दिनांक 09 December 2019 वेळ 10:13 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 38)

Category Archives: महान्यूज़

डहाणूत शेतकरी संघटनेचे रेल रोको आंदोलन

सरकार शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे झुकली! -खासदार राजू शेट्टी शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 18 : महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकर्‍यांनी मागील दोन दिवसांपासून दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. बाजारात दुधाचा पुरवठा होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांतर्फे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने चालू आहेत. त्यातच काल, मंगळवारी गुजरातहून रेल्वेमार्गे मुंबईला दुधाचा पुरवठा करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्याने याविरोधात ... Read More »

वाडा : माजी उप जिल्हाधिकार्‍यांच्या घरावर दरोडा

>> पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटला दिनेश यादव/वाडा, दि. 17 : तालुक्यातील वडवली येथे राहणारे व महसूल विभागाच्या उप जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लुटल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 3.25 वाजताच्या सुमारास सात ... Read More »

दाबोसा धबधब्याकडे जाणारा रस्ता खचला दोन महिन्यापुर्वीच झाले होते रस्त्याचे काम

प्रतिनिधी              जव्हार, दि.१६ : तालुक्यातील प्रसिद्ध अशा दाबोसा धबधब्याकडे जाणारा एकमेव रस्ता रविवारी झालेल्या पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह पर्यटकांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर अवघ्या 2 महिन्यांपुर्वीच बांधण्यात आलेला हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्याने रस्त्याच्या बांधकामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असुन निकृष्ट कामाचा आरोप होत आहे.         ... Read More »

लाटांचा तडाखा बसलेल्या सातपाटी गावाला शिवसेना आमदार अमित घोडांची भेट

वार्ताहर           बोईसर, दि. १५ : मागील काही दिवसांपासुन कोसळणारा मुसळधार पाऊस व त्यात काल, शनिवारी समुद्राला आलेल्या उधाणाचा पालघर जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावरील अनेक गावांना तडाखा बसला आहे. पालघर तालुक्यातील सातपाटी गावातही समुद्राचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नुकसान झाले आहे. आज, आमदार अमित घोडांसह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सातपाटी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच भरपाई देण्याचे आश्वासन ... Read More »

मनोर परिसरात मुसळधार पाऊस

प्रतिनिधी मनोर, दि. १५ : रविवार सकाळपासून मनोर परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने वैतरणा, देहरजा आणि हात नदी या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली असून त्या तुडुंब भरून वाहत आहेत. प्रशासनामार्फत नदीकिनारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मस्तान नाका येथे श्रीकांत पेट्रोल पंपासमोरील व महालक्ष्मी हॉटेल समोर गटार तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ... Read More »

पोलीस अधिक्षकांचा कनेक्टींग पालघर उपक्रम वरिष्ठांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस कर्मचार्‍यांच्या अडचणींचा निपटारा होणार

राजतंत्र न्युज नेटवर्क              पालघर, दि. १५ : दिवसातील १२ – १२ तास कर्तव्य बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना भेडसावणार्‍या विविध अडचणींचा निपटारा करण्यासाठी पालघर पोलीस अधिक्षकांतर्फे कनेक्टींग पालघर उपक्रम सुरु करण्यात आला असुन जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमधून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ तसेच संबंधित अधिकार्‍यांशी संवाद साधुन कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.         ... Read More »

मनोर शहरातील रस्ते झाले खड्डेमय

>> सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता दुरुस्तीस नकार प्रतिनिधी/मनोर, दि. 13 : पालघर-मनोर राज्यमार्गाच्या मनोर हद्दीतील रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठं-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी आणि वाहनचालकांना खड्ड्यांतून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पालघर-मनोर मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करण्यास नकार दिला आहे. मनोर शहरातील शिवसेना जिल्हा कार्यालयाशेजारील गटार तुंबल्याने पावसाचे पाणी ... Read More »

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बोईसरकर हैराण,

चित्रालय रस्त्याला तलावाचे स्वरुप! वार्ताहर/बोईसर, दि. 13 : बोईसर-तारापूर रस्त्यावर असलेल्या चित्रालय व सिडको भागातील रस्त्यांवर मोठं-मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन प्रवास करताना बोईसरकरांचे माठे हाल होत आहेत. थोडा जरी पाऊस पडला तरी या खड्ड्यांमध्ये पाणी भरुन रस्त्याला तलावाचे स्वरूप आलेले पहावयास मिळते. सालवड ग्रामपंचायती अंतर्गत मोडणार्‍या चित्रालय भागात शॉपिंग सेंटर असल्याने तसेच एमआयडीसी, बीएआरसी कॉलनी व टॉप्स कॉलनीकडे जाण्यासाठी ... Read More »

पालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल

6 दरोडेखोरांसह 2 सोनसाखळी चोरटे गजाआड राजतंत्र मिडीया / पालघर दि. १२ : अलीकडेच पालघर ते मनोर दरम्यानच्या रस्त्यावरील वाघोबा खिंडीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील 2 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले असून काही दिवसांपुर्वीच एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याप्रकरणी 4 आरोपींना देखील मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. त्या शिवाय पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोटारसायकलवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या ... Read More »

विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

वार्ताहर            बोईसर, दि. 11 : ट्युशन क्लासेसच्या नावाखाली भरपावसात विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बोईसर येथे घडली असुन राकेश यादव असे सदर मुलाचे नाव आहे.            न्यू राऊत वाडी येथे राहणारा राकेश यादव हा आदर्श विद्यालयात 8 वी इयत्तेत शिक्षण घेत होता. काल, मंगळवारी अतिवृष्टीमुळे ... Read More »

Scroll To Top