दिनांक 21 January 2020 वेळ 5:52 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 3)

Category Archives: महान्यूज़

पालघरमध्ये 96.62 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : पालघरमधील विविध भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व नविन रेल्वे उड्डाण पुल उभारण्यासाठी शासनातर्फे 96 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर असुन पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या कामांचा आज, सामेवारी शुभारंभ करण्यात आला. कोळगाव येथे नविन रेल्वे उड्डाण पुल, जुन्या पालघर ते हनुमान चौक रस्त्याचे काँक्रीटीकरण व नंडोरे ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता तयार करणे आदी कामांचा यात ... Read More »

डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला असून आज, रविवारी पहाटे काही भागांमध्ये 3.8 रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांची झोप उडवली. डहाणू तालुका हा भूकंपग्रस्त तालुका समजला जातो. गेले वर्षभर येथील धुंदलवाडी, हळदपाडा, बहारे, वंकास यांसारख्या भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत. काही दिवसांपासुन भूकंपाचे धक्के बंद झाल्याने या भागातील नागरीकांना दिलासा मिळाला होता. मात्र 12 ... Read More »

मनोर : अज्ञाताने केलेल्या गोळीबारात प्रॉपर्टी डीलर थोडक्यात बचावला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना वार्ताहर/बोईसर, दि. 12 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर-टेन गावच्या हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका कारवर दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली असून कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे कारच्या मागील सीटच्या काचेवर गोळी लागल्याने तो बचावला आहे. या प्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई येथील रहिवासी सुजित पाटकर हे बुधवारी (दि. ... Read More »

बोईसरमध्ये चोरट्यांकडून बँका फोडण्याचा प्रयत्न

वार्ताहर/बोईसर, दि. 11 : बोईसर येथील एयु स्मॉल फायनान्स बँक तसेच एचडीएफसी ली. बँकेची शाखा मंगळवारी (10) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यशस्वी न झाल्याने चोरट्यांना रिकाम्या हातीच पळ काढावा लागला. दरम्यान, बोईसर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन बोईसर पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. ... Read More »

राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्वाची गरज; रेखाताई पष्टेंना विधान परिषद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला असताना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे सर्वच राजकीय धुरिणांना अचंबित करणारे ठरले आहे. कोणताही महत्वाचा नेता पक्षात नसताना पक्षाने विक्रमगड व शहापूर विधानसभा मतदारसंघात चांगले यश मिळविल्याने पालघर जिल्ह्याला खंबीर नेतृत्व असते तर अधिक चांगले यश मिळवता आले असते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तर अशीच ... Read More »

मोखाडा तालुका कृषी अधिकार्‍यांचा संगीत खुर्चीचा खेळ

वर्षभरापासून सुरु आहे पदाचा गोंधळ वरिष्ठांचा मनभाईसा कारभार रोहयोच्या कामांना खोडा कर्मचार्‍यांचे पगारही लांबले दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 4 : मोखाड्यातील तालुका कृषी अधिकारी पद मागील 1 वर्षांपासून रिक्त आहे. सद्यस्थितीत येथे प्रशासकीय व आर्थिक अशा वेगवेगळ्या जबाबदार्‍या देऊन 2 अधिकार्‍यांमार्फत कारभार चालविला जात आहे. त्यामुळे कोणाचाही पायपोस कोणाच्याच पायात राहिला नसल्याने रोहयोची कामे खोळंबली असून कर्मचार्‍यांचे पगारही लांबले आहेत. अधिकार्‍यांची ... Read More »

वाडा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी शासनाकडून 1.92 कोटींची मदत

तुटपुंजी मदत देऊन जखमेवर मीठ चोळण्याचा शासनाचा प्रयत्न; शेतकर्‍यांचा आरोप हजारो शेतकरी मदतीपासून वंचितच प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : वाडा तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍याच्या हातून हिरावला आहे. या ओल्या दुष्काळानंतर हताश झालेले तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाकडे मदतीसाठी डोळे लावून बसले होते. त्यानुसार शासनाने 1 कोटी 92 लाखाची मदत जाहीर केली आहे. मात्र ... Read More »

सुर्या नदीवरील पुलाचे 5 वर्षात केवळ 70 टक्के काम!

जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास वार्ताहर/बोईसर, दि. 3 : बोईसर शहराला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार्‍या व येथील औद्योगिक वसाहतीमुळे दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असणार्‍या बोईसर-चिल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या रस्त्यावरील सुर्या नदीवरील पुल अतिशय जीर्ण झाल्याने जुन्या पुलालगतच नवा पुल बांधण्यात येत आहे. मात्र जुन्या पुलाची अवस्था बिकट असल्याने लवकरात लवकर नविन पुलाचे काम पुर्ण ... Read More »

डहाणू : वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

वार्ताहर/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुक्यातील घाट (पाटीलपाडा) येथील कु. सारिका रघु पाटकर या 16 वर्षीय विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारिका ही वरवाडा आश्रम शाळेत इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. मात्र अभ्यास झेपत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. डहाणू तालुक्यातील पाटीलपाडा येथील चार मैत्रिणींनी आपले दहावीपर्यंतचे एकत्र शिक्षण ... Read More »

बोईसर : महावितरणाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दिड हजारांची लाच घेताना अटक

नवीन मीटरसाठी केलेल्या अर्जांच्या सर्वेक्षणासाठी केली होती लाचेची मागणी राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 1 : महावितरणच्या बोईसर उप विभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दिड हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. बोईसमधील भिमनगर येथे शनिवारी (दि.30) ही सापळा कारवाई करण्यात आली. पंकज सदानंद धनपाल (36) असे सदर लाचखोर तंत्रज्ञाचे नाव असून नवीन मीटरसाठी केलेल्या अर्जाचे सर्वेक्षण करण्यासाठी ... Read More »

Scroll To Top