दिनांक 21 May 2019 वेळ 10:50 PM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या (page 10)

Category Archives: संग्राह्य बातम्या

वाणगावमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश! करणी काढण्यासाठी मागितलं होतं तरुणीचं काळीज

डहाणू, दि. 06 करणी काढण्याच्या नावाखाली किराणा दुकान मालकाकडून 5 लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 भोंदूबाबांना वाणगाव पोलीसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे करणी काढण्यासाठी या भोंदूबाबांनी तरुणीचं काळीज मागितल्यानेे दुकानदारास संशय आल्याने या भोंदूबाबांचा पर्दाफाश झाला. देवनाथ मदारी, विजयनाथ मदारी आणि प्रभूनाथ मदारी अशी या भोंदूबाबांची नावे आहेत. ते गुजरातमधील हिमतनगर जिल्ह्यातील आहेत. खंबाळेंमधील किराणा दुकान मालक असलेल्या ... Read More »

जिल्ह्यातील भाजपच्या संघटना बांधणीसाठी काठोळे सरांचा सिंहाचा वाटा – नंदकुमार पाटील

वाडा, दि. 30 : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे यांचा 59 वा वाढदिवस भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक 30 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. वाडा तालुक्यातील नांदणी गायगोठा (कळंभई) येथील अरविंद स्मृति संचालित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी वृक्षाचे रोपटे देऊन काठोळे यांना शुभेच्छा दिल्या. सकाळी भारतीय ... Read More »

डहाणू : मद्यधुंद शिक्षकाचा शाळेसमोरच धिंगाणा

डहाणू, दि. 26 : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत शाळेसमोरच धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (23 जून) दुपारी हा प्रकार घडला असुन स्थानिकांनी या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढून समाजमाध्यमांवर टाकल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणार व्हायरल होत आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी केंद्राअंतर्गत येणार्‍या जांबूगावमधील तलाईपाडा जिल्हा परिषद शाळेसमोर हा प्रकार घडला ... Read More »

डहाणू : केंद्र सरकारची 1991 ची अधिसू्चना शाप की वरदान? या विषयावर चर्चासत्र

दि. 20 : केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने 20 जून 1991 रोजी डहाणू तालुक्याला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील घोषित करणारी अधिसूचना काढून उद्योगबंदी लादलेली आहे. यामुळे तालुक्याचा विकास खुंटलेला असल्याची भावना निर्माण होत असून 20 जून हा काळा दिवस मानला जातो. एकीकडे तालुक्यावर बंधने लादली असताना इंडस्ट्रियल कॉरीडोर, वाढवण बंदर, विविध महामार्ग असे प्रकल्पही येऊ घातले आहेत. यातून विविध प्रकारे संभ्रम निर्माण ... Read More »

डहाणू : तालुक्यातील पहिली सीबीएसई स्कूल सज्ज शिक्षकांची कार्यशाळा व पालकांशी संवादसत्र संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. 16: डहाणू तालुक्यातील शैक्षणिक गरज ओळखून डहाणूचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मिहीर चंद्रकांत शहा यांच्या पुढाकाराने सुरु होत असलेली पहीली सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणारी सुसज्ज अशी क्रेडो वर्ल्ड स्कूल आता सर्वार्थाने सज्ज झाली आहे. या शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आज शाळा व्यवस्थापनाने संवाद साधला व 21 व्या शतकात जगाशी स्पर्धा करणारा विद्यार्थी घडविण्यासाठी आम्ही सक्षम ... Read More »

मुख्याध्यापकेने शौचालयाची टाकी साफ करुन दिले स्वच्छतेचे धडे

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. 16 जून: डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टोकेपाडा (घोलवड) येथील शाळेचे मुख्याध्यापक आज जिल्हा परिषद प्रशासनात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्याबरोबरच ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्याची किमया या मुख्याध्यापकांच्या कृतितून साध्य झाली आहे. दिपक देसले असे या स्वच्छतादूत शिक्षकाचे नाव आहे. आज टोकेपाडा येथील शाळेच्या दुसर्‍याच दिवशी दीड ते दोन महिन्यांच्या सुट्टीकाळात बंद असलेल्या शाळेच्या शौचालयाची ... Read More »

डहाणू : सरावली तलाठी अँटीकरप्शनच्या जाळ्यात

डहाणू, दि. 12 जून : डहाणू तालुक्यातील सरावली सजाचा तलाठी अनंत मडके याला हस्तकामार्फत 4 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सारणी सजाचा तलाठी असलेल्या मडकेकडे सरावली सजाचा अतिरिक्त कार्यभार होता. प्रत्यक्षात अंकित राठोड नावाचा खासगी इसम सरावलीचे सर्व व्यवहार पहात असे. फिर्यादी कल्पेश रामसिंग पटेल यांनी त्यांच्या सासर्‍यांच्या जमिनीचा फेरफार टाकण्यासाठी सरवली तलाठी सजा कार्यालयात ... Read More »

डहाणू : व्हॉट्सऍपवरुन धार्मिक विद्वेश पसरविणारा मॅसेज पाठविल्याप्रकरणी महिलेस पोलीस कोठडी

दि. 2 जून : डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रिती अक्रे यांना व्हॉट्सऍप सोशल मिडीयावरुन धार्मिक विद्वेश पसरविणारा मॅसेज पोस्ट केल्याच्या आरोपाखाली वाणगांव पोलीसांनी अटक केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. अक्रे यांना डहाणू येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जावेद मुलाणी यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी आरोपीची 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडी सुनावताच अक्रे या न्यायालयाच्या ... Read More »

तारापूर एमआयडीसीतील रासायनिक घनकचर्‍यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडण्याची भिती

वार्ताहर : बोईसर, दि. 29 : तारापूर औद्योगिक परिसरातील सम्प नंबर तीनमध्ये वर्षोनुवर्षांपासून साठलेला रासायनिक घनकचरा (गाळ) सीईटीपी व टिमातर्फे युद्धपातळीवर काम करुन काढण्यात आला आहे. मात्र या घनकचर्‍याची अद्याप व्हिलेवाट लावली नसल्याने पावसाळा सुरु झाल्यास हा घनकचरा नाल्याद्वारे वाहत जाऊन खाडी व समुद्रात मिसळल्यास प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तारापूर औद्योगिक परिसरात जवळपास ... Read More »

पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न!

ॠषितुल्य वा. ना. अभ्यंकर व संस्कृती संवर्धन मंडळ ठरले पहिले मानकरी राजतंत्र मिडीया नेटवर्क देशातील पहिल्या बालशिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक व त्यांचा बालशिक्षणाचा वारसा पुढे नेणार्‍या पद्मश्री अनुताई वाघ यांच्या नावे नूतन बाल शिक्षण संघाच्या वतीने जाहिर करण्यात आलेले स्मृती पुरस्कार स्व. ताराबाईंच्या जयंती दिनाचे (19 एप्रिल) औचित्य साधून पूणे येथे आयोजीत करण्यात आलेल्या एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आले. ... Read More »

Scroll To Top