दिनांक 20 June 2019 वेळ 4:37 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 2)

Category Archives: महान्यूज़

डहाणू : एकाच दोरीने गळफास घेऊन तरुण व विवाहितेची आत्महत्या

राजतंत्र न्यूज नेटवर्क/ डहाणू, दि. 6 : आगवण नवासाखरापाडा येथील एका शेतात एक तरुण व विवाहितेचा मृतदेह आढळून आला असुन या दोघांनी शेतातील एका झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. आगवण नवासाखरापाडा येथील नितीन यशवंत बालशी (वय 24) हा तरुण काल, 6 जुन रोजी कुणाला काहीएक न सांगता घरातून बाहेर पडला होता. नितीन उशिरापर्यंत ... Read More »

किनारपट्टीवर संशयित बोट आढळल्याच्या अफवेवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

किनार्‍यावर सुरक्षारक्षक तैनात! अप्पर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांची माहिती! वार्ताहर/बोईसर, दि. 31 : पालघर जिल्ह्यातील समुद्र हद्दीत संशयास्पद बोट आढळून आली आहे, अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. मात्र अशी कोणतीही संशयास्पद बोट सागरी किनारी आढळून आली नसल्याचे पालघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर समुद्रात अशा काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करतानाच सतर्कतेचा इशाराही पोलिसांमार्फत देण्यात ... Read More »

बोईसर : नागझरीजवळ मोठी दुर्घटना टळली!

गॅस सिलिंडर भरलेला ट्रक उलटला वार्ताहर/बोईसर, दि. 28 : मुंबईवरून बोईसरला 56 हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन येणारा एक ट्रक नागझरीजवळ पलटी झाल्याची घटना आज पहाटे सव्वा तीन वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रकमधील कोणत्याही सिलिंडरमधुन गॅसगळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याची खबर पसरल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला ... Read More »

दहशतवादी घुसल्याच्या चर्चेने वसईत खळबळ!

संशयित इसम निघाले चित्रपटात काम करणारे कलाकार राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 28 : वसई पश्‍चिमेतील पंचवटी नाका भागात बँकेच्या सुरक्षारक्षकाने दहशतवादी पाहिल्याची खबर वार्‍यासारखी पसरल्याने काल, सोमवारी परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र अवघ्या 40 मिनिटांत पोलिसांनी या घटनेचा तपास करत सुरक्षारक्षकाने पाहिलेले संशयित इसम चित्रपटात काम करणारे कलाकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांसह येथील नागरीकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. काल, दुपारी पावणे ... Read More »

बारावीचा उद्या निकाल

चार अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल राजतंत्र न्यूज नेटवर्क/ मुंबई, दि. 27 : फेब्रुवारी- मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, 28 मे रोजी जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळाअंतर्गत बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 ... Read More »

बोईसर चिल्हार रस्त्यावरील फर्निचरची दुकाने जळून खाक

वार्ताहर/बोईसर, दि. 27 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या बोईसर-चिल्हार रस्त्यावरील गुदले ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनधिकृतपणे उभारलेल्या फर्निचर दुकानांना आज, सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागून यात 20 हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याचे समजते. सुदैवाने यात जिवितहानी झाली नसली तरी लाखोंचे फर्निचर आगीत जाळून खाक झाले आहे. बोईसर-चिल्हार रस्त्यावर काही वर्षांपुर्वी नियम धाब्यावर बसवुन 11000 केव्हीच्या अतिउच्चदाबाच्या विद्युत वाहिनीखाली तात्पुरते शेड उभारुन ... Read More »

पालघरचा गड शिवसेनेने जिंकला!

88598 हजारांनी राजेंद्र गवितांचा विजय बविआच्या बळीराम जाधव यांचा केला पराभव वार्ताहर/बोईसर, दि. 23 : गेल्या महिन्याभरापासून पालघरचा गड कोण जिंकणार याची उत्सुकता आज, 23 मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपली असुन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा अखेर विजय झाला आहे. गावित यांनी 88 हजार 598 मताधिक्क्याने बळीराम जाधव यांना पराभवाची धूळ चारली. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ... Read More »

10 लाखांचे मोबाईल चोरणार्‍या तीन आरोपींना अटक

वसई, दि. 21 : वसई रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात चोरी करुन 10 लाख रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे 107 स्मार्टफोन लंपास करणार्‍या 3 आरोपींना अटक करण्यात माणिकपुर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाला यश आले आहे. तर या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेल्या मोबाईल्स पैकी 2 लाख 50 हजारांचे 25 मोबाईल हस्तगत ... Read More »

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज!

1600 अधिकारी, कर्मचारी व पोलीस तैनात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची माहिती राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 21 : लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील मतमोजणी येथील सूर्या कॉलनीतील शासकीय गोदाम क्र. 2 येथे 23 मे रोजी होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस ... Read More »

वज्रेश्वरी मंदिरातील दरोडाप्रकरणातील पाच आरोपी गजाआड!

प्रतिनिधी/वाडा, दि.21 : भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात 10 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकत येथील दान पेटीतील लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असुन या दरोड्यातील अन्य 3 फरार आरोपींचा पोलिसांकडुन कसुन शोध घेण्यात येत आहे. गोविंद सोमा गिंभल (वय 35, रा. ... Read More »

Scroll To Top