दिनांक 20 June 2019 वेळ 5:30 PM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ (page 10)

Category Archives: महान्यूज़

अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या वादात शिबीर रद्द; अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या झाल्या रोषाचे धनी

दीपक गायकवाड/मोखाडा : अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या वादात काल, 25 फेबु्रवारी रोजी खोडाळ्यात नियोजित असलेला महिला मेळावा व आरोग्य शिबीर रद्द झाले. मात्र, या शिबीरासाठी महिला व बालकांना शिबिरस्थळी आणण्याची जबाबदारी असणार्‍या अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती अडचणीत आल्या आहेत. त्यांना गरोदर, स्तनदा मातांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर या पुढे होणार्‍या शिबिरांसाठी माता, बालके आणि किशोरवयीन मुलींपुढे कोणत्या तोंडाने ... Read More »

विक्रमगड : कार अपघातात दोन ठार, तीन जखमी

मृतांमध्ये 8 महिन्याच्या चिमुकलीचा समावेश प्रतिनिधी/वाडा, दि.26 : वाडा-विक्रमगड रस्त्यावरील सजन येथे गाडीवरील नियंत्रण सूटल्याने झालेल्या अपघातात शिळ येथील तरुण कल्पेश सांबरे (वय 30) व त्याची 8 महिन्याची मुलगी ओवी सांबरे हिचा जागीच मृत्य झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असुन आई आणि एका मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. आज, सकाळी कल्पेश सांबरे हा तरुण झडपोली येथून आपल्या एम.एच.02/बी.जी. ... Read More »

जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा खासदार गावीत यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद

वार्ताहर/बोईसर, दि. 25 : भगतसिंग कोशियारी समितीचा अहवाल पूर्णतः लागू करा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, आदी प्रमुख मागण्यांसाठी आज ईपीएस-95 पेन्शनधारकांनी खासदार राजेंद्र गावीत यांच्या पालघर येथील निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करुन आक्रोश व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी वगळता देशभरातील कामगारांसाठी केंद्र सरकारने 1995 साली पेन्शन योजना सुरु केली. या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घ्यायचा असे ... Read More »

अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या सुंदोपसुंदीत गरोदर आदिवासी महिलांची हेळसांड

कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येलाच नियोजित शिबीर केली रद्द! दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 25 : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत खोडाळा येथे आज, सोमवारी (दि. 25) महिला मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमांच्या आयोजनात ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेतल्याने यावर फनाफराजीनामा नाट्य घडल्याने ऐन कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येलाच नियोजित शिबीर रद्द करण्याची नामूष्की आरोग्य प्रशासनाला पत्करावी लागली. परिणामी अधिकारी ... Read More »

बोईसरमध्ये तीन पिस्तुले व 10 काडतुसांसह चौघांना अटक

खाजगी क्लासमधील विद्यार्थीनीला जिवे ठार मारण्याची दिली होती धमकी Rajtantra Media/बोईसर, दि. 24 : येथील एका खाजगी इंग्लिश स्पिकींग क्लासमधील विद्यार्थीनीला जिवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या तरुणासह त्याच्या तिन साथिदारांना बोईसर पोलीसांनी अटक केली असुन त्यांच्याकडून तीन पिस्तुले व 10 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. मनमित तिवारी असे मुख्य आरोपीचे नाव असुन त्याच्या साथिदारांचे नाव समजू शकले नाही. अधिकृत ... Read More »

पालघर नगरपरिषदेची रणधुमाळी, राजकीय हालचालींना वेग

वार्ताहर/बोईसर, दि. 22 : मार्च 2019 मध्ये मुदत संपत असलेल्या पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक घोषित झाली असून नगरपरिषदेच्या रणधुमाळीला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. नगराध्यक्ष पद महिला उमेदवारासाठी राखीव असल्याचे जाहीर होताच राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून कोणत्या पक्षाचा कोण नगराध्यक्ष असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालघर नगरपरिषद हद्दीत 47 हजार 850 मतदार संख्या निश्चित ... Read More »

पालघर नगरपरिषदेसाठी 24 मार्च रोजी निवडणूक

आचारसंहिता लागू वार्ताहर/बोईसर, दि. 21 : पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक होणार असुन पालघरसह निवडणूक होत असलेल्या सिंदखेडराजा व लोणार अशा तीन नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने आज दिली. पालघर नगरपरिषदेची 18 एप्रिल 2019 रोजी मुदत संपत असून मुदत संपणार्‍या पालघरसह सिंदखेडराजा व लोणार या दोन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना, आरक्षण ... Read More »

सैनिकांविषयी अपशब्द – रिक्षाचालकास अटक

वैदेही वाढाण बोईसर, दि. 21 : जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी येथील एका रिक्षा चालकावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 153 (दंगलीसाठी चिथावणी देणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम शेख असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. नदीम हा तारापूरचा रहिवासी असून तो बोईसर तारापूर दरम्यान ६ आसनी मिनीडोअर चालवतो. काल त्याच्या ... Read More »

आज डहाणूला भूकंपाचे 3 धक्के

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. २०: आज सकाळपासून डहाणूला भूकंपाचे 3 धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 10.14 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, दुसरा धक्का दुपारी 1.24 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, तर तिसरा धक्का दुपारी 1.29 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा होता. या तीनही भूकंपांचे केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खोल असून यातील पहिला व तिसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 20° तर रेखांश 72.8° वर आणि ... Read More »

कोटींच्या-कोटी उड्डाणे, धरण मात्र रिकामे

डोल्हारा पाझर तलावाचे 7 वर्षात केवळ 60 टक्के काम वरिष्ठ पातळीवर दफ्तर दिरंगाई ग्रामस्थांचे आंदोलने वायफळ चालू वर्षीही सोसावी लागणार पाणी टंचाई दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 19 : तालुक्यातील पाणी टंचाईबाबत अतिशय संवेदनाक्षम असलेल्या डोल्हारा येथे सन 2012 साली 1.82 कोटींच्या पाझर तलावाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र कामाच्या विहीत मुदतीसह 7 वर्षांचा कालावधी उलटूनही तलावाचे काम पुर्ण झालेले नाही. ... Read More »

Scroll To Top