दिनांक 04 July 2020 वेळ 2:07 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 31)

Category Archives: महान्यूज़

बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीत बीएआरसीची आडकाठी

>>जागेच्या वादामुळे रखडले काम >>जुन्या इमारतीतील अपुर्‍या जागेमुळे रुग्णांचे हाल वैदेही वाढाण/बोईसर, दि. 29 : काही वर्षांपुर्वी शासनाने बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर केलेल्या जागेवर भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) व तारापूर अणुऊर्जा केंद्राने (एनपीसीआयएल) आपला ताबा सांगत आडकाठी निर्माण केल्यामुळे बोईसरमधील गरीब व कामगार वर्गाला आणखी काही काळ नवीन ग्रामीण रुग्णालय इमारतीची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बोईसर शहर आज ... Read More »

वाडा-मनोर मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

दिनेश यादव/वाडा, दि. 28 : वाडा-मनोर महामार्गावरील वरले गावाजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या टेम्पाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर वाड्यातील शर्वरी रुग्णालयात उपचार सुरु असुन सुप्रीम कंपनीच्या अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या कामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. विक्रमगड तालुक्यातील आपटी येथील दिनेश हडळ (वय 22) आणि रोहित ... Read More »

बंद पडलेल्या डिजिटल शाळांना पेसाने दिले जीवनदान

> आसे केंद्रातील 14 शाळांचे सौरउर्जेद्वारे विद्युतीकरण दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील 2035 डिजीटल शाळांपैकी बहूतांश शाळांमध्ये थकित विजबिलांमुळे अंधाराचे साम्राज्य आहे. मात्र आसे ग्रामपंचायतीने यावर नामी उपाय काढत पेसाच्या निधीतुन शाळांना सोलर पॅनल देऊन बंद पडलेल्या डिजिटल यंत्र सामुग्रीला सौरउर्जेद्वारे जिवनदान दिले आहे. त्यामुळे येथील 14 शाळा पुन्हा झगमगाटल्या असुन अशाच प्रकारे निधीचा योग्य वापर केल्यास जिल्ह्यातील ... Read More »

जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

पहिल्या दिवशी 25 हजार मुलांचे लसीकरण Rajtantra Media/पालघर, दि. 27 : शासनातर्फे जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील तब्बल 8 लाख बालकांना गोवर व रुबेला लस देण्यात येणार असून या मोहिमेचा आज सर्व तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी जवळपास 25 हजार मुला-मुलींना ही लस देण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या हस्ते वाड्यातील पी. जे. ... Read More »

जव्हार तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करा, शेतकर्‍यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा!

प्रतिनिधी/जव्हार, दि. 26 : जव्हार तालुक्याला दुष्काळ यादीतुन वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून जव्हार तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी आज, सोमवारी जव्हार शहर कडकडीत बंद करून नुकसान झालेले भात पिकं घेऊन शेतकर्‍यांनी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्ह्यात परतीच्या पावसाने दडी मारल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती ओढवली आहे. यात जव्हार तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले असताना ... Read More »

बोईसरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी, 4 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास

वार्ताहर बोईसर, दि. 25 : येथील अमेय पार्क भागात घरी कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी चार लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रविवारी दिवसाढवळ्या ही घरफोडीची घटना घडली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेय पार्कमधील संस्कृती या इमारतीत दिनेश संखे यांचा फ्लॅट आहे. दिनेश संखे आपल्या विक्रमगडमधील उपराळे गावी त्यांच्या कुटुंबासह गेले ... Read More »

वाडा : अपघातग्रस्त कारमध्ये आढळले 150 किलो गोमांस

प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : राज्यात गोहत्या व गोमांस खरेदी-विक्रीवर बंदी असताना ठिकठिकाणी अवैधरित्या गोमांस तस्करीच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच वाडा तालुक्यातील गोर्‍हे-खानिवली रस्त्यावर एका अपघातग्रस्त कारमध्ये गोमांस आढळल्याने पालघर जिल्ह्यातही गोमांस तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. वाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोर्‍हे – खानिवली रस्त्यावरील खुटलपाडा येथे शनिवारी (दि. 24) रात्रीच्या सुमारास एम.एच.01/सी.ए. 1020 या क्रमांकाच्या होंडा ऍसेंट कारचा ... Read More »

दुष्काळ म्हणजे नक्की काय हो साहेब? मोखाड्यातील शेतकर्‍यांचा सवाल

 सदोष आणेवारीने शेतकरी हवालदिल प्रतिनिधी/मोखाडा, दि. 23 : तालुक्यात शेवटच्या पावसाने कायमची दडी मारल्याने गरवे पिकांबरोबरच इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असतानाही दुष्काळी परिस्थिती नसल्याचे शासकिय आकडेवारी सांगत आहे. त्यामुळे दुष्काळ म्हणजे नक्की काय हो, साहेब? असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकर्‍यांकडून विचारला जात आहे. मोखाडा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत हद्दीतील 59 गांवांमधील पिकाखाली ... Read More »

गोवर व रूबेला लसीविषयी कोणताही संशय न बाळगण्याचे आवाहन

Rajtantra Media/पालघर, दि. 22 : गोवर व रूबेला लसीविषयी कोणताही संशय बाळगू नये, असे आवाहन डॉ. मिलिंद चव्हाण यांनी सर्व धर्मगुरुंना केले आहे. या लसीकरणाविषयी मनोर येथे आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. संक्रमक व घातक अशा गोवर व रूबेला आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत 28 राज्यातील 3.5 कोटींहून अधिक मुला-मुलींना गोवर व रूबेला लस देण्यात आली ... Read More »

शिवसेना गटनेत्याला उपरती, पत्रकारांची मागितली माफी

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 21 : मोखाडा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी 19 नोव्हेंबर सर्व विरोधी पक्षांनी होळी आंदोलन केले होते. या आंदोलनात पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या विरोधात गरळ ओकत त्यांच्या दौर्‍याच्या बातम्या प्रसिद्ध करणार्‍या पत्रकारांना मुर्ख म्हटले होते. या घटनेचा पत्रकारांनी निषेध व्यक्त केल्यानंतर उपरती झालेल्या प्रकाश निकम यांनी सर्व पत्रकारांना ... Read More »

Scroll To Top