दिनांक 06 April 2020 वेळ 3:44 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या

Category Archives: संग्राह्य बातम्या

पालघर जिल्हा पोलिसांमध्ये गटबाजी व कुरघोडी

पालघर जिल्ह्यामध्ये पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी होत असून परस्परांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत मजल जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी डहाणूला येऊन छापे मारतात आणि बोईसर युनिटचे अधिकारी वसई तालुक्यात जाऊन छापेमारी करतात. पोलिस अधिक्षकांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन युनिट मध्ये परस्परसंबंध नसल्याने ते परस्परांवर कुरघोडी करताना दिसतात. स्थानिक गुन्हे शाखांचे स्थानिक पोलिस स्टेशनशी देखील वाद असतात. यातून पोलिस पोलिसांचेच ... Read More »

महिला पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबार! पालघर जिल्ह्यात सुरक्षित कोण?

दि. 8.02.2020: जिल्हा पोलिस प्रमुख गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, काल ७ मार्च रोजी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नशीबाने त्यांच्यासह सर्व पोलिस सुरक्षित आहेत. पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला असतानाच जिल्ह्यात आता महिला सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आल्याने गौरव सिंग यांच्या ... Read More »

पोलीस गुटखा पकडतात कि पचवतात? जप्त केलेला गुटखा जातो कुठे?

पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास रोज किंवा दिवसाआड गुटख्याच्या गाड्या पकडल्या जातात. इतका गुटखा जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडला जात असताना जिल्ह्याभरात कुठेही सहजच गुटखा उपलब्ध होतो. तो देखील चोरीछुपे नाही, खुले आमपणे! कारण जप्त केलेला कोट्यावधी रुपयांचा गुटखा पुन्हा स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतो असा आरोप केला जात आहे. पोलीसच तो परस्पर विकतात, असा पोलिसांवर ... Read More »

पिंक लेक हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला की दरोडा टाकला?

एकीकडे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरवसिंग हे गुन्हेगारी क्षेत्राचे कंबरडे मोडण्याच्या भूमिकेत रेतीमाफिया, जुगाराचे अड्डे, दारुचे अड्डे, गुटखा तस्करी यांच्याविरोधात मोहीम राबवत असल्याचा देखावा केला जात असला तरी ते चित्र फसवे आहे. आणि त्यामुळेच त्यातून गुन्हेगारीवर कुठलीही जरब बसलेली नाही. या फसव्या कारवायांचा केलेला हा पर्दाफाश! पोलिसांचा छापा की दरोडा? पोलिसांनी 24 सप्टेंबर 2018 रोजी डहाणूतील हॉटेल पिंक लेक हॉटेलमध्ये ... Read More »

पालघर पोलिसांच्या छापेमारीच्या सोंगाचे पोस्टमार्टम

एफआयआर दाखल नसताना तुमचे पोलीस बेकायदेशीर छापा टाकतात! तुमच्या वरदहस्ताने हे होते का? वाचा याच पानावर! उद्या, 9 मार्च 2020 पर्यंत वाट पहा! पोलीस गुटखा पकडतात कि पचवतात? जप्त केलेला गुटखा जातो कुठे? पिंक लेक हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला की दरोडा टाकला? पालघर जिल्हा पोलिसांच्या कारवाया म्हणजे नुसतीच चिल्लाचिल्लम! कायदा सुव्यवस्थेचे काय? आमचा हा लेख अवश्य वाचा : “मिडिया” वाचकांनी ... Read More »

नरपडच्या ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

संजीव जोशी/डहाणू, दि. २८ : सर्व ग्रामपंचायतींना २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना मनोज सारंगधर इंगळे या प्रशासनाच्या लाडक्या ग्रामसेवकाकडे ३ ग्रामपंचायतींचा पदभार असल्यामुळे पर्यायी व्यवस्था न करता डहाणू तालुक्यातील नरपड ग्रामपंचायतीची सभा २६ जानेवारी रोजी न ठेवता ती २७ जानेवारी रोजी ठेवण्यात आली. दुपारी ३ वाजता मांगेला समाज सभागृहात सभा असल्याने लोक जमा झाले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ... Read More »

दैनिक राजतंत्रचे ” सोशल रिपोर्टर ” व्हा!

दैनिक राजतंत्र तर्फे आयोजित सोशल रिपोर्टींग कार्यशाळेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. (ज्यांनी आधीच पत्रकारितेची पदविका / पदवी घेतली आहे त्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता नाही) दैनिक राजतंत्र तर्फे आयोजित सोशल रिपोर्टींग कार्यशाळेसंबंधी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या:- एक दिवसीय (45 मिनिटांच्या 9 तासिका) सोशल रिपोर्टींग कार्यशाळा तुमच्या बातम्या www.rajtantra.com व दैनिक राजतंत्रच्या Android App वर तुमच्या नावाने प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची ... Read More »

मानद पत्रकार

डॉक्टर्, ॲडव्होकेट, सी. ए., इंजिनिअर, प्राध्यापक, प्रिंसिपल, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्थांतील पदाधिकारी यांचे मानद पत्रकारितेमध्ये स्वागत आहे. Read More »

राजतंत्र परिवाराचे सदस्य बना

आमच्या E Subscription योजनेचे सदस्य व्हा. आमचे Paid E Reader बना. आमच्या वाचकांच्या यादीत तुमचे नाव येवू द्या. राजतंत्र परिवाराचे सदस्य व्हा. त्यासाठी अवघे रुपये 500 भरुन आमच्या E Paper चे 3 वर्षांसाठी वर्गणीदार  व्हा. विनामूल्य उपलब्ध असलेल्या सुविधांचे पैसे अदा करुन आमचे Premium वाचक बना. तुम्हाला तुमच्या Email अथवा WhatsApp अथवा दोन्हीवरुन ताज्या बातम्या व PDF स्वरुपातील अंक उपलब्ध करण्याची सुविधा पुरविण्यात येईल.त्या मोबदल्यात 3 वर्षांच्या काळात, दैनिक राजतंत्रमध्ये रुपये 1000 मुल्याची (जाहिरात देते वेळी उपलब्ध दरपत्रकानुसार) कुठलीही जाहिरात एकदा विनामूल्य प्रसिद्ध करा! Read More »

दैनिक राजतंत्रच्या सोशल रिपोर्टींग कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्या !

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणारा मिडिया सशक्त आणि सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सोशल मिडियाची मोठी मदत होऊ शकते. त्याद्वारे प्रत्येक नागरिकाचा सहभाग उपयुक्त ठरु शकतो. यासाठी दैनिक राजतंत्र " सोशल रिपोर्टर " ही संकल्पना सादर करीत आहे. सोशल मिडियाचा वापर करणारा प्रत्येक जण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ठरु शकतो.त्यासाठी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. फेक न्यूजना आळा घालणे आवश्यक आहे. समाज आणि देश घडवण्यासाठी सोशल मिडियाचा वापर झाला पाहिजे. सोशल मिडिया आणि त्याचा वापर करणाऱ्यांची उर्जा आम्ही विधायक मार्गाने गेल्यास आपला देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करु शकतो. त्यासाठीच्या आमच्या योजनेत सहभागी व्हा! Read More »

Scroll To Top