  मनुष्य दिवस सुद्धा काम उपलब्ध ... Read More »

Scroll To Top