दिनांक 14 November 2018 वेळ 11:14 PM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा (page 7)

Category Archives: पाठपुरावा

वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात ? नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली

प्रतिनिधी वाडा, दि. ५ : राज्य सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय घेतला असतानाच प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देशही देण्यात आलेले असूनही वाडा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक बंदीच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजवर केलेली नाही.   प्लास्टिक पिशवी बंदी बाबतचे फलक अथवा जनजागृतीद्वारे जनतेला त्याबाबतचे आवाहन करण्याचे साधे सोपस्कारही केले नसल्याने शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक बंदीचा  निर्णयच नगर ... Read More »

बोईसर : इमारतीतील असुविधांविरोधात आमरण उपोषण

Rajtantra_EPAPER_050418_4_050404

वार्ताहर           बोईसर, दि. ०४ : बोईसर जवळील मान-वारांगडे  येथील श्याम सागर डेव्हलपर व के. के. डेव्हलपर या बांधकाम व्यावसायिकाकडून उभारण्यात आलेल्या स्प्रिंग फिल्ड प्रोजेकट बिल्डींगमध्ये पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सुविधा उपलब्ध न करून दिल्याने याविरोधात येथील रहिवाशांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले             बोईसर पूर्वेतील मान- वरगंडेत भागात मोठ्या प्रमाणात ... Read More »

रस्त्याच्या कामामुळे वाहतूक सेवा ठप्प , ऐन परीक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची गैरसोय.

Rajtantra_EPAPER_050418_1_050428

प्रतिनिधी  जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील कोरतड ते लहान मेढा  रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू करण्यात आल्याने जव्हारहून देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा, आणि ओझरकडे येणारी एसटी बस सेवाअचानक बंद करण्यात आल्याने ऐन परिक्षेच्या हंगामात विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे.             जव्हार एसटी डेपोच्या देहेरे मार्गे डुंगाणी, मोर्चापाडा आणि ओझर या मार्गावरील बसेसमधून लहान मेढा, मोठा मेढा, पेरणआंबा, भागडा, ... Read More »

जव्हार : आदिवासी शेतकऱ्याची  कर्जाला कंटाळून केली आत्महत्या.

Rajtantra_EPAPER_050418_1_050412

प्रतिनिधी  जव्हार, दि. ०४ : तालुक्यातील हातेरी येथील धनजी विका जंगली (वय ६०) याच्यावर कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे या नैराश्यातून हातेरी गावातील त्यांच्या शेतात बुधवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे.             जंगली याने मागील वर्षी ठाणे बँक शाखा यांच्या शेतकरी सोसायटी मधून ४२ हजार २०७ रूपये कर्ज घेतला होते. मात्र ... Read More »

वाडा: गाळा कंपनीच्या कामगारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

Rajtantra_EPAPER_290318_1_100356 - Copy

प्रतिनिधी कुडूस, दि. २८: कुठलीही पूर्व सूचना न देता वेतनात अचानक कपात केल्याने संतापलेल्या गाळा कंपनीतील कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी तिसऱ्या दिवशीही कंपनीने दखल न घेतल्याने सुरूच आहे. वाडा तालुक्यातील मुसारने ग्रामपंचायतीच्या हद्दीत गाळा (होराबिगर) नामक कंपनी असून या कंपनीत कॉम्प्रेसर, व्हीलचे पाटे यांचे उत्पादन केले जाते. सुमारे ६०० कामगार या कंपनीत कार्यरत आहेत. याती नऊ ... Read More »

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्यायासाठी उंबरठे झिजवले

2

  राजतंत्र न्युज नेटवर्क        वाडा दि. २७: तयेथील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सांडपाण्यासंदभातील ढिसाळ नियोजनामुळे येथील दोन तरुण शेतकऱ्यांची सुपीक जमीन आज नापीक झाली असून या ठिकाणी दलदल, चिखल झाला आहे. या बाबत नगरपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनहीया सांडपाण्याच्या नियोजनाबाबत शासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करत नसल्याने हे शेतकरीहवालदिल झाले आहेत.   वाड्यातील आगरआळी येथे राहणारे गिरीश ... Read More »

कोका कोला कंपनीचे पाणी बंद करण्याची श्रमजीवी मागणी

प्रतिनिधी वाडा दि. २७ सद्दस्थितीत तालुक्यात भीषण पाणी टंचाई असताना कुडूस येथील कोकाकोला या शीतपेय बनविणाऱ्या कंपनी कडून होत असलेल्या पाणी उपश्याने येथील सर्व जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे कोकाकोला कंपनीला दिले जाणारे पाणी बंद करण्याची मागणी श्रमजीवीच्या वतीने करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाड्याचे तहसीलदार यांनायांना या सॅन दर्भात निवेदन दिले आहे. दर वर्षी वाडा तालुक्यातील आठ टंचाईग्रस्त गावांना ... Read More »

मस्तान नाक्यावरील मोबाईलच्या दुकानात चोरी

20180324_112922

प्रतिनिधी मनोर, दि २५: मुंबई – अहमदाबाद महामार्गालगतच्या मस्तं नाक्यावर असलेल्या आशिष मोबाईल स्टोर नामक मोबाईल स्टोर नामक मोबाईलच्या दुकानात चोरटयांनी चोरी करत पाऊणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवार दि. २४ पहाटे हि घटना घडली असून चोरीचा हा प्रकार सी सी. टी. वी. मध्ये कैद झाली आहे. पहाटे दिड वाजेच्या सुमारास चोरटयांनी मस्तान नाक्यावरील कोहिनुर बिल्डिंगमधील आशिष मोबाईल ... Read More »

जव्हारमधील पारस हॉटेल समोरील रस्त्याच्या कामाला मंजुरी

IMG-20180325-WA0487

           जव्हार नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १ मधील  पारस हॉटेलच्या बाजूला आणि प्रकल्प कार्यालयाच्या पाठीमागच्या गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची सोय नव्हती. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर रस्ता नसल्याने कोणतेही वाहन जात नव्हते. तसेच येथील नागरिकांना एखादे साहित्य किंवा समान आणायचे झाल्यास हे सामान मुख्य रस्त्यावर उत्तारून डोक्यावर मजुरांकरवी वाहून आणावे  लागत असे.  तसेच आपली स्व:ताची खाजगी ... Read More »

शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार बुलेट ट्रेनसह अन्य प्रकल्पांना विरोध, सरकारच्या धोरणांवर टीका

IMG20180324172607

विशेष प्रतिनिधी पालघर, दि. २५ : केंद्र सरकार बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प कोणासाठी राबवतेय. त्या बुलेट ट्रेनमध्ये नेमके बसणार आहे कोण? असा सवाल करत पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न सरकार करतेय. कथित स्वप्न  दाखवणारे हे प्रकल्प एकाच जिल्ह्यातून का नेले जात आहेत. येथील शेतकऱ्यांना उध्वस्त करून कथित विकास करू पाहणार असतील तर त्याविरोधात आपण संघर्ष करू असा ... Read More »

Scroll To Top