दिनांक 13 November 2018 वेळ 9:48 PM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा (page 5)

Category Archives: पाठपुरावा

वाड्यातील सनशाईन कंपनीला भीषण आग, कोट्यावधी रुपयांचे नुकसान  

IMG_20180510_163114

 प्रतिनिधी              वाडा, दि. १०:  तालुक्यातील आबिटघर या गावाच्या हद्दीतील असलेल्या सनशाईन या पुष्ठ्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला गुरुवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास वणव्यामुळे भीषण आग लागली. या आगीत कंपनी जळून खाक झाली असून एक ते दीड कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आठ महिन्यापूवीॅही याच कंपनीत आग लागून सुमारे ७० लाखांचे कंपनीचे नुकसान झाले होते.  दरम्यान, ... Read More »

वाड्यात अग्नीशमन व शववाहीनीचा प्रश्न ऐरणीवर. 

IMG-20180507-WA0000 (1)

अशोक पाटील               कुडूस, दि. १० : वाडा तालुका हा अलीकडे औद्योगिक दृष्टीने विकसित होत आहे. येथे रोजच अपघात व आग लागण्याच्या घटनात विक्रमी वाढ झाली आहे. मात्र काळानुरुप गरज असलेले अग्नीशमन व शववाहीनी अश्या अत्यावश्यक सेवांची येथे उणीव भासत आहे. मागणी करूनही शासन पातळीवर अथवा आमदार खासदार लोकप्रतिनिधी या गोष्टीचा विचार करत नसल्याने नागरिकांनी ... Read More »

आदिवासींना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या जलस्वराज्य समितीवर गुन्हे 

LOGO-4-Online

प्रतिनिधी             वाडा, दि. ०१ :  तालुक्यातील आपटी गावातील आदिवासी कातकरी या आदिम जमातीच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आले होते. याबाबत वारंवार अर्ज विनंत्या करूनही जल स्वराज्य समितीने त्याकडे दुर्लक्ष  करत या कातकरी वाडीला पाणी देण्यास ठाम विरोध केल्याने ह्या  कमिटीच्या सात पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना वाडा पोलिसांनी ... Read More »

घरावर विद्युत खांब कोसळला ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विद्य मोठा अपघात टाळला.

IMG-20180424-WA0347

प्रतिनिधी जव्हार, दि. २४ : तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील तामटीपाडा येथील एका घरावर चालू  विद्युत लाईनचा खांब कोसळून नुकसान झाले आहे मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.               मेढा पैकी तामटीपाडा येथील ईश्राम जाधव (४७) यांच्या घरावर २३ एप्रिल रोजी सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घरासमोरील गंज लागलेला विद्युत खांब अचानक कोसळला. यात त्यांच्या घराची कौले फुटली आहेत. यावेळी मोठा आवाज ... Read More »

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामास पुन्हा सुरूवात.

Manor News2

प्रतिनिधी              मनोर, ता.21: पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या तीव्र विरोधाला झुगारून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनच्या पाईपलाईन चे सर्वेक्षण आणि ड्रीलिंग चे काम ठेकेदार एल अँड टी कंपनी मार्फत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या मेंढवन आणि सोमटा गावच्या हद्दीत तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनेस विरोध करण्यासाठी 19 मार्च रोजी सूर्या पाणीबचाव संघर्ष समिती मार्फत ... Read More »

रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणात अनियमितता, कॉन्शिअस सिटीझन फोरमचा आरोप ; नुकसान भरपाईत शेतकर्‍यांची फसवणूक

Vada News

  प्रतिनिधी               वाडा, दि. 22 : पालघर व ठाणे जिल्ह्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये शेतकर्‍यांच्या जमिनींचे अधिग्रहण करताना 2013 भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या उच्चतम मूल्याचा आधार घेऊन नुकसान भरपाई देणे बंधनकारक असताना संबंधित यंत्रणेने शेतकर्‍यांची दिशाभूल करून मनमानीपणे मोबदला दिला आहे. नुकसान भरपाईचा दर ठरविण्याबाबत शेतकर्‍यांना विश्वासात घेतले नसून या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही ... Read More »

12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्‍यास फाशी, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

LOGO-4-Online

नवी दिल्ली वृत्तसंस्था काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची लाट लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने बलात्कार्‍यांना जरब बसेल अशी अधिक शिक्षा देण्याची तरतूद कायद्यांत करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद केली ... Read More »

रुईघर बोपदारी लाईन धोकादायक.  वाकलेले विद्युत पोल पडून अपघाताचा धोका.

Jawhar News 2

प्रतिनिधी              जव्हार, दि. 22: जव्हार तालुक्यातील दादरानगरहवेली या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेली रुईघर, बोपदरी ग्रामपंचायत आहे. मात्र या गावांकडे येनार्‍या विद्युत लाईनचे पोल वाकले आहेत. वाकलेल्या पोलांपासून विद्युत लाईन धोक्कादायक बनली आहे. ही विद्युत लाईन रस्त्याच्या कड्याला लागून असल्याने रस्त्यावर पोल पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दाभेरी गावातील ट्रान्संफॉर्मवरून रुईघर, बोपदरीकडे विद्युत ... Read More »

मनसेचा पालघर रेल्वे स्थानकात गोंधळ

IMG-20180420-WA0033

बोईसर वार्ताहर               बोईसर, दि. २० : रेल्वे प्रशासनाने गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या पास धारकांना आरक्षित डब्या तून प्रवास करता येणार नाही असे फर्मान काढले आहे व आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही अश्या प्रकारचा स्टॅम्प पासवर मारण्यात आला  आहे , ह्या विरोधात पालघर जिल्यातील प्रवाश्यांमध्ये व आरक्षित शयनयान डिब्बो मे ... Read More »

मनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.

प्रतिनिधी              मनोर, ता. १९ : येथील चिल्हार- अवदानी ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पालघर तालुका युनिटमार्फत काल बुधवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर माकपचीच सत्ता असताना आपले प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्याची वेळ आली.            मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायती अंतर्गत 18 पाडे आणि  ... Read More »

Scroll To Top