दिनांक 12 December 2019 वेळ 9:44 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 21)

Category Archives: महान्यूज़

वसईत कारशेडला आगे, 100 गाड्या जळून खाक

राजतंत्र न्युज नेटवर्क वसई, दि. 27: येथील टॅब कॅब कंपनीच्या कारशेडला लागलेल्या आगीत तब्बल 100 गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हे कारशेड वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत एका खुल्या जागेवर आहे.  वसई पूर्वेला ससूननगरमधील मालाजी पाडा भागात हे कारशेड आहे. या कारशेडला शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. याची ... Read More »

वाड्यातुन अनेक दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना

राजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. २५ : संत निवृत्तीनाथांची यात्रा ३१ जानेवारी रोजी असते. त्यासाठी वाडा तालुक्यातुन पायी दिंड्या शुक्रवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. तालुक्यातुन ठिकठिकाणावरुन निघालेल्या दिंड्यातील वारकऱ्यांना भक्तीभावाने निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वाडा तालुक्यातील मेट, देवघर ,नांदनी अंभरभुई, दिनकरपाडा, लोहपे, खानिवली, गुंज, अबिटघर, तिळसा, खरीवली, झिडके, या गावांसह पंधराहून अधिक ... Read More »

बोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब

वैदेही वाढाण बोईसर, दि. २५: तारापूर औद्योगिक परिसरातील ई-93 व 94 या प्लॉटमधील साळवी केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये आज पहाटे ड्रायरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये ६ कामगार भाजून जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या कारखान्यांमधील ड्रायरमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोट झाला व त्याच दरम्यान विजपुरवठा खंडीत झाल्याने एकच गोंधळ माजला. कामगार सैरावैरा पळू ... Read More »

मैदान मिळविण्यासाठी आंदोलनात सहभागी न होणार्‍या कुटूंबावर सातपाटी ग्रामस्थांचा बहिष्कार

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. 24 : पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील गावकर्‍यांनी अनिल चौधरी या मच्छीमार व्यावसायिकाला एका वर्षापासून वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आला असून चौधरी कुटूंबियांनी पोलीसांकडे कैफियत मांडली आहे. गावकर्‍यांनी 2017 मध्ये वादग्रस्त जागेचा मैदानासाठी कब्जा घेण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनात सहभाग न घेतल्याची शिक्षा मिळाली असून कुटूंबियातील 7 वर्षीय मुलीशी देखील कोणी बोलत नाही इतका हा बहिष्कार कडक असल्याचा ... Read More »

सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा 

जव्हार, दि. २३:  येथील पळसूंडे गावच्या हद्दीतील सैन्य पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्रात भेडसावणाऱ्या विविध समस्या व अपुऱ्या  सोयी सुविधांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रकल्प कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करीत महादेव कोळी समाज उन्नती मंडळाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी उपस्थित नसल्याने सहाय्यक प्रकल्प अधिकारी  यांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व लवकरात लवकर शासन ... Read More »

हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणार्‍या ट्रकला अपघात ट्रक जळून खाक, चालक जागीच ठार

डहाणू दि. 22: गुजरात मुंबई महामार्गावर चारोटी येथील पुलावर हायड्रोजन गॅसचे सिलेंडर वाहतुक करणार्‍या ट्रकला अपघात झाला असून अपघातात लागलेल्या आगीमुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जागीच जळून मृत्यूमुखी पडला आहे. भरोडा ते तळोजा येथील श्री जी कार्बोनिक कंपनीचा हा हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास कासा पोलीस ... Read More »

घोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार

वाडा, दि. 22: तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी, नियमबाह्य व भ्रष्ट कारभार सुरु असल्याचा आरोप करीत या कारभाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य विकास घरत यांनी पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे एका तक्रारी द्वारे केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरु असून या कारभारामुळे ग्रामपंचायतीने शासकीय नियम धाब्यावर बसवले आहेत. या ग्रामपंचायतीत ग्रामनिधीतून विकास कामे ... Read More »

प्राणिशास्त्राकडे सकारात्मकतेने पहावे- डॉ. संजय भागवत

पालघर,दि. 22 : विद्यार्थ्यांनी प्राणिशास्त्र विषयाकडे सकारात्मकतेने पहाण्याची गरज असून मधुमक्षीका पालन, दुग्धप्रकल्प, शेळीपालन, कोळंबी प्रकल्प, शोभिवंत माशांचे प्रजनन व विक्री, जैवमाहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन, पर्यावरणीय अहवाल बनविणे अशा विविधी क्षेत्रात रोजगार व उद्योगाच्या संधी आहेत, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन प्राणिशास्त्रज्ञ डॉ. संजय भागवत यांनी पालघर येथे बोलताना केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्राणिशास्त्रातील संशोधन आणि रोजगाराच्या संधी या ... Read More »

एमआयडीसी व एमपीसीबीची संयुक्त चौकशीला सुरुवात

बोईसर, दि .२१ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील के झोन परिसरात रात्रीच्या सुमारास विषारी वायु मिश्रित घटक रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे चौकशी सुरु केली असून सांडपाणी नेमके कुठल्या कारखान्यातून सोडण्यात आले याबाबत तपास चालू आहे. शनिवारी रात्री तारापूर औद्योगिक क्षेत्रातील के झोन परिसरात पावसाळ्यातील पुराचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारात रात्रीच्या सुमारास विषारी ... Read More »

सूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन

>> एमएमआरडीए विरोधात ग्रामस्थ, शेतकरी आक्रमक प्रतिनिधी/मनोर, दि. 14 : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजने विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना शनिवारी (दि. 12) पोलीसांनी अटक करुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने एमएमआरडीए आणि पोलीस प्रशासनाने सूडबुद्धीने शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत हालोली, बोट, कुडे, सातीवली, ढेकाळे आणि दुर्वेस येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी आज आक्रमक होत एमएमआरडीए विरोधात महामार्गालगतच्या हालोली ... Read More »

Scroll To Top