दिनांक 12 December 2019 वेळ 9:37 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 41)

Category Archives: महान्यूज़

बोईसरमध्ये पावसाची दमदार हजेरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांचे हाल

वार्ताहर           दि. २४ : पालघर जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बोईसरमधील अनेक ठिकाणी नद्या नाले तुडुंब भरून वहात आहेत. पहाटेपासून सुरु झालेला पाऊस ५ ते ६ तास कोसळल्याने येथील सखोल भागात पाणी साचले आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व रस्त्यांवर पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. बोईसर- पालघर दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी ... Read More »

अतिवृष्टीमुळे आदिवासीचे घर कोसळले, भर पावसात घरातील आठ सदस्यांना झोपडीचा आसरा

प्रतिनिधी           मनोर,ता.२४ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाट्यानजीकच्या कानल पाडा येथील लक्ष्मण झुनर यांचे घर आज झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळले.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.           चिल्हार आवढाणी ग्रामपंचायत हद्दीत कानल पाडा येथे आदिवासी बहुल वस्ती आहे. लक्ष्मण जुनर यांनी २००४ साली येथे घर  बांधले होते. आज झालेल्या अतिवृष्टीमुळे घराचे प्रथम छप्पर ... Read More »

पत्रकारांच्या विरोधात पोलीसांची दडपशाही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जुलमी कारवाई

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. २४ : कथीत दरोडेखोरांना अटक केल्याप्रकरणी बातमी घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या आज तक ह्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्स ह्या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी राम परमार यांना पालघर पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत अटक केली आहे. ह्या कारवाईच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. पत्रकारांना धक्काबुक्की करुन उलट खोटी तक्रार ... Read More »

दहिसर चा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद

प्रतिनिधी              मनोर, दि. २३ : वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यामुळे दहिसरचा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे.              दहिसर येथे आरोग्य विभागाचा आयुर्वेदिक दवाखाना आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चहाडे या दवाखान्यापासून लांबच्या अंतरावर असून तिथपर्यंत येण्याजण्याच्या सुविधा मार्यदित आहेत. प्रत्येक दिवसाला 40 ते 50 बाह्यरुग्ण या ... Read More »

प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे योग कार्य शाळेचे आयोजन

गिरीश कोकीळ           डहाणू, दि. २० : प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेंट मेरी हायस्कूलच्या सभागृहात मसोली येथे मंगळवार १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते डॉ प्रेम मसंद हे प्रमुख व्याख्याते म्हणून तर संस्थेच्या आध्यात्मिक वक्त्या व फिजीयो डॉ ... Read More »

चिल्हार फाट्यावरील पागी पाडयाचा वीजपुरवठा सुरळीत सुरु

राजतंत्र न्युज नेटवर्क              मनोर, ता.१७ : चिल्हार फाटा येथील पागी पाडयाचा वीजपुरवठा शुक्रवार (ता.१५)सायंकाळी पूर्ववत करण्यात आला. दैनिक राजतंत्र मध्ये विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच महावितरण च्या अभियंत्यांनी हालचाल करून ताबडतोब वसई च्या कंत्राटदारामार्फत शुक्रवारी सकाळी काम सुरू केले. सायंकाळपर्यंत नवीन खांब उभे करून त्यावर जुनेच रोहित्र बसविण्यात आले. ... Read More »

वाडा : शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी भरवली शाळा 

प्रतिनिधी             वाडा, दि. १५: शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस, छोटे शाळकरी विद्यार्थी उत्साहात शाळेच्या प्रांगणात हजर, मात्र शाळेतील शिक्षकच गैरहजर. अशा परिस्थितीत पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे हे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले, शिक्षक हजर नसल्याने गंधे यांनीच विद्यार्थ्यांची शाळा भरवून विद्यार्थ्यांना धडे दिले. एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना जेवणही वाढले. ... Read More »

पोलीस अधिकाऱ्याच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सर्वपक्षीय आक्रमक

पोलीस अधिक्षकांकडे केली तक्रार;  बदलीची केली मागणी  प्रतिनिधी वाडा: दि.१५ : वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार सुरु आहे.तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आक्रमक झाले असून शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी सर्व पक्षीय संघर्ष समितीने पालघरच्या पोलीस अधिक्षकांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.      ... Read More »

शिस्त आणि मेहनतीमुळेच यश प्राप्त होते! – मुस्तफा मेमन

प्रतिनिधी              कुडूस दि. १३ : शाळेतील शिक्षकांची मेहनत व शिस्त याचे फलीत विद्यार्थ्यांच्या यशातून मिळते. विद्यार्थी तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून घेतात. असे प्रतिपादन नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभातुन केले.               कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूल मधील कला, वाणिज्य ... Read More »

विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात.

राजतंत्र न्युज नेटवर्क             मनोर, ता.१२ : चिल्हार फाटा येथील पागी पाड्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राचे (ट्रान्सफॉर्मर) खांब गंज लागून वाकल्याने उच्च विद्युत दाबाची तार तुटली आहे. त्यामुळे पागी पाडा तीन दिवसापासून अंधारात आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालागतच्या चिल्हार पागी पाड्याला महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहीत्राचे खांब गंजले आहेत.आणि त्यांमुळे रोहित्र कलंडण्याच्या स्थितीत आले ... Read More »

Scroll To Top