दिनांक 27 May 2019 वेळ 6:51 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 22)

Category Archives: महान्यूज़

पेसाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न!

पालघर, दि. 28 : जिल्ह्यात आदर्श पेसा गाव निर्मितीसाठी सर्व तालुकास्तरीय अधिकारी, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वय साधून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पंचायत क्षेत्र विस्तार कायदा 1996 (पेसा) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित कार्यशाळेत केले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी ... Read More »

वाड्यात पोलीसांची शेतकर्‍यांना मारहाण

> रिलायन्सच्या भूसंपादन मोबदल्यावरुन वाद, 13 शेतकर्‍यांना अटक  वाडा, दि. 27 : वाडा तालुक्यातून रिलायन्स कंपनीच्या इथेन गॅस पाईपलाईनचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी संध्याकाळी तालुक्यातील बिलोशी या गावात कंपनीतर्फे पाईपलाईन झाकण्याचे काम सुरू असताना भूसंपादन मोबदल्यावरुन पोलीस व शेतकर्‍यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी एका शेतकर्‍याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला ... Read More »

पालघर-मनोर रस्त्याची देखभाल दुरुस्ती वार्‍यावर

> राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरणाची प्रकिया रखडली मनोर/प्रतिनिधी (दि. 24) : फेब्रुवारी 2018 पासून नव्याने घोषित झालेल्या 160-अ राष्ट्रीय महामार्गात पालघर-मनोर रस्त्याचा समावेश करण्यात आल्याने या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र हस्तांतरण प्रक्रियेला विलंब होत असल्याने मागील 6 महिन्यांपासुन रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या 6 फेब्रुवारी 2018 च्या ... Read More »

वाड्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

हत्या की आत्महत्या गुढ कायम वाडा/प्रतिनिधी, दि. 23 : तालुक्यातील डाहे येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास रस्त्यावरील मोरीच्या पाईपामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. रंजना राजेंद्र दिवा असे मृत महिलेचे नाव असुन काल रंजनाचा एका महिलेशी वाद झाला होता. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रंजना दिवा (वय 26) ही महिला ... Read More »

पोटच्या मुलीच्या नकारानंतर मनोरकरांनी केले मृत महिलेवर अंत्यसंस्कार

मनोर/प्रतिनिधी, दि. 23 : मृत आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोटच्या मुलीने गुजरातहुन येण्यास नकार दिल्याने मनोरच्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी त्या मृत महिलेचे अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले. मनोरच्या हायस्कुल डोंगरी भागात दहा वर्षांपासून राहणार्‍या निरुबेन पटेल (60) यांचा काल, बुधवारी आजारपणामुळे मृत्यू झाला. अहमदाबाद येथे राहणारी त्यांची एकुलती एक मुलगी आणि जावयाला याबाबत माहिती देण्यात आली. मात्र मुलीने आईवर अंत्यसंस्कार करण्यास येण्यास असमर्थता ... Read More »

उप मुख्य कार्यकरी अधिकाऱ्याच्या नियुक्तीविरोधात जिल्ह्यातील ग्रामसेवक सामूहिक रजेवर

वार्ताहर बोईसर, दि. २१ : पालघर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आलेल्या अशोक पाटील यांच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप करत या नियुक्तीला विरोध म्हणून जिल्ह्यातील ग्रामसेवक कालपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. तर आदिवासी एकता परिषदेने व आदिवासी संघटनेने या नियुक्तीचे स्वागत केले . गोंदिया जिल्ह्यातील गटविकास अधिकारी अशोक पाटील यांची नुकतीच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उप ... Read More »

इस्त्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील शाळेचा कायापालट

वाडा, दि. 19 : विविध क्षेत्रातील 40 इस्त्रायली विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील शाळा नंबर-2 या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसात या विद्यार्थ्यांकडून शाळेचा कायापालट करण्यात येणार आहे. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व नगरसेवक मनिष देहेरकर, गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव तसेच रोहन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या इस्त्रायली विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. वाड्यात दाखल झालेले हे ... Read More »

वाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;

पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद बोईसर, दि. 17 : भाजपाचे जेष्ठ नेते व माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे काल, सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला बोईसरवासियांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. तर पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. भारतीय राजकारणातील महान ऋषीतुल्य असे व्यक्तीमत्व असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या महानिर्वाणाने संपूर्ण देश हळहळला. ... Read More »

अविरत देशसेवेचे व्रत घेतलेला नेता हरपला -विष्णू सवरा

भाजपाच्यावतीने स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाडा, दि. 17 : आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व देशाला समर्पित केलेला नेता आज आपल्यातून निघून गेला असून अटलजींच्या जाण्याने भाजपाची नव्हे तर देशाची अपरिमित हानी झाल्याची प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केली. देशाचे माजी पंतप्रधान, कवी मनाचे लोकप्रिय नेते, संवेदनशील राजकीय नेतृत्व भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी यांचे ... Read More »

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाने समृद्ध आणि सर्जनशील नागरिक बनावे! – संजीव जोशी

उल्हास पाध्ये  बोईसर दि. १४: विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाने समृद्ध आणि सर्जनशील नागरिक बनावे. केवळ परिक्षेमध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करु नका. आवडीचा अभ्यासक्रम निवडा किंवा निवडलेल्या अभ्यासक्रमात आवड निर्माण करा असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी बोईसर येथे बोलताना केले. ते पंचतत्त्व सेवा संस्था व स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी (बोईसर) या संस्थांतर्फे पंचक्रोशीतील शाळांतील १० वी व १२ वी ... Read More »

Scroll To Top