दिनांक 08 December 2019 वेळ 9:36 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 19)

Category Archives: महान्यूज़

सैनिकांविषयी अपशब्द – रिक्षाचालकास अटक

वैदेही वाढाण बोईसर, दि. 21 : जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी येथील एका रिक्षा चालकावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 153 (दंगलीसाठी चिथावणी देणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम शेख असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. नदीम हा तारापूरचा रहिवासी असून तो बोईसर तारापूर दरम्यान ६ आसनी मिनीडोअर चालवतो. काल त्याच्या ... Read More »

आज डहाणूला भूकंपाचे 3 धक्के

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. २०: आज सकाळपासून डहाणूला भूकंपाचे 3 धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 10.14 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, दुसरा धक्का दुपारी 1.24 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, तर तिसरा धक्का दुपारी 1.29 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा होता. या तीनही भूकंपांचे केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खोल असून यातील पहिला व तिसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 20° तर रेखांश 72.8° वर आणि ... Read More »

कोटींच्या-कोटी उड्डाणे, धरण मात्र रिकामे

डोल्हारा पाझर तलावाचे 7 वर्षात केवळ 60 टक्के काम वरिष्ठ पातळीवर दफ्तर दिरंगाई ग्रामस्थांचे आंदोलने वायफळ चालू वर्षीही सोसावी लागणार पाणी टंचाई दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 19 : तालुक्यातील पाणी टंचाईबाबत अतिशय संवेदनाक्षम असलेल्या डोल्हारा येथे सन 2012 साली 1.82 कोटींच्या पाझर तलावाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र कामाच्या विहीत मुदतीसह 7 वर्षांचा कालावधी उलटूनही तलावाचे काम पुर्ण झालेले नाही. ... Read More »

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, आरोपी पत्नीसह प्रियकरला अटक

पती बेपत्ता झाल्याचा रचला होता बनाव राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 19 : अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करुन पोलीसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने पती हरवल्याचा बनाव रचणार्‍या आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला बोईसर पोलीसांनी अटक केली आहे. अनिलकुमार छेदुकुमार रावत (वय 32) असे खून झालेल्या इसमाचे नाव असुन रामप्रकाश ऊर्फ सोनु असे सदर आरोपीचे नाव आहे. आरोपी पत्नीचे नाव ... Read More »

बोईसर रेल्वे स्थानकात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

वार्ताहर/बोईसर, दि. 18 : येथील एका 23 वर्षीय तरुणाने आज बोईसर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर चढून रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या विजवाहिनीला (ओव्हरहेड वायर) हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद तमन्ने असे सदर तरुणाचे नाव असून रेल्वे प्रशासनाने वेळीच वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचे प्राण वाचले. मूळचा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोहम्मद सध्या बोईसरमध्ये वास्तव्यास आहे. आज सकाळच्या सुमारास हातात धारधार ... Read More »

डहाणू नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न!

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 17 : डहाणू नगर परिषदेतर्फे दिव्यांगांना आर्थिक सहाय्य व बचत गटांना फिरता निधी अनुदान धनादेशांचे वाटप तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज, 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दशाश्री माळी हॉल येथे खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते व नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार पास्कल धनारे व जिल्हा परिषद अध्यक्ष ... Read More »

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

गुन्ह्यात सहभागी आरोपीची पत्नी व अन्य एका महिला आरोपीला 10 वर्षांची शिक्षा राजतंत्र न्यूज नेटवर्क/केळवे, दि. 15 : पिडीत मुलगी व तिच्या कुटूंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार करुन अल्पवयीन पिडीत मुलीला गर्भवती करणार्‍या नराधमाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच यात त्याला मदत करणारी त्याची पत्नी व अन्य एका महिलेला प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ... Read More »

वसईत 2500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त!

> गुन्हे प्रतिबंधक पथकाची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 14 : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात 2500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले असुन हे पनीर तयार करणार्‍या 2 डेअरींवर बंदीची कारवाई करण्यात येत आहे. वसई गुन्हे प्रतिबंधक पथक व अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्यास घातक भेसळयुक्त पनीर व बटर बनवले जात असुन त्याची परिसरातील ... Read More »

व्यापार्‍यांच्या दबावामुळे रस्ता रूंदीकरणास मर्यादा!

वाडा शहरातील रस्ता रुंदीकरण आता 16 ऐवजी 12 मीटर पालकमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : वाडा शहरातून जाणारा पालघर – वाडा – देवगाव हा राज्य महामार्ग उन्नत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वाडा शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी 15 मीटर रुंदीकरणास अंदाजपत्रकात मंजूरी देण्यात आली. त्यानुसार प्रस्तावित कामाची मार्जिन लाईन निश्चित ... Read More »

कुपोषण निर्मुलनासाठी सकस आहार बगीच्यांची निर्मिती करणार!

कोसबाड कृषि विज्ञान केंद्र व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांचा उपक्रम राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 12 : पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासकीय तसेच अशासकीय संस्था आपापल्या पध्दतीने चांगले कार्य करत आहेत. त्यालाच एक सहाय्य म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे कोसबाड हिल येथील कृषि विज्ञान केंद्र ... Read More »

Scroll To Top