दिनांक 12 December 2019 वेळ 10:18 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 7)

Category Archives: महान्यूज़

डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट, मिहीर शहा भाजपात

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविलेले विद्यमान स्वीकृत सदस्य मिहीर शहा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आमदार आनंद ठाकूर यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रवेश कार्यक्रमात ठाकूर यांचा मुलगा करण उपस्थित असल्याने आनंद ठाकूर यांचा केवळ मुहूर्त बाकी असल्याचे संकेत आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा ... Read More »

सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी 25 लाखांची तरतूद

खासदार गावित व जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी वार्ताहर/बोईसर, दि. 6 : पालघर तालुक्यातील सातपाटी बंदरातील गाळ काढण्यासाठी खासदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज एकत्रित पाहणी करून खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या खासदार निधीतून गाळ काढण्यासाठी 25 लाखांची तत्काळ तरतूद केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासुन सातपाटी बंदरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे येथील मच्छिमार बांधवांना आपल्या बोटी बंदरात ने-आण ... Read More »

जिल्ह्यातील शिक्षकांना वेतन वाढ व वरिष्ठ श्रेणी विनाअट लागू करावी! -खा. राजेंद्र गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : शिक्षक हे समाजातील आदर्श मानले जातात. सामाजिक दायित्व, सामाजिक मूल्ये जपण्याचं काम शिक्षकांकडे आहे. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी विना अट लागू करावी, असे सांगतानाच इतर जिल्ह्यात मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची पदोन्नती झालेली आहे. पालघरमध्ये मात्र ही पदोन्नती अद्याप झाली नसून यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन खा. राजेंद्र ... Read More »

परतीच्या पावसाचा फटका, पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

डहाणू ते विरारदरम्यान अनेक गाड्यांचा खोळंबा प्रतिनिधी/डहाणू, दि. 4 : गेल्या दोन दिवसांपासून बरसणार्‍या परतीच्या पावसाने मुंबई व पालघर जिल्ह्यासह पश्चिम किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबईसह उपनगरातील भाग जलमय झालाने त्याचा विपरीत परिणाम पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या व लोकल सेवेवर झाला असून डहाणू रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणार्‍या व मुंबईकडून येणार्‍या सर्व गाड्या अनिश्चित काळापर्यंत उशीराने धावत आहेत. ... Read More »

1 सप्टेंबरपासुन जिल्ह्यात नविन वाहतुक नियम लागू

दंडाच्या रक्कमेत कित्येक पटीने वाढ पालघर, दि. 3 : रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणार्‍यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक प्रमाणात आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसण्यासाठी वाहतुक नियम अधिक कठीण करुन वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जुन्या वाहतुक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधयाकाला मंजुरी मिळाल्यानंतर 1 ... Read More »

गणेशोत्सवासाठी पालघर जिल्हा पोलीस सज्ज!

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : उद्या, 2 सप्टेंबरपासुन सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी पालघर जिल्हा पोलीस सज्ज असुन हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी ठोस पावले उचलण्यात आलेली आहेत, अशी माहिती पालघर पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास 2 हजार 719 ठिकाणी सार्वजनिक व 40 हजार 525 ठिकाणी खाजगी गणपती मुर्तीची स्थापना होणार असुन 212 ठिकाणी सार्वजनिक व 3 हजार ... Read More »

अनियंत्रित झालेल्या एसटी बसने वृद्ध पादचार्‍याचा चिरडले

जखमी पादचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू वाडा येथील घटना प्रतिनिधी/वाडा, दि. 1 : विक्रमगडहुन वाड्याच्या दिशेने येणार्‍या एसटी महामंडळाच्या वाडा आगाराच्या बसला रविवारी सकाळच्या सुमारास मालेफाटा येथे अपघात झाला. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असुन अनियंत्रित झालेल्या बसने वृद्ध पादचार्‍याला धडक दिल्याने सदर पादचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमगडहुन एम.एच. ... Read More »

वाडा-पिवळी बसला अपघात; 57 जखमी, 2 गंभीर

जखमींमध्ये 52 विद्यार्थ्यांचा समावेश वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथील घटना प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात उतरुन झालेल्या अपघातात एकूण 57 प्रवासी जखमी झाले आहेत. यात 52 विद्यार्थ्यांचा समावेश असुन दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित जखमींवर ... Read More »

मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी संजीव जोशी यांची बिनविरोध निवड

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 8 : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, तर कार्याध्यक्षपदी पुणे येथील सकाळ समुहाचे प्रतिनिधी शरद पाबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज पत्रकार परिषदेच्या मुंबई येथील कार्यालयात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, निवडणूक निर्णय अधिकारी बापूसाहेब गोरे (पुणे), सहाय्यक निवडणूक ... Read More »

मोखाडा-कसारा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प

करोळ-पांचघर गावांना जोडणारा पुल गेला वाहून आणखी एक घर कोसळले! दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 4 : मागील तीन-चार दिवसांपासुन तालुक्यात धो-धो बरसणार्‍या पावसामुळे मोखाडा – कसारा मार्गावर दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने हा महत्वाचा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दरड कोसळल्यानंतर संपुर्ण रस्ताच गायब झाल्याने येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मोखाडा – कसारा मार्गावरील देवबांध ते डोल्हारा ... Read More »

Scroll To Top