दिनांक 23 February 2018 वेळ 12:26 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या (page 3)

Category Archives: संग्राह्य बातम्या

बोईसर येथील कॅम्लिन कलर कंपनीने घेतली कलाध्यापकांची कार्यशाळा

cropped-LOGO-4-Online.jpg

विशेष प्रतिनिधी : कुडूस, दि. 18 : बोईसर येथील कॅम्लिन कोकियो कंपनीने रविवारी (दि.16) पालघर जिल्ह्यातील माध्यमिक कलाध्यापकांची कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी कंपनीच्या मालकांनी कलाध्यापकांना रंगांविषयी विशेष माहिती दिली. या कार्यशाळेसाठी पालघर जिल्ह्यातील 80 कलाध्यापक उपस्थित होते. कंपनीच्या वतीने सर्व शिक्षकांना विविध प्रकारचे रंग, ब्रश, कागद, सिस्पेन्सिल आदी साहित्य देवून रंगकाम करण्यास सांगितले. याच वेळी रंगांसंबंधी विशेष चर्चा ... Read More »

सोसायटी फॉर फास्ट जस्टीसचा 4 था वर्धापन दिन साजरा

cropped-LOGO-4-Online.jpg

राजतंत्र न्युज नेटवर्क डहाणूतील हॉटेल व्यावसायीक संतोष शेट्टी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सोसायटी फॉर फास्ट जस्टीस या सामाजिक संस्थेने आज चौथ्या वर्षात पदार्पण केले होते. त्यानिमीत्त आयोजीत कार्यक्रमासाठी फेडरेशन ऑफ सोसायटी फॉर फास्ट जस्टीसचे अध्यक्ष राज कचरु, माहिती अधिकारचे कार्यकर्ते अनिल गलगली, समाजसेविका अंजली दमानीया, फोरम फॉर फास्ट जस्टीसचे अध्यक्ष भगवानजी रयाणी यांच्यासह डहाणूतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी संस्थेचा ... Read More »

आदिवासी विकास: 12 लाखांची लाच घेतली अपर आयक्तांसह उपायुक्तांना अटक

cropped-LOGO-4-Online.jpg

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. 16 एप्रिल 2017: आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील अतिरिक्त आयुक्त मिलिंद भगवान गवादे (54) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यासह याच कार्यालयातील उपायुक्त किरण सुखलाल माळी (39) यांना 12 लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाच्या पालघर पथकाने काल शनिवारी रंगेहात अटक केली आहे. या दोघांविरोधात ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ... Read More »

पालघर जिल्हा कबड्डी प्रिमियर लीग स्पर्धेत साहेब किंग संघ ठरला विजेता

BOISAR KABBADI

प्रतिनिधी : दि. 13 : शिवतेज क्रीडा मंडळातर्फे आयोजित पालघर जिल्हा कबड्डी प्रिमियर लीग स्पर्धेत बोईसर येथील साहेबकिंग संघाने बाजी मारत प्रथम पारितोषिक पटकावले आहे. बोईसरच्याच शिवमल्हार संघाविरुद्ध झालेल्या अतितटीच्या अंतिम सामन्यात साहेबकिंग संघाने उत्कृष्ट खेळ खेळत चषकावर आपले नाव कोरले. तर डहाणू वॉरियर व शिवशक्ती वॉरियर मनोर या संघांना अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकवर समाधान मानावे लागले. शिवतेज क्रीडा ... Read More »

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू गुन्हे दाखल करण्याची संदीप पावडे यांची पालकमंत्र्याकडे मागणी

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 9 : तालुक्यातील देहर्जे येथील कल्याणी कुलदीप सांबरे या 26 वर्षीय महिलेचा प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावाने बोईसर येथील चिन्मय हॉस्पिटल येथे मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून महिलेच्या मृत्युस जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विक्रमगड भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संदीप पावडे यांनी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू ... Read More »

बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकार्‍यांना स्थानिकांनी हुसकावले

पालघर, दि. 5 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी पालघर तालुक्यातील पडघे गावात आलेल्या अधिकार्‍यांना येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावत सर्वेक्षण रोखले. याप्रकरणी गावातील 50 ते 60 ग्रामस्थांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सुमारे 98 हजार को टी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारने जपान सरकार सोबत करार केला असून जपानी कंपनीच्या ... Read More »

डहाणू : एस. आर. करंदीकर महाविद्यालयात राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा

ARTHSANKALP

पालघर, दि. 23 : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा ग्रामीण विकासाला चालना देणारा असुन शेती हा केंद्र बिंदू मानून दुष्काळमुक्ती आणी बळीराजाच्या सक्षमीकरणावर भर देणारा असल्याचे मत डहाणू येथील एस. आर. करंदीकर महाविद्यालयात आयोजीत कार्यक्रमात उपस्थित तज्ञांनी व्यक्त केले. या अर्थ संकल्पतील तरतुदीबाबत युवकांनी सजग राहून अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा असेही मत या मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनयाचे पालघर ... Read More »

बोईसर एमआयडीसीतील कंपनीमधुन तब्बल 10 कोटींचे ड्रग्स जप्त

BOISAR DRUGS

दि. 23 : बोईसर औद्यागिक परिसरातील एका कंपनीत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) छापा मारुन 10 कोटी रुपयांचे 238 किलो मेफोड्रोन नामक ड्रग्स जप्त केले असुन याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. ड्रग्सची तस्करी करणार्‍या या रॅकेटचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील रेनबो या रंग बनविणार्‍या कंपनीत हा छापा मारण्यात आला. मागील काही काळापासुन ही ... Read More »

आलेवाडी व नांदगावच्या पाणीपुरवठ्यात रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव

001

आलेवाडी व नांदगावच्या पाणीपुरवठ्यात रासायनिक सांडपाण्याचा प्रादुर्भाव RAJTANTRA MEDIA ONLINE TEAM बोईसर, दि. 8 : येथील आलेवाडी व नांदगाव ग्रामपंचायतीच्या मार्फत केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनजवळ औद्योगिक परिसरातील कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने या सांडपाण्याचा पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही गावांच्या नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. आलेवाडी व नांदगाव गावांना ... Read More »

मालगाडी घसरल्याने गुजरात-मुंबई मार्ग ठप्प

LOGO 4 Online

पालघर पश्चिम रेल्वेवर सफाळे रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे तीन डबे घसरल्याने गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहतूक पूर्वपदावर येण्यास तीन ते चार तास लागतील, असे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामुळे पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रखडपट्टी झाली आहे. सफाळे-सरतोडी रेल्वे पुलाजजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईच्या दिशेने येत असलेल्या मालगाडीचे तीन डबे ... Read More »

Scroll To Top