दिनांक 23 January 2018 वेळ 3:07 AM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा (page 4)

Category Archives: पाठपुरावा

रासायनिक ड्रेनेज लाईन फुटल्याने नवापुरमधील शेतकरी चिंतेत

MIDC CHEMICAL

वार्ताहर बोईसर, दि. 02 : येथील नवापुर मेहेर नाक्याच्या पोलीस चौकीजवळ ड्रेनेज लाईनच्या एअर पाईपला गळती लागल्याने त्यामधून बाहेर पडलेले रसायनीक सांडपाणी बाजूबाजुच्या शेतात साठले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याच्या भीतीने येथील शेतकरी चिंतेत आहे. तारापूर औद्योगिक परिसरातील कारखान्यातून निघणारे रासायनिक सांडपाणी पाईप लाईनद्वारे जवळच असलेल्या नावापुरच्या समुद्रात सोडले जाते. या पाईप लाईन्स पाम, कोलवडे व नवापुर या गावातून गेल्या ... Read More »

वाड्यात भटकी कुत्री व मोकाट गुरांचा हौदोस; भटका कुत्रा चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू

WADA BHATKI KUTRI

प्रतिनिधी वाडा, दि. 27 : वाडा शहरात भटकी कुत्री व मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झालेल्या 8 वर्षीय विद्यार्थ्याचा दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रणित मुकेश पाटील असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो लिटील ऐंजल्स या शाळेत चौथी इयत्तेत शिकत होता. आठ दिवसांपूर्वी प्रणित शाळेतून घरी परतत असताना त्याला भटका ... Read More »

शाळेच्या रस्त्यावर सुरु होऊ पाहणार्‍या दारूच्या दुकानाला दबक्या आवाजात विरोध

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : कुडूस, दि. 27 : वाडा तालुक्यातील कुडूस येथील शिक्षणाची नगरी समजल्या जाणार्‍या चिंचघर भागातील रस्त्यावर दारूविक्रीचे दुकान सुरू होत असून या दुकानाला मोठ्या संख्येने नागरिकांनी व महिला मंडळाच्या सभासदांनी विरोध दर्शवला आहे. सदर दुकान महामार्गावर होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामार्गालगत 500 मीटर अंतरावरील दारू विक्री व बार्सना बंदी घातल्यानंतर या दुकानदारांनी आपले बस्तान कुडूस शेजारच्या चिंचघर रस्त्यावर ... Read More »

पालघरमधील धोकादायक इमारती निष्कासित करणे आवश्यक नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

cropped-LOGO-4-Online.jpg

मुंबई, दि. 26 : पालघर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या मालकांना तसेच भोगवटादारांना इमारत रिकामी करण्याबाबत नोटिस बजावण्यात आली असून या इमारती निष्कासित करणे आवश्यक आहे, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. विधानपरिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना ते बोलत होते. पालघरमध्ये सर्वेक्षण केले असता सात इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. या इमारतीत 15 भोगवटदार असून या इमारतीत ... Read More »

शाळा बंद निर्णयाविरोधात मनसेचे आंदोलन

MANASE AANDOLAN

प्रतिनिधी बोईसर, दि. 20 : पालघर जिल्ह्यामध्ये शून्य ते 30 पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या 123 शाळा बंद करून जवळच्या शाळेत समावून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे. या निर्णयाचा समाजातील विविध घटकांकडून विरोध होत आहे. गुरुवारी (दि. 20) पालघर तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनीही गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार हिरावला गेल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ... Read More »

आदिवासी विकास मंत्री व जिल्हाधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष! -नीलेश सांबरे

VIKRAMGAD UPOTION

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 19 : जानेवारीपासून अस्तित्वात आलेल्या विक्रमगड नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने या नगरंपचायतीला कुणीही वाली नाही. मुख्याधिकारीविनाच कारभार हाकला जात असल्याने येथील नगराध्यक्ष रवींद्र खुताडे हे नगरसेवकांसह मुख्याधिकारी नेमणे व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मंगळवार (दि. 18) पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र विक्रमगड मतदारसंघाचे आमदार मंत्री विष्णू सवरा व जिल्हाधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच ... Read More »

संपादित जमिनी मोकळ्या करा! इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर; गॅस पाईपलाईन व वीज टॉवरमुळे पर्यावरणाला बाधा

WADA GAS PIPELINE

प्रतिनिधी वाडा, दि. 14 : रिलायन्स, गेल कपनींची गॅस पाईपलाईन व उच्च दाबाच्या वीजवाहक तारा वाहून नेण्यासाठी उभारलेल्या टॉवरकरिता तालुक्यातील अनेक गावांतील सुमारे 30 ते 40 मीटरचा शेतजमिनींचा हरितपट्टा संपादित करण्यात आला आहे. तशा नोंदी शेतकर्‍यांच्या सातबारावरही करण्यात आल्या आहेत. या संपादित जमिनीत शेतकर्‍यांना या जमिनीवर शेती पूरक कोणतेही व्यवसाय अथवा बांधकाम करता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अत्यल्प ... Read More »

कोपर्डी अत्याचारातील आरोपींना कठोर शासन करा! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

WADA KOPARDI

.प्रतिनिधी वाडा, दि. 13 : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेला 13 जुलैला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र वर्षभरात या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले असून एकूणच महिला अत्याचाराच्या बाबतीत सरकार असंवेदनशील असल्याचा ठपका ठेवत कोपर्डीतील आरोपींना कठोर शासन करा अशी मागणी करणारे निवेदन वाडा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. कोपर्डी ... Read More »

स्वाभिमान संघटनेचा रास्ता रोकोचा इशारा!

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी : कुडूस, दि. 13 : वाडा तालुक्यातील कुडूस – चिंचघर – देवघर व कोंढले – खैरे हे मोठ्या प्रमाणात रहदारी असलेले महत्वाचे रस्ते पहिल्याच पावसात खड्ड्यात गेल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेने उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासकीय ... Read More »

वाडा : निकृष्ट दर्जांच्या रस्त्यांप्रश्‍नी स्वाभिमान संघटनेचे बेमुदत उपोषण

WADA BEMUDAT UPOTION

प्रतिनिधी कुडूस, दि. 12 : रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करुन लाखो रुपयांचा घोटाळा करणार्‍या ठेकेदार व अधिकार्‍यांवरील कारवाईसह आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमान संघटनेने आजपासून कुडूस नाक्यावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाही; निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे; अशा अनेक ... Read More »

Scroll To Top