दिनांक 21 February 2020 वेळ 11:02 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 15)

Category Archives: महान्यूज़

10 लाखांचे मोबाईल चोरणार्‍या तीन आरोपींना अटक

वसई, दि. 21 : वसई रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात चोरी करुन 10 लाख रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे 107 स्मार्टफोन लंपास करणार्‍या 3 आरोपींना अटक करण्यात माणिकपुर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाला यश आले आहे. तर या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेल्या मोबाईल्स पैकी 2 लाख 50 हजारांचे 25 मोबाईल हस्तगत ... Read More »

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज!

1600 अधिकारी, कर्मचारी व पोलीस तैनात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची माहिती राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 21 : लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील मतमोजणी येथील सूर्या कॉलनीतील शासकीय गोदाम क्र. 2 येथे 23 मे रोजी होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस ... Read More »

वज्रेश्वरी मंदिरातील दरोडाप्रकरणातील पाच आरोपी गजाआड!

प्रतिनिधी/वाडा, दि.21 : भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात 10 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकत येथील दान पेटीतील लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत पाचही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असुन या दरोड्यातील अन्य 3 फरार आरोपींचा पोलिसांकडुन कसुन शोध घेण्यात येत आहे. गोविंद सोमा गिंभल (वय 35, रा. ... Read More »

नालासोपाऱ्यात 1.2 कोटींचा मांडूळ साप जप्त; दोघे अटकेत

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मनोर, दि. 3 : महिन्याभरापुर्वीच मनोरमधील गोवाडे गावातून दिड कोटी किंमतीचे दुर्मिळ असे मांडूळ प्रजातीचे दोन साप पालघर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता नालासोपारा येथून पोलिसांनी आणखी 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचा मांडूळ साप जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. काळी जादू व औषधासाठी मांडूळ प्रजातीच्या सापांना मोठ्या प्रमाणावर ... Read More »

पावसाळी कामे करण्यासाठी महावितरणला ठेकेदार मिळेना

वार्ताहर/बोईसर, दि. 19 : पालघर व वसई सर्कलमध्ये महावितरण कंपनीने विद्युत उपकरणांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी तीन वर्षांच्या कंत्राटाबाबत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना अद्यापपर्यंत महावितरणला ठेकेदार मिळाला नसल्याचे समोर आले आहे. याविषयी महावितरणचे पालघर जिल्हा अभियंता किरण नागावकर यांच्याशी संपर्क साधला असता कामांचे दर वाढवल्याने या आठवड्यात ठेकेदार निविदा भरतील, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. ... Read More »

अखेर वादग्रस्त वनअधिकारी दिलीप तोंडे यांची बदली

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला आले यश प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत खड्डे खोदण्याचे काम केलेल्या, मात्र या कामाची मजूरी न मिळाल्याने यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासी मजुरांवर पिस्तुल रोखून धमकावल्याचा कथित आरोप असलेले प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेने तोंडे यांच्या कार्यशैलीविरोधात गेल्या सोमवारी (दि. 13) वाडा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड ... Read More »

व्यवस्थापकाचे अपहरण व खून प्रकरण, फरार आरोपीची आत्महत्या

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : पालघर येथील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आतापर्यंत एकुण 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील फरार आरोपींपैकी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवा ठाकूर (वय 35, रा. बिरवाडी) असे सदर आरोपीचे नाव असुन शिवा ठाकूरने अटकेच्या भितीने त्याच्याच वाडीतील एका झाडाला ... Read More »

निता ट्रॅव्हल्सच्या बसेसमधुन सुमारे 3.2 टन मावा जप्त!

वाडा पोलिसांची कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून चौकशी सुरू! प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : मिठाई बनवण्यासाठी लागणार्‍या माव्याची शितगृह वाहनांतून वाहतूक करणे आवश्यक असताना निता ट्रॅव्हलच्या दोन प्रवासी बसेसमधून या माव्याची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाड्यातील खंडेश्वरी नाका येथे पोलिसांनी निता ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसमधुन सुमारे 3.2 टन मावा जप्त केला असुन हा मावा भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त ... Read More »

रसायन प्रक्रियेदरम्यान वायुगळती; तारापूर एमआयडीसीतील तीन कामगारांचा मृत्यू

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : चार दिवसांपूर्वीच विषारी वायू गळती होऊन 30 कामगारांना बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा तारापूर एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या कामगारांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी करणार्‍या डॉक्टरांनाही वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु ... Read More »

वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा, आठ ते दहा लाखांचा ऐवज चोरला

प्रतिनिधी/कुडूस, दि. 12 : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात शुक्रवारी पहाटे दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने देवीच्या मुख्य गाभार्‍यातील तीन दानपेट्या आणि दुसर्‍या गाभार्‍यातील दोन दानपेट्या फोडून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शुक्रवारी पहाटे तीन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सहा ... Read More »

Scroll To Top