दिनांक 03 July 2020 वेळ 3:51 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 18)

Category Archives: महान्यूज़

नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू!

एक सुखरूप, वाडा येथील घटना संजय लांडगे / वाडा, दि. 24 : उन्हाळ्यातील सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन मुलींपैकी दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर यातून बचावलेल्या मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मानसी अनिल देसले (वय 11, रा.कापरी), वेदिका संतोष आकरे (वय 13) व दीक्षा संतोष ... Read More »

वाडा : वन अधिकार्‍याची दबंगगिरी; आदिवासी मजूरांवर रोखले पिस्तूल

दिनेश यादव / वाडा, दि. 23 : येथील वनविभाग (पश्चिम) कार्यालयाच्या क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम काही आदिवासी मजुरांनी काम केले होते. या कामाची मजुरी मागायला गेलेल्या या मजुरांवर वनविभाग पश्चिमचे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांनी आपल्याकडील पिस्तूल रोखत दबंगगिरी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. तालुक्यातील वनविभाग (पश्चिम) कार्यालया अंतर्गत येणार्‍या आबिटघर परिसरातील वनक्षेत्रात शासनाच्या वृक्षलागवडीच्या ... Read More »

पोक्तपणाचे सल्ले देऊन मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये! -न्या. सत्यरंजन धर्माधिकारी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/ठाणे, दि. 22 : आपले वय झाल्यानंतर बालपण गमावलेले असते. आपण पोक्त झालेलो असतो. परंतु लहान मुलांना पोक्तपणाचे सल्ले देण्याचा बालिशपणा टाळून त्यांना बालपणाचा आनंद अनुभवू दिला पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी ठाणे येथे बोलताना केले. ते नूतन बाल शिक्षण संघाच्या पद्मभूषण ताराबाई मोडक विशेष संस्था व पद्मश्री अनुताई वाघ विशेष व्यक्ती पुरस्कार ... Read More »

भुजल पातळी खालावल्याने मोखाड्यातील नळयोजना मृतावस्थेत

भुजल पुनर्भरणाची गरज राजकिय पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष प्रतिनिधी/मोखाडा, दि. 21 : तालुक्यात 11 नळयोजना, 348 विहिरी, 148 बुडके तसेच मध्यवैतरणासारखा अवाढव्य व विस्तीर्ण जलसाठा असलेला प्रकल्प व इतर लहानमोठी धरणे आहेत. परंतु मध्यवैतरणा प्रकल्पाचा अपवाद वगळल्यास भुजल पातळी खालावल्याने सर्वत्र पाण्याचा ठणठणाट असून अर्ध्याहून जास्त नळयोजना सुस्थितीत असूनही मृतप्राय झाल्याने येथील नागरीकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोखाडा तालुक्यात कारेगांव, ... Read More »

बोईसर : 6 वर्षीय मुलीवरील बलात्कार, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 19 : सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. 9 नोव्हेंबर 2013 रोजी येथील सुतारपाडा भागात ही घटना घडली होती आरोपीने शेजारी राहणार्‍या पीडित मुलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरात नेत तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ... Read More »

जव्हार : आणखी 6 घोट्याळ्यांप्रकरणी गुन्हे

राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 19 : जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील घोटाळ्यांची रोज नवनविन प्रकरणे बाहेर येत असुन काल, गुरुवारी पुन्हा 6 घोटाळ्यांप्रकरणी संबंधित शासकिय अधिकारी व संस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजनांमध्ये गैरव्यवहार करुन एकुण 19 लाख 63 हजार रुपयांवर घोटाळेबाजांनी डल्ला मारला आहे. सन 2004 ते 2009 दरम्यान आदिवासींच्या विकासासाठी शासनाकडून राबविण्यात आलेल्या विविध ... Read More »

विरारमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 18 : एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना विरार येथे घडली असुन या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींनी पीडित मुलीसह तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राला एका आंब्याचा झाडाला बांधुन आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 15) रात्री 8 वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी आपल्या नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी घरातून बाहेर ... Read More »

जव्हार व डहाणू आदिवासी प्रकल्पातील घोटाळ्यांची मालिका संपेना!

आणखी पावणे दोन कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी गुन्हे दाखल! राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : जव्हार व डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात 2004 ते 2009 दरम्यान आदिवासींसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमधील कोट्यावधींच्या घोटाळ्यांची अनेक प्रकरणे मागील काही दिवसांपासुन उजेडात येत असुन आता आणखी पावणे दोन कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी संबंधित अधिकारी व संस्थांविरोधात काल, मंगळवारी जव्हार व डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले ... Read More »

बोईसरमध्ये गांजाची शेती उद्ध्वस्त!

एकाला अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : येथील नेवाळे रेल्वे फाटक परिसरात बेकायदेशीररित्या पिकवण्यात येत असलेली गांजाची शेती बोईसर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केली असुन येथून 1 लाख 14 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे व सुकलेली गांजाची पाने जप्त करण्यात आली आहेत. तसेच याप्रकरणी संबंधित इसमाला अटक करण्यात आली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे ... Read More »

भांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान

या संपूर्ण वृत्तासह आजचा पेपर PDF स्वरूपात मिळवण्यासाठी सोबतच्या लिंकला भेट द्या ! Daily RAJTANTRA Dated 14th April 2019 संजीव जोशी दि. १३: आशागड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. च्या प्रकल्प विस्ताराला जलप्रदूषणावर उपाययोजना न केल्याच्या कारणात्सव ना – हरकत पत्र नाकारले असताना कंपनी व्यवस्थापनाने बांधकाम चालूच ठेऊन ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कंपनीच्या सांडपाण्यामुळे परिसरातील विहिरींचे ... Read More »

Scroll To Top