दिनांक 19 February 2019 वेळ 4:56 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या (page 8)

Category Archives: संग्राह्य बातम्या

डहाणू : नगरसेवक व नागरिक यांच्यात संवादाचा कार्यक्रम

शिरीष कोकीळ दि. 1 : येत्या डिसेंबरमध्ये होणार्‍या डहाणू नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुका विकास परिषदेने आयोजित केलेल्या आजी माजी नगरसेवक व नागरिक यांच्यातील संवाद कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना बिनधास्त प्रश्‍न विचारावेत, असे आवाहन करण्यात आले होते. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या नियोजित डहाणू तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे ... Read More »

व्यवस्था समजून घेण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणे आवश्यक! -संजीव जोशी

दि. १६: लोकशाही व्यवस्था समजून घेण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणे आवश्यक असल्याचा सल्ला दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी एफ. वाय. बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांशी बोलताना दिला. पोलीस अटक केल्यानंतर थर्ड डिग्रीचा वापर करून पोलीस कोठडीमध्ये मारहाण करतात हा लोकांचा गैरसमज आहे; असे केल्यास पोलिसांवर देखील गुन्हा दाखल होतो. पोलीस हातकडी घालू शकत नाही; त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होते व पोलिसांवर ... Read More »

ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्ञानसमृद्ध नागरिक – संजीव जोशी

शिरीष कोकीळ डहाणू दि. ४: ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयोवृद्ध नागरिक नव्हे तर ज्ञानसमृद्ध नागरिक असतात. अशा वडीलधाऱ्या श्रेष्ठ नागरिकांशी भारतीय संविधान या विषयावर संवाद साधताना माझी उर्जा वाढेल आणि माझ्या ज्ञानात भरच पडेल असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना काढले. डहाणूच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजीत ‘ भारतीय संविधान व तिची बलस्थाने ‘ ... Read More »

डहाणू : बिपीन लोहार यांच्यावर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

दि. ०१: येथील लघु उद्योजक बिपीन लोहार यांच्याविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिपीन यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. २८ सप्टेंबर रोजी दुपारी बिपीन यांच्या फॅक्टरीमध्ये आपल्याला मारहाण झाली असून विनयभंग केल्याचा पिडीत महिलेचा आरोप आहे. या बाबत फिर्याद दाखल झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी बिपीन यांना अटक करण्यात आली. अटक ... Read More »

केशव अर्जुन राऊत विद्यामंदिरात शिक्षण हक्कावर व्याख्यान

दि. २९: डहाणू तालुक्यातील वरोर येथील प्रगती शिक्षण संस्था संचलीत केशव अर्जुन राऊत विद्यामंदिरात ९ वी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचे ‘भारतीय संविधान व शिक्षणाचा घटनात्मक हक्क’ या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. यावेळी नूतन बाल शिक्षण संघाचे संचलन समिती सदस्य सुधिर कामत, सामाजिक कार्यकर्ते विनीत पाटील, शाळेचे मुख्याद्यापक मोरे व शिक्षकवर्ग उपस्थित होते. Share on: WhatsApp Read More »

संविधानाचा संबंध मानवी जीवन व्यवहाराशी ज्येष्ठ विचारवंत सुभाष वारे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी वाडा, दि. २७ : भारतीय संविधान हे केवळ कलमांचे पुस्तक नाही. त्याचा संबंध संसदेशी अथवा सर्वोच्च न्यायालयाशीच  आहे असा सर्वसामान्यांचा समज आहे. संविधान हे निव्वळ देशात सत्ता स्थापण्यासाठी नाही तर मानवी जीवन व्यवहार उन्नत करण्यासाठी,  नीतिमान समाज घडविण्याशी त्याचा संबंध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सुभाष वारे यांनी वाड्यात केले.       येथील  राष्ट्र सेवा दलाच्या शाखेच्यावतीने  समाजात भारतीय ... Read More »

विद्यार्थी दशेतच घटनात्मक अधिकार समजून घ्या! -संजीव जोशी

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. २२: विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेतानाच भारतीय संविधान समजून घेणे गरजेचे असून आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव झाल्याने उद्याचे सक्षम नागरिक बनण्यास मदत होईल असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी बोरीगाव येथे बोलताना केले. पूज्य आचार्य भिसे शिक्षण संस्थेच्या सभागृहात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डहाणू तालुक्यातील नूतन बाल शिक्षण संघाच्या कोसबाड येथील विकासवाडी ... Read More »

माणूस म्हणून जगण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणे आवश्यक -संजीव जोशी

डहाणू, दि. 19 : माणूस म्हणून जगण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणे अत्यंतिक आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथील रोटरी सभागृहात बोलताना केले. ते रोटरी क्लब ऑफ डहाणू व नूतन बाल शिक्षण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष राकेश सरवैया, सचिव संजय ... Read More »

विकासवाडी येथे भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान संपन्न

मोहन राणे/राजतंत्र न्यूज नेटवर्क विकासवाडी, दि. 16 : प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. राज्यघटनेद्वारे प्राप्त मूलभूत अधिकार व कर्तव्ये समजून घेऊन सक्षम नागरिक बनावे आणि भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी हातभार लावावा, असे विचार ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी विकासवाडी येथे बोलताना व्यक्त केले. नूतन बाल शिक्षण संघ संचलित विकासवाडी अध्यापक विद्यालयाच्या हिरक महोत्सवी ... Read More »

शिक्षणाचा हक्क देण्यात आपला देश दिडशे वर्षे मागे! ˆ- संजीव जोशी

शिरिष कोकीळ डहाणू प्रतिनिधी, दि. 03: बालकांना शिक्षणाचा हक्क देण्यामध्ये आपण दिडशे वर्षे मागे असून जो कायदा ब्रिटनमध्ये 1980 साली आला, त्यासाठी भारतात 2009 साल उजाडावे लागले अशी खंत व्यक्त करुन शिक्षणाचा हक्क व त्यासंबंधातील कायदा याकडे नकारात्मक नजरेने न पहाता हा कायदा अधिक सुदृढ करुन शिक्षणाचा हक्काची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सामाजिक जबाबदारी आपण पार पाडली पाहीजे असे विचार ज्येष्ठ ... Read More »

Scroll To Top