दिनांक 19 February 2019 वेळ 3:43 AM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा (page 2)

Category Archives: पाठपुरावा

अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 10 : केंद्र तसेच राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी या योजनांचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले. शेख हे आज पालघर जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी शासनामार्फत ... Read More »

मनोर रस्ता रुंदीकरणाच्या कामास विलंब रस्त्यावरून चालणे झाले अवघड

प्रतिनिधी मनोर, दि. 9 : येथील मुख्य रस्त्यापासून नावझे गावाला जोडणार्‍या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामा करिता ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला टाकलेली खडी काम अनेक दिवसांपासुन बंद असल्याने रस्त्यावर पसरल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला असुन ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. वरई सफाळे मार्गाला नावझे गावाशी जोडणार्‍या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला गेल्या वर्षी मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे यासाठी ग्रामपंचायतीने ... Read More »

ठवळपाड्यातील धोकादायक समाजमंदिर जमीनदोस्त कधी करणार ? ग्रामस्थांचा सवाल

प्रतिनिधी मोखाडा, दि.४ : तालुक्यातील नाशेरा ग्रामपंचायत हद्दीतील ठवळपाडा येथील समाजमंदिराच्या इमारतीची अक्षरशः पडझड झालेली असुन.मागील दोन वर्षांपासून समाजमंदिराची परिस्थिती जैसे थे च आहे.बाजूलाच जिल्हापरिषदेची शाळा असून बहूसंख्य विद्यार्थ्यांचा येथे मुक्त वावर असतो. मात्र तरीही संबंधीत विभागाकडून समाजमंदिराच्या दुरूस्ती बाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून एखादी अप्रिय घटना घडल्यावरच समाजमंदिर पाडण्याची कार्यवाही करणार का ? असा ... Read More »

पालघरमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर खाकीची मस्ती ट्रॅफीक पोलीसाची बदली व विभागीय चौकशी

पालघर, दि. ४:  पोलिसांकडून पत्रकारांवर होणार्‍या खोट्या कारवायांमुळे असंतोष असताना त्यात आणखी एका घटनेची भर पडली. येथील दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार पी. एम. पाटील यांच्याशी काल वसावे नामक ट्रॅफिक पोलिसाने गैरवर्तन करीत त्यांची कॉलर पकडली आणि पोलीस चौकीत नेले. या घटनेचा पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद व पालघर जिल्हा पत्रकार संघाने तिव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. रस्त्यात प्रचंड वाहतूक कोंडी ... Read More »

खोडाळा मंडळ कृषी कार्यालय कायम कुलूपबंद: कास्तकारांचे हाल, शेतकरी जातात विन्मूख, जलयुक्त शिवार वार्‍यावर

  प्रतिनिधी मोखाडा, दि. 19 : खोडाळा येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कायम कुलूपबंद राहत असल्याने विविध कामांसाठी कार्यालय गाठणार्‍या खोडाळा आणि परिसरातील गावपाड्यातील शेतकर्‍यांना प्रचंड त्रास होत आहे. येथे साधा शिपाई देखील हजर राहत नसल्याने शेतकर्‍यांना शंकानिरसन न होताच विन्मूख परतावे लागत असून कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराची दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्‍न सर्वसामान्य शेतकर्‍यांना भेडसावत आहे. मोखाडा तालुक्यातील ... Read More »

रोहयो अंतर्गत पाथर्डी येथे जॉब कार्ड मेळावा संपन्न

प्रतिनिधी जव्हार, दि. 19 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांकरिता जॉब कार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नविन जॉब कार्डांचे वाटप, जुन्या जॉबकार्ड धारकांच्या समस्यांचे निराकरण तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध करुन स्थानिकांचे स्थलांतर कमी करण्यासाठी शासनामार्फत रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण व ... Read More »

वाडा : विविध मागण्यांसाठी माकपचा वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोचा

प्रतिनिधी वाडा, दि. 17 : कायदा होऊनही वनपट्टे दावेदारांची हेळसांड सुरूच आहे, दावेदारांना त्रास दिला जात आहे, वनपट्टे मिळण्यास वनअधिकारी अडथळा निर्माण करत आहेत तसेच अत्यंत बेजबाबदारपणे वनाधिकारी वागत आहेत असे अनेक आरोप करत भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) वाडा तालुक्याच्या वतीने आज, सोमवारी वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घातला होता. जी.पी.एस. मोजणी प्रमाणे ... Read More »

पालघर, अमरावती, नंदुरबार जिल्ह्यात ब्लड ऑन कॉल विशेष बाब म्हणून सुरु! आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

राजतंत्र न्युज नेटवर्क मुंबई, दि. 17 : पालघरसह अमरावती व नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये ब्लड ऑन कॉल ही योजना विशेष बाब म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण रुग्णालयात रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी भागातील मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध होणे गरजेचे असल्याने या योजनेचा आदिवासी भागात मोठा ... Read More »

कुरगाव ग्रामपंचायतीचे सरकारी जागेवर अतिक्रमण, दोषींवर कारवाई करण्याची पंचायत समिती सदस्य सुशील चुरी यांची मागणी

वार्ताहर बोईसर, दि. 16 : येथील कुरगाव ग्रामपंचायतीने 29 वर्षांपुर्वी बाजारपेठेसाठी बांधलेले गाळे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बांधण्यात आल्याची बाब शिवसेनेचे पालघर पंचायत समिती सदस्य सुशील चुरी यांनी पालघर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत मांडत अशा प्रकारे सरकारी जागेवर अतिक्रमण करणार्‍या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुरगाव येथील सर्व्हे नं. 169 मधील जागेत ग्रामपंचायतीने 1989 साली बाजारपेठेसाठी गाळ्यांचे बांधकाम ... Read More »

सहा महिन्यांपासून वेतन रखडले, कामगारांचे बेमुदत उपोषण

प्रतिनिधी वाडा, दि. 13 : तालुक्यातील वाडा व कोंढले येथील कॅपॅसीटे स्ट्रक्चरल या कंपनीतील कर्मचार्‍यांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने याविरोधात कोकण विकास कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कंपनीतील दहा कामगार गुरुवार सकाळपासून वाडा येथील कंपनीच्या गेटबाहेर आमरण उपोषणास बसले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी येथील कामगारांनी उपोषण करणार असल्याबाबतचे पत्र कंपनी प्रशासनाला दिले होते. यावेळी तीन ते चार दिवसात सर्व कामगारांचे ... Read More »

Scroll To Top