दिनांक 23 April 2019 वेळ 5:29 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 4)

Category Archives: महान्यूज़

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर सोशल मिडीयावर पोलीसांचा वॉच

मेसेज फॉरवर्ड करताना सावधान; पालघर पोलीसांचा इशारा राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 18 : देशात लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्या असुन निवडणूक काळात राजकिय नेते, एखादा व्यक्ती किंवा एखाद्या समाजाविषयी कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण न होण्याच्या दृष्टीने पालघर पोलीस जिल्ह्यातील नागरीकांच्या सोशल मिडीयावर वॉच ठेवत असुन तेढ निर्माण करणारे कोणतेही संदेश फॉरवर्ड करताना सावधानता बाळगा, असे आवाहन पालघर पोलीसांनी केले आहे ... Read More »

वाडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांविरोधात उपोषण

मनमानी व अकार्यक्षम कारभाराचा आरोप! सत्ताधारी शिवसेना सदस्यांचीही जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार प्रतिनिधी/वाडा, दि. 18 : वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यावर मनमानी व अकार्यक्षम कारभाराचा आरोप करत तसेच नगरपंचायतीच्या सामान्य तपासणी दरम्यान तपासणी अधिकार्‍यांनी मुख्याधिकारी मवाडेंवर ठेवलेल्या ठपक्यांच्या अनुषंगाने कारवाई व्हावी, या मागणीसाठी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे निखिल भानुशाली व सामाजिक कार्यकर्ते अनंत सुर्वे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन ... Read More »

सहजीवन जेष्ठ नागरिक संघातर्फे गरजूंना जुन्या कपड्यांचे वाटप

Share on: WhatsApp Read More »

चारोटी येथे 18 लाखांचे 450 ग्राम मेफेड्रोन जप्त!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 13 : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी हद्दीत 18 लाख रुपये किंमतीची 450 ग्राम मेफेड्रोन पावडर (ड्रग्स) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असुन कासा पोलीस स्टेशन व मुंबई गुन्हे प्रतिबंधक शाखेने ही कारवाई केली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील मुंबई वाहिनीवर काल, मंगळवारी पहाटे कासा पोलीस स्टेशन व मुंबई गुन्हे प्रतिबंधक शाखेचे ... Read More »

विक्रमगड येथे लाच देण्याच्या प्रयत्नात डॉ. दिगंबर जेठे यास एसीबीकडून अटक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विक्रमगड, दि. १३:  येथील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिगंबर पुरुषोत्तम जेठे यास वनविभागाच्या अधिकाऱ्याला 3 लाख रुपयांची लाच देताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर युनिटने सापळा रचून ही कारवाई केली.  जेठे याने वनविभागाच्या मालकीच्या जागेत बांधकाम केले होते. ही बांधकामे पाडून टाकण्याची कारवाई करु नये याकरिता जेठेने वन विभागाच्या अधिकाऱ्याला 3 लाख रुपयांचे आमिष दाखविले. याबाबत ... Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 11 : तालुक्यातील नालासोपारा भागात अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर 2 वेळा लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. रमेशकुमार राजाराम शर्मा (वय 33) असे आरोपीचे नाव असुन पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेशकुमार शर्मा व पिडीत मुलगी एकाच इमारतीत राहावयास असुन 4 ... Read More »

ग्रामीण साहित्य हे अंतरंगातून स्फूरलेलं वास्तवदर्शी साहित्य – विजया मारोतकर

कुडूस येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन संपन्न! राजतंत्र न्यूज नेटवर्क/कुडूस, दि. 11 : ‘ग्रामीण साहित्याने वास्तववादी चित्रण केले असून ते ही दर्जेदार साहित्य आहे. व्याकरण, छंद या भाषीक परिघात स्वतःला न अडकवता अंतरंगातून जे स्फूरलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या साहित्यिकांनी केला आहे.’ असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिका आचार्य विजया मारोतकर यांनी केले. वाडा तालुक्यातील कुडूस येथे साहित्य कला विचारमंच आयोजीत ... Read More »

डहाणूत विचित्र अपघातात बोमी मुबारकाई यांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 10: आज डहाणू शहरात झालेल्या विचित्र अपघातात बोमी इराणी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला असून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. मेरवान इराणी, हॉटेल पर्लाईनचे रॉनी इराणी व त्यांच्या पत्नी परिवाझ (पल्ली) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे सर्व जण जयपूर येथील एका लग्नसमारंभात उपस्थित राहून विमानाने मुंबईला आले व तेथून एकाच कारमधून मुंबईहून डहाणू येथे येत होते. त्यांच्यासोबत ... Read More »

धनगरांना दिलेल्या सवलतींविरोधात आदिवासी आक्रमक!

रॅली काढून व ठिय्या आंदोलन करत केला निषेध दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 10 : शासनाने धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाला अनेक आदिवासी संघटनांचा विरोध आहे. या निर्णयामुळे धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी केल्याची भावना आदिवासींमध्ये असुन याविरोधात मोखाड्यातील आदिवासी समाज संघटनेने आक्रमक होऊन, खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढली होती. तसेच बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवून शिवाजी ... Read More »

आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांचे वाटप!

वनपट्ट्यांसह आदिवासींना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणाचा प्रयत्न -मंत्री विष्णू सवरा प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : जिल्ह्यातील आदिवासी बांधव वर्षानुवर्षे अती दुर्गम भागातील वन विभागाच्या शासकीय जमिनी कसत आला आहे. अशा आदिवासी बांधवांना काल, शनिवारी वन मित्र मोहिमे अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. सकाळी 12 वाजता एच. एम. पी. शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी अध्यक्ष ... Read More »

Scroll To Top