दिनांक 23 January 2018 वेळ 3:05 AM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा (page 3)

Category Archives: पाठपुरावा

आरोग्यमंत्र्यांचे वराती मागून घोडे

LOGO 4 Online

विशेष प्रतिनिधी पालघर, दि. २२ : आदिवासी भागात रोजगारासाठी मोठ्याप्रमाणावर स्थलांतर होत असते. या स्थलांतरामुळे असंख्य कुपोषित बालकेही स्थलांतरित होत असतात. अशा स्थालांतरित कुपोषित बालकांच्या आरोग्याची चिकित्सा करून त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत म्हणून ही बालके गावी परतल्यावर पुनरागमन शिबीर आयोजित करण्याची कल्पना आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मांडल्यानंतर हे  पुनरागमन शिबीर शुक्रवारी ( दि. २२ ) वाड्यातील ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात ... Read More »

विक्रमगड : मलवाडा ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

MALVAWADA GRAMPANCHAYAT BHRACHATACHAR

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 19 : तालुक्यातील मलवाडा ग्रामपंचायतीमध्ये सन 2013 ते 2017 या कालावधीत विकासकामांच्या नावाखाली मोठा निधी आला. ग्रामपंचायतीकडे आलेल्या निधीच्या 90 टक्के निधी हा खर्च झाला आहे. मात्र हा निधी नेमका कुठे वापरला व कोणती विकासकामे केली? याबाबत येथील ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. त्यामुळे झालेल्या विकासकामांची चौकशी करून संबंधित सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी येथील शेकडो ... Read More »

केएसएल कंपनी भरतीत भूमीपूत्रांना डावलले स्थानिकांच्या हक्कासाठी मनसे सरसावली

KSL BHIMIPUTRA

प्रतिनिधी वाडा, दि. 17 : स्थानिकांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण असतानाही मुसारणे गाव हद्दीतील केएसएल या धागा बनवणार्‍या कंपनीने शासनाच्या पत्रकाला केराची टोपली दाखवत परप्रांतीय कामगारांची भरती केली असल्याचा आरोप मनसेने एका निवेदनाद्वारे केला आहे. या कंपनीत कापसापासून धागा बनवण्याचे काम केले जाते. गेल्या कित्येक वर्षापासून कंपनीतील एकाही कामगाराला नोकरीत कायम केले नसून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतनही ... Read More »

कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकार्‍याच्या प्रतिक्षेत

KUDUS PRATHMIK AAROGYA KENDRA

प्रतिनिधी : कुडूस, दि. 17 : वाडा तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍याविना शिकाऊ डॉक्टरांवर सुरू असल्याने येथील रूग्णांना महागड्या खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. या आरोग्य केंद्रात गेल्या वर्षभर मागणी करूनही वैद्यकीय अधिकारी दिला जात नाही. यामुळे येथील नागरिक शासन व्यवस्थेवर नाराज आहेत. कुडूस हे 52 गावांतील लोकांचे आरोग्य केंद्र आहे. हा भाग बहुल आदिवासी ... Read More »

बुलेट ट्रेन विरोधात भूमिसेनेचा मोर्चा भाजप सरकारची हुकूमशाही उधळून लावू! -काळूराम दोधडे

BULLET TRAIN-BOISAR

प्रतिनिधी बोईसर, दि. 14 : पालघर तालुक्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी जनतेचा संसार या जमिनीवर उभा आहे. जगण्याची शेतीशिवाय अन्य कोणतीही साधने नाहीत. अशा स्थितीत विकासाच्या नावाखाली या भागात प्रकल्प लादून आदिवासी, शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान मोदी सरकार करू पाहत आहे. मात्र ते कदापि होऊ देणार नाही. भाजप सरकारची चाललेली हुकूमशाही उधळून लावू, असा ... Read More »

जिल्ह्यातील सर्व गावे व पाड्यांचे विद्युतीकरण करणार! -विष्णू सवरा

VIDYUTIKARAN1

पालघर, दि. 8 : पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सर्व गावे, वाडी व पाड्यांचे विद्युतीकरण करणार असून यासाठी लागणारा निधी आदिवासी विकास विभागाकडून दिला जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी केले. पालघर जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी सवरा बोलत होते. यावेळी आमदार पास्कल धनारे, अमित घोडा, ... Read More »

तारापूर : 2 लाखांची घरफोडी

LOGO 4 Online

बोईसर, दि. 01 : येथील तारापूर भागात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 1 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोफरण येथे रहावयास असलेल्या व वेल्डींगचे काम करणार्‍या 44 वर्षीय व्यक्तीच्या घरी 31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून व घरातील कपाट उचकाटून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ... Read More »

ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्यांच्या हरकतींची मुदत वाढवा, शिवसेनेची मागणी

GRAMPANCHAYAT SHIVSENA

प्रतिनिधी वाडा, दि. 31 : तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर 2017 ला संपत असल्याने आगामी दोन महिन्यात निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या 29 ऑगस्ट रोजी निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या असून 4 सप्टेंबरपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. या याद्यांमध्ये बराच घोळ असून सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असतांना व मध्ये दोन दिवस सुट्टीचे असल्याने ही मुदत किमान एक आठवडा पुढे ... Read More »

विक्रमगड : ऐन सणासुदीत शिक्षकांचा पगार लांबणीवर

LOGO 4 Online

प्रतिनिधी : विक्रमगड, दि. 22 : विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा जुलै महिन्याचा पगार ऑगस्ट संपत आला तरी झाला नसल्याने ऐन सणासुदीत शिक्षकांवर उसनवारी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोेत्सव साजरा कसा करायचा? असा यक्षप्रश्‍न या शिक्षकांना पडला आहे. शिक्षकांना पगाराव्यतिरिक्त उत्पन्नाचे अन्य कुठलेही साधन नसल्याने संपुर्ण महिना पगारामध्ये काटकसर करुन काढावा लागतो. यात ... Read More »

कामगारांच्या हक्कांसाठी कार्डीनल ग्रेशिअस हॉस्पिटलमध्ये श्रमजीवीचे ईश्वराला साकडे

SHRAMJIVI VASAI

प्रतिनिधी पालघर, दि. 8 : वसईतील कार्डीनल ग्रेशिअस हॉस्पिटलमधील कामगारांच्या हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (दि. 8) हॉस्पिटल प्रशासनाला सुबुद्धी यावी म्हणून ईश्वराला साकडे घातले. कोणत्याही प्रकारचा संघर्ष अथवा वाद विवादाशिवाय आपल्या न्याय मागण्या मागत येशू प्रभू आणि गणपती बाप्पाला आरती, प्रार्थना करत कामगारांनी हक्क डावलणार्‍या प्रशासनाला सुबुद्धी द्यावी, अशी याचना यावेळी प्रभूकडे केली. हा प्रशासनाला अप्रत्यक्ष इशारा असून यापुढे येथील ... Read More »

Scroll To Top