दिनांक 04 July 2020 वेळ 2:28 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 29)

Category Archives: महान्यूज़

वाहतूक पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात

>> पोलीस उपनिरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी प्रतिनिधी/मनोर, दि. 23 : मस्तान नाका पुलाच्या उतारावर टँकरने वाहतूक पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षकासह दोन वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. काल, शनिवारी (दि.22) मध्यरात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका पुलाच्या उतारावर हा अपघात घडला. वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे मस्तान नाका येथे अवजड वाहतुकीचे नियोजन केले जाते. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री ... Read More »

पालघर सरस : पहिल्या दिवशी सात लाखांची उलाढाल

Rajtantra Media/पालघर, दि. 23 : जिल्ह्यात राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेमार्फत आयोजित सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी महिला बचत गटांची जवळपास सात लाख रुपयांची विक्री झाली. यामध्ये वारली चित्रकलेच्या स्टॉल्सवर 29 हजार 295 रुपयांची, ज्वेलरीच्या स्टॉल्सवर 36 हजार 960 रुपयांची, सजावट व शोभेच्या वस्तूंची 57 हजार 870 रुपयांची, ... Read More »

अंतिम आणेवारीने मोखाडा ठरणार दुष्काळ ग्रस्त

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 21 : यंदा खरीप हंगामाच्या पिकांना सुमारे दीड महिना पावसाचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे मोखाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पहिल्या दोन टप्प्यातील आणेवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आल्याने मोखाडा तालुका दुष्काळाच्या यादीत आला नाही. मात्र, आता अंतिम आणेवारीचे काम पूर्ण झाले असून भाताची 42:84 तर नागली आणि वरईची अंतिम आणेवारी 44:59 टक्के आली आहे. शासनाच्या ... Read More »

खोडाळा मंडळ कृषी कार्यालय कायम कुलूपबंद: कास्तकारांचे हाल, शेतकरी जातात विन्मूख, जलयुक्त शिवार वार्‍यावर

  प्रतिनिधी मोखाडा, दि. 19 : खोडाळा येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय कायम कुलूपबंद राहत असल्याने विविध कामांसाठी कार्यालय गाठणार्‍या खोडाळा आणि परिसरातील गावपाड्यातील शेतकर्‍यांना प्रचंड त्रास होत आहे. येथे साधा शिपाई देखील हजर राहत नसल्याने शेतकर्‍यांना शंकानिरसन न होताच विन्मूख परतावे लागत असून कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराची दाद मागायची तरी कोणाकडे? असा प्रश्‍न सर्वसामान्य शेतकर्‍यांना भेडसावत आहे. मोखाडा तालुक्यातील ... Read More »

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात अविष्कार संशोधन परिषद संपन्न!

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. 17 : मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या शुक्रवारी (दि. 14) 93 व्या अविष्कार-रिसर्च कन्व्हेंशन या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये संशोधनाविषयी गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या विभाग – 4 म्हणजेच पालघर जिल्ह्यातील सुमारे 12 महाविद्यालयाच्या 150 मुलांनी ... Read More »

पालघर : अनैतिक संबंधातून पतीची हत्या, पत्नी व तिच्या प्रियकराला जन्मठेप

Rajtantra Media/पालघर, दि. 17 : प्रियकराशी संबंध ठेवण्यात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराच्या मदतीने त्याचा खून करणार्‍या पत्नीसह तिच्या प्रियकराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. समिधा समीर पिंपळे व संतोष यादव संखे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे असुन 9 जुलै 2015 रोजी या दोघांनी मिळून समीर हरेश्‍वर पिंपळे यांचा खून केला होता. समिधा व समीर पिंपळे (36) ... Read More »

मोखाडा पशूसंवर्धन विभागात कर्मचार्‍यांचा वाणवा

>> डॉक्टर झाले शिपाई, शिपाई झाले डॉक्टर दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 16 : मोखाडा तालुक्यातील पशुवैद्यकिय विभागात वैद्यकिय अधिकार्‍यांसह इतर कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असुन मागील दोन वर्षांत कर्मचार्‍यांच्या अनुशेषात अधिकच वाढ झाली आहे. त्यामुळे डॉक्टर नसलेल्या ठिकाणी इतर कर्मचार्‍यांवर तर कर्मचारी नसलेल्या ठिकाणी डॉक्टरांवर अतिरिक्त कामांचा ताण पडत आहे. मोखाडा तालुका पशुसंवर्धन विभागाकडे आजमितीस पशुधन विकास अधिकारी (विस्तार), सहाय्यक ... Read More »

विराथन खुर्दच्या ग्रामस्थांनी रोखले बुलेट ट्रेनचे सर्व्हेक्षण

प्रतिनिधी/मनोर, दि. 14 : सफाळे नजीकच्या विराथन खुर्द येथे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकर्‍यांना गावकर्‍यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. सुमारे 10 ते 15 अधिकारी मोठ्या पोलीस फौजफाट्यासह याठिकाणी मोजणीसाठी आले होते. मात्र या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी सर्व्हेक्षण करू दिले नाही. या गावात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादनात जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी नुकतेच येथे रुग्णालय सुरू करण्यात आले होते. मात्र हे रुग्णालय ... Read More »

सहा महिन्यांपासून वेतन रखडले, कामगारांचे बेमुदत उपोषण

प्रतिनिधी वाडा, दि. 13 : तालुक्यातील वाडा व कोंढले येथील कॅपॅसीटे स्ट्रक्चरल या कंपनीतील कर्मचार्‍यांना मागील सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने याविरोधात कोकण विकास कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली कंपनीतील दहा कामगार गुरुवार सकाळपासून वाडा येथील कंपनीच्या गेटबाहेर आमरण उपोषणास बसले आहेत. 26 नोव्हेंबर रोजी येथील कामगारांनी उपोषण करणार असल्याबाबतचे पत्र कंपनी प्रशासनाला दिले होते. यावेळी तीन ते चार दिवसात सर्व कामगारांचे ... Read More »

वर्सोवा पुल दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक पोलिसांची चांदी! 500 ते 1000 रुपये घेऊन सोडली जाताहेत अवजड वाहन

प्रतिनिधी मनोर, दि. 7 : महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामास मागील शुक्रवारी (दि. 7) सुरुवात करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या काळात अवजड वाहतूक वाडा-भिवंडी या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि नियोजनाच्या अभावामुळे महामार्गावरील मस्तान नाका ते नांदगावपर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागत आहेत. याचाच फायदा घेत येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस या अवजड वाहनांच्या चालकांकडून पैसे घेऊन मस्तान ... Read More »

Scroll To Top