दिनांक 17 January 2020 वेळ 9:10 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 6)

Category Archives: महान्यूज़

वाढवण बंदराच्या निषेधार्थ नागरिकांची मतदानाकडे पाठ

10 ते 12 गावांचा मतदानावर बहिष्कार शिवसेना उमेदवाराला बसणार फटका वार्ताहर/बोईसर, दि. 21 : वाढवण बंदर उभारणीच्या निषेधार्थ डहाणू किनारपट्टीवरील गावांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर कायम राहत सुमारे 10 ते 12 गावातील नागरीकांनी आज मतदानाकडे पाठ फिरवल्याने येथील उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे बहिष्कार टाकण्यात आलेल्या गावांमध्ये भाजप-शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात मतदार असल्याने त्याचा ... Read More »

पालघर जिल्ह्यात कोण वरचढ?

राजतंत्र मीडिया (दि. १८) : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीतून पालघर जिल्ह्यावर कोण राज्य करणार ते स्पष्ट होणार आहे. सध्या जिल्ह्यातील 3 मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहेत. भाजपकडे 2 व शिवसेनेकडे 1 मतदारसंघ आहे. बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या बोईसर व नालासोपारा मतदारसंघातून लोकसभा निवडणूकीत भाजप सेना युतीला मताधिक्य मिळाल्यामुळे बविआ 3 मतदारसंघ स्वतःकडे राखेल का? डहाणू मतदारसंघात मोदी लाट असताना ... Read More »

सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार

जव्हार येथील सभेत मुख्यमंत्र्याचे आश्वासन प्रतिनिधी/जव्हार, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी शासनाने मागील 5 वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच येत्या काळात स्थानिक ठिकाणीच शेतीतून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून या भागात छोटे-छोटे बंधारे बांधुन सिंचनाच्या माध्यमातून आदिवासींचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हार येथे केले. ते आज, गुरुवारी विक्रमगड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत ... Read More »

मी माघार घेतलेली नाही – रमेश मलावकर

राजतंत्र मिडीया (Breaking, 16.10.2019): मी निवडणूकीच्या रिंगणात कायम असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मी कोणाची मते खाण्यासाठी निवडणूक लढवीत नसून जिंकून येण्यासाठी निवडणूक लढवित आहे. मी माघार घेतल्याचे मॅसेज सोशल मिडियावर पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र मी माघार घेतलेली नाही व कोणालाही पाठिंबा दिलेला नसून मतदारांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये असा ... Read More »

पालघर विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेसमोर विरोधकांचे आव्हान उभे ठाकेल का?

निवडणूक वार्तापत्र (संजीव जोशी) : 130-पालघर हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदार संघात 1 लाख 39 हजार 174 पुरुष, 1 लाख 34 हजार 803 महिला व इतर 17 असे 2 लाख 73 हजार 994 इतके मतदार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे अमित कृष्णा घोडा हे विद्यमान आमदार असून पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे. त्यांच्याऐवजी सेनेने श्रीनिवास चिंतामण वनगा यांना ... Read More »

आदिम जमातीतील शेकडो कुटूंबे 2 वर्षांपासुन घरकुलाच्या प्रतिक्षेत!

सरकारी बाबुंच्या अनास्थेमुळे लाभार्थ्यांच्या अर्जावर साठली धूळ प्रतिनिधी/मोखाडा, दि. 14 : केंद्र आणि राज्य सरकारने कोणतेही कुटूंब बेघर राहणार नाही. यासाठी विविध घरकुल योजना राबविल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी आदिम जमातीला प्राधान्यक्रम देण्याचे धोरण आखले आहे. तसेच आदिम जमातीसाठी केंद्र सरकारने विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत, शबरी घरकुल योजनेवर आधारित घरकुल योजना आणली आहे. या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षात शेकडो आदिम ... Read More »

विक्रमगड मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर

निवडणूक वार्तापत्र (संजीव जोशी) : येथून सुरेखा विठ्ठल थेतले (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा), हरिचंद्र सखाराम भोये व मधुकर धर्मा खुताडे या 3 भाजप बंडखोरांसह भास्कर लक्ष्मण बेंडगा, शिवराम धावजी गिरंधला, दिपक लहु महाकाळ या अपक्षांनी निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. मतदारसंघाची पार्श्वभूमी: विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. तत्पूर्वी जव्हार, मोखाडा व तलासरी या तालुक्यांचा मिळून ... Read More »

डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजप राखणार की गमावणार?

रेशनिंग दुकाने आधारशी जोडल्यानंतर रेशनिंगच्या व्यवसायाला मर्यादा आल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देताना राज्यातील शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. मात्र रेशनिंग, शेती आणि हॉटेल हा व्यवसाय करणार्‍या धनारे यांची श्रीमंती अनेक पटीने वाढली आहे. त्यांच्या या प्रगतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. Read More »

मनोर : 500 रुपयांसाठी केला मित्राचा खून

24 तासात खुनी मित्रांना अटक मनोर पोलिसांची कामगिरी राजतंत्र न्युज नेटवर्क/मनोर, दि. 11 : मनोर, दि. 11 : मनोरमधील कोंढाण-धोडडेपाडा येथील एका मोकळ्या जागेत सडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मनोज अनंता भुतकडे या 19 वर्षीय तरुणाच्या मृदेहाची ओळख पटवून 24 तासात त्याच्या खुन्यांना गजाआड करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे. मनोजने उसने घेतलेले 500 रुपये परत करण्यावरुन उद्भवलेल्या वादातून त्याच्या 2 ... Read More »

370 कलम रद्द केल्याबद्दल भाजपला मतदान होईल! -शिक्षण मंत्री विनोद तावडे

डहाणू येथे पत्रकारांशी साधला संवाद राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 10: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संविधानातील कलम 370 रद्द करुन इतिहासातील एक मोठी चूक दुरुस्त केली आहे. त्याबद्दल लोक भाजपला भरघोस मतदान करतील, असा विश्वास राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या भुमीकेद्वारे भाजप मोदी लाटेच्या आधारावरच राज्याच्या निवडणूकीला सामोरे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ... Read More »

Scroll To Top