दिनांक 20 August 2018 वेळ 9:27 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या (page 7)

Category Archives: संग्राह्य बातम्या

विकासवाडी येथे भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान संपन्न

BHARTIY RAJYAGHATNA VYAKHYAN

मोहन राणे/राजतंत्र न्यूज नेटवर्क विकासवाडी, दि. 16 : प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. राज्यघटनेद्वारे प्राप्त मूलभूत अधिकार व कर्तव्ये समजून घेऊन सक्षम नागरिक बनावे आणि भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी हातभार लावावा, असे विचार ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी विकासवाडी येथे बोलताना व्यक्त केले. नूतन बाल शिक्षण संघ संचलित विकासवाडी अध्यापक विद्यालयाच्या हिरक महोत्सवी ... Read More »

शिक्षणाचा हक्क देण्यात आपला देश दिडशे वर्षे मागे! ˆ- संजीव जोशी

SHIKSHAN HAKK KAYDA (2)

शिरिष कोकीळ डहाणू प्रतिनिधी, दि. 03: बालकांना शिक्षणाचा हक्क देण्यामध्ये आपण दिडशे वर्षे मागे असून जो कायदा ब्रिटनमध्ये 1980 साली आला, त्यासाठी भारतात 2009 साल उजाडावे लागले अशी खंत व्यक्त करुन शिक्षणाचा हक्क व त्यासंबंधातील कायदा याकडे नकारात्मक नजरेने न पहाता हा कायदा अधिक सुदृढ करुन शिक्षणाचा हक्काची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सामाजिक जबाबदारी आपण पार पाडली पाहीजे असे विचार ज्येष्ठ ... Read More »

डहाणूतील पक्षांतर करणार्‍या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाईचा बडगा?

दि. 31 ऑगस्ट : डहाणू नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवून नगरसेवक झालेल्या मिहीर शहा व अन्य 2 नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्रतेची कारवाई व्हावी याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सक्षम प्राधिकरणाकडे याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालघर जिल्ह्यातील नेते आमदार आनंद ठाकूर यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांच्यासह प्रकाश माच्छी ... Read More »

लॉयन्स क्लब ऑफ डहाणूच्या अध्यक्षपदी राजेश पारेख

Lions

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणू, दि. 23 जुलै : 2017-18 वर्षासाठी लॉयन्स क्लब ऑफ डहाणूच्या अध्यक्षपदी राजेश पारेख यांची निवड करण्यात आली आहे. लॉयन्स क्लबचे पास्ट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गोविन्दजी सिघानिया यांनी त्यांना पदाची शपथ दिली. दशाश्री माळी समाज हॉल येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात राजेश पारेख व त्यांच्या सर्व टिमला सिंघानीया यांनी अतिशय रंजक पद्धतीने शपथ दिली. मावळते अध्यक्ष दिनेश रॉय ... Read More »

नवी दिल्ली : डहाणू तालुक्याच्या विविध प्रश्‍नांवर शिष्टमंडळाने घेतली खासदार वणगांची भेट

sanjeev

राजतंत्र न्युज नेटवर्क दिल्ली, दि. 23 : डहाणू तालुक्यावर केंद्र सरकारने 20 जून 1991 च्या अधिसुचनेद्वारे उद्योगबंदी लादली आहे. एकीकडे डहाणूचा विकास रोखून धरला जात असताना, दुसरीकडे स्थानिकांचा विरोध डावलून वाढवण बंदरासारखे महाकाय प्रकल्प, विविध समांतर महामार्ग, रेल्वेमार्ग असे प्रकल्प जाहिर केले जात आहेत. यातुन डहाणू तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या नेतृत्वाखाली ... Read More »

अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला! डहाणू तालुक्यातील 2 महिला ठार

DAHANU-DAHASHATWADI HALLA Main-Thakre

राजतंत्र मिडीया नेटवर्क डहाणू, दि. 11 : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी रात्री अमरनाथ दर्शन करुन परतणार्‍या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 7 जण ठार झाले असुन यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दोन महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या 14 जणांपैकी 7 जण डहाणूतील रहिवासी आहेत. उषा मोहन सोनकर (डहाणू शहर) व निर्मला भारत ठाकूर (आशागड) असे मृत्युमुखी पडलेल्या ... Read More »

वाणगावमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश! करणी काढण्यासाठी मागितलं होतं तरुणीचं काळीज

डहाणू, दि. 06 करणी काढण्याच्या नावाखाली किराणा दुकान मालकाकडून 5 लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 भोंदूबाबांना वाणगाव पोलीसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे करणी काढण्यासाठी या भोंदूबाबांनी तरुणीचं काळीज मागितल्यानेे दुकानदारास संशय आल्याने या भोंदूबाबांचा पर्दाफाश झाला. देवनाथ मदारी, विजयनाथ मदारी आणि प्रभूनाथ मदारी अशी या भोंदूबाबांची नावे आहेत. ते गुजरातमधील हिमतनगर जिल्ह्यातील आहेत. खंबाळेंमधील किराणा दुकान मालक असलेल्या ... Read More »

जिल्ह्यातील भाजपच्या संघटना बांधणीसाठी काठोळे सरांचा सिंहाचा वाटा – नंदकुमार पाटील

वाडा, दि. 30 : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे यांचा 59 वा वाढदिवस भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक 30 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. वाडा तालुक्यातील नांदणी गायगोठा (कळंभई) येथील अरविंद स्मृति संचालित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी वृक्षाचे रोपटे देऊन काठोळे यांना शुभेच्छा दिल्या. सकाळी भारतीय ... Read More »

डहाणू : मद्यधुंद शिक्षकाचा शाळेसमोरच धिंगाणा

डहाणू, दि. 26 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत शाळेसमोरच धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (23 जून) दुपारी हा प्रकार घडला असुन स्थानिकांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढून समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणार व्हायरल होत आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी केंद्राअंतर्गत येणार्‍या जांबूगावमधील तलाईपाडा जिल्हा परिषद शाळेसमोर हा प्रकार घडला ... Read More »

डहाणू : केंद्र सरकारची 1991 ची अधिसू्चना शाप की वरदान? या विषयावर चर्चासत्र

DAHANU NOTIFICATION

दि. 20 : केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने 20 जून 1991 रोजी डहाणू तालुक्याला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील घोषित करणारी अधिसूचना काढून उद्योगबंदी लादलेली आहे. यामुळे तालुक्याचा विकास खुंटलेला असल्याची भावना निर्माण होत असून 20 जून हा काळा दिवस मानला जातो. एकीकडे तालुक्यावर बंधने लादली असताना इंडस्ट्रियल कॉरीडोर, वाढवण बंदर, विविध महामार्ग असे प्रकल्पही येऊ घातले आहेत. यातून विविध प्रकारे संभ्रम निर्माण ... Read More »

Scroll To Top