दिनांक 21 September 2019 वेळ 5:51 AM
Breaking News
You are here: Home » विशेष लेख

Category Archives: विशेष लेख

भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली

भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ आणि अंगणवाडीच्या जनक ताराबाई मोडक यांची आज १२७ वी जयंती. ताराबाईंची शिक्षणक्षेत्रातील समज काळाच्या १०० वर्षे पुढे होती असे आता स्पष्ट झाले आहे. ज्या ज्ञानरचनावादाचा आज बोलबाला सुरु झाला आहे त्या ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा आग्रह ताराबाईंनी स्वातंत्र्यपूर्व काळातच धरला होता. आज स्वातंत्र्याची पंचाहत्तरी जवळ येत असताना अजूनही आपण या शिक्षणपद्धतीचा म्हणावा तसा उपयोग केलेला दिसत नाही. ताराबाई आणि ... Read More »

चालते बोलते विद्यापीठ म्हणजे संतश्रेष्ठ गाडगे महाराज..!

महामानवांचा जन्म हा स्वत:साठी नसतोच. जगाच्या कल्याणातच त्यांची विभूती असते, हा देह अखंड चंदनापरी समाजासाठी झिजवून आपल्या सुगंधाने समाज सुगंधी करत असतो, हाच त्यांचा जीवनधर्म असतो. त्यांच्या अंगावर राजवस्र नसतात, हातात सोन्याचांदीचे कडे नसतात, तर निःस्वार्थ सेवेचे कंकण असते. रंजल्या गांजल्यासाठी वात्सल्य ओसंडून वाहणारा एकच त्यांचा चेहरा असतो. समृद्ध समाज घडवण्याकरिता आयुष्यभर समाजातील तळागाळातील अंध, अपंग, रोगी, निराश्रित, दिन दुबळ्या ... Read More »

कास पठारावर गवसलेले बालपण

या सहलीत सामील झालो नसतो तर ती चूक ठरली असती असे प्रत्येकाला वाटले. ही सहल म्हणजे एक मेडीटेशनच होते. जे सहलीत आले नाहीत त्यांनाही ते न आल्याची रुखरुख नक्कीच वाटेल. सर्गसौंदर्याने नटलेल्या, मिनी माथेरान म्हणून ओळख असलेल्या जव्हार मध्ये माझे प्राथमिक शिक्षण झाले. जव्हार मध्ये एसएससी पर्यंतचे शिक्षण घेणारे आम्ही तीस-पस्तीस मित्र-मैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात असतो. यातले काहीजण अजून परस्परांना भेटू ... Read More »

पालघर जिल्ह्यातील बित्तमबातमी साठी दैनिक राजतंत्रचे APP उपलब्ध!

⭕ पालघर जिल्ह्यातील बातम्या आता एका Click वर! दैनिक राजतंत्रचे App आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेत हजर करीत आहोत. हे App …  Google Play Store वर उपलब्ध आहे. आपण ते तेथून Download करु शकता किंवा खालील Link वरुन Download करु शकता. https://play.google.com/store/apps/details?id=com.rajtantra आपला स्नेहांकित संजीव जोशी संपादक – दैनिक राजतंत्र Share on: WhatsApp Read More »

हे परमेश्वरा! मतमोजणीचा खरा आकडा बाहेर पडू दे!

राजतंत्र न्यूज नेटवर्क : पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया २८ तारखेला एकदाची पार पडली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली याआधी पार पडलेल्या डहाणू, जव्हार व वाडा नगरपालिकांच्या निवडणूकीत झालेल्या गोंधळामुळे निवडणूका लांबणीवर पडण्याची नामुष्की ओढवली होती. कॉंग्रेसचे सईद शेख व राष्ट्रवादीचे राजेंद्र माच्छी यांना छाननीत बेकायदेशीरपणे अपात्र ठरवून निवडणूकीच्या ... Read More »

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर

नाविद शेख                  मनोर, दि. १३ :  जानेवारी महिन्यात दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे आकस्मिक निधन झाल्याने रिक्त झालेल्या पालघर लोकसभेची पोटनिवडणूक २८  मे रोजी होत आहे.एकमेकांच्या उमेदवारांची पळवापळवी झाल्याने ही  पोटनिवडणूक लक्षवेधी ठरली आहे.सर्व प्रमुख पक्षानी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चौरंगी होणार हे निश्चित असून भाजप आणि बविआमध्ये चुरस असल्याचे दिसून ... Read More »

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात

बोईसर            दि. २९: येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने भाजपला पाठिंबा न देता रिंगणात उमेदवार उतरवायचा ठरविल्यास भाजपसमोर पराभवाची छाया अधिक गडद होऊ शकते. असे असले तरी शिवसेनेला उमेदवार उभा करणे आणि निवडून आणणे म्हणजे सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी असा प्रकार ठरणार ... Read More »

बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

बोईसर, दि. २१ : स्वच्छ व सुंदर शहर कोणाला नकोय. मात्र वाढत्या नागरिकरणातून निर्माण होणारे प्रश्न सोडविणे ग्रामपंचायतसारख्या मर्यादित अधिकार, अपूरा निधी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवाक्याबाहेरचे बनले आहेत. त्यामुळे  बोईसर व त्या लगतच्या  परिसरातील   कचऱ्याचा प्रश्न  गहन बनला आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राउंड नसल्याने कचरा नेमका टाकावा कुठे? यावरून परिसरातील ग्रामपंचायतींचे आपसात वाद उभे ठाकलेत. त्यामुळे ... Read More »

जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे 3 बळींची जबाबदारी कोण घेणार?

विशेष संपादकिय जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, डहाणूच्या समुद्रकिनार्‍यावर प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडून 3 महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा बळी गेला. आपण सर्व बचाव कार्य जवळपास पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी आलात. त्यावेळी आपण माध्यमांशी बोलताना ही मुले सहलीसाठी आली होती असे वक्तव्य केलेत. या बाबत तेथे उपस्थित माजी नगरसेवक तथा वकील धनंजय मेहेर यांनी आपणास ही मुले सहलीसाठी आली नसून ... Read More »

अदिवासी विकास मंत्रीजी, विकासाचे असे मॉडेल स्विकारा!

विशेष संपादकीय पालघर जिल्हा निर्माण होऊन, केंद्रात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी बसून, राज्यात मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसजी विराजमान होऊन आणि पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आपल्या हाती येऊन 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता 2 वर्षांपेक्षा कमी सत्ताकाळ उरला आहे. त्यानंतर पुन्हा निवडणूका येणार आहेत. मोदी लहर आजही टिकून असल्याचे संकेत मिळत असले तरी तुम्हाला तुमच्या कामाच्या जोरावर येत्या निवडणूकीत मते मागता आली ... Read More »

Scroll To Top