दिनांक 21 July 2019 वेळ 5:58 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 5)

Category Archives: महान्यूज़

पालघर : पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 60 लाखांची फसवणूक

400 जणांना गंडा, तिघे अटकेत वार्ताहर/पालघर, दि. 9 : एका वर्षात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून पालघरमधील खेड्यापाड्यातील नागरीकांना एका कंपनीने सुमारे 60 लाखांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या जवळपास चारशे जणांनी याविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी याप्रकरणी तिन जणांना अटक केली आहे. सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनी असे सदर कंपनीचे नाव असुन माहीम ... Read More »

जव्हार तालुक्यातील 23 गावपाड्यांत पाणीटंचाई

6 टँकरने पाणी पुरवठा सुरु! 4 गावांचे टँकरसाठी नवीन प्रस्ताव प्रतिनिधी/जव्हार, दि. 7 : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाणी टंचाईच्या झळा अधिक वाढल्या असून या वर्षी तालुक्यातील 23 गाव-पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान या टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये 6 टँकरने दिवसाआड प्रमाणे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर आणखी 4 टंचाईग्रस्त गावांचे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव ... Read More »

पाचघर गाव तहानेने व्याकुळ, हंडाभर पाण्यासाठी जागून काढावी लागतेय रात्र

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या पाचघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे महिलांना संपुर्ण दिवसच पाण्यासाठी खर्ची करावा लागत आहे. येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने दडी मारल्याने तालुक्यात मोठ्या ... Read More »

वाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच!

डझनभराहून अधिक घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असुन सोनाळे परिसरात शनिवारी (दि. 4) रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडून साधारण 61 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेनंतर काल, रविवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी वाडा शहरातील शिवाजी नगर परिसरात दोन घरफोड्या करून हिरे व सोन्याचे दागिने, असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज ... Read More »

मोखाड्याची भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल!

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा वाढलेल्या लोकसंख्येला तुटपुंजा पाणीपुरवठा प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने अधिकच भीषण रुप घेतले असुन सध्यस्थितीत 86 गावपाड्यांना सन 2011 च्या लोकसंख्येनुसार 24 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. शासनाने निर्धारित केलेले प्रति व्यक्ती 20 लीटर एवढे तुटपुंजे पाणी त्यातच आठ वर्षात वाढलेली लोकसंख्या यामुळे सरकारकडून होणारा पाणी पुरवठा तुटपुंजा पडत आहे. ... Read More »

दरोड्याच्या तयारीतील सशस्त्र टोळी जेरबंद

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 3 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन विविध वाहनांतून आलेल्या या दरोडेखोरांकडून गावठी कट्ट्यासह अनेक घातक हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास चौगुले यांना महामार्गावरील वसई हद्दीतील सातिवली ब्रिजच्या बाजुला असलेल्या सागर पेट्रोल पंपावर 1 मे रोजी रात्रीच्या ... Read More »

पालघर : 12 लाखाहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क!

63.72 टक्के मतदानाची नोंद राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 30 : काल, 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत 63.72 टक्के मतदान झाले असुन एकुण 18 लाख 85 हजार 297 मतदारांपैकी 12 लाख 1 हजार 298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार आपले नशिब आजमावत असुन 23 मे रोजी होणार्‍या मतमोजणीनंतर मतदारांनी नक्की कुणाच्या ... Read More »

मजुरांवर पिस्तुल रोखल्याचे प्रकरण; श्रमजीवींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा वनअधिकारी तोंडे यांचा आरोप प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : कथित मजुरांवर पिस्तुल रोखल्याचा आरोप असलेले वाडा पश्चिम परिक्षेत्राचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे व त्यांच्या कर्मचार्‍यांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिलीप तोंडे यांनी ... Read More »

नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू!

एक सुखरूप, वाडा येथील घटना संजय लांडगे / वाडा, दि. 24 : उन्हाळ्यातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन मुलींपैकी दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर यातून बचावलेल्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मानसी अनिल देसले (वय 11, रा.कापरी), वेदिका संतोष आकरे (वय 13) व दीक्षा संतोष ... Read More »

वाडा : वन अधिकार्‍याची दबंगगिरी; आदिवासी मजूरांवर रोखले पिस्तूल

दिनेश यादव / वाडा, दि. 23 : येथील वनविभाग (पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी काम केले होते. या कामाची मजुरी मागायला गेलेल्या या मजुरांवर वनविभाग पश्चिमचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी आपल्याकडील पिस्तूल रोखत दबंगगिरी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. तालुक्यातील वनविभाग (पश्चिम) कार्यालया अंतर्गत येणार्‍या आबिटघर परिसरातील वनक्षेत्रात शासनाच्या वृक्षलागवडीच्या ... Read More »

Scroll To Top