दिनांक 21 September 2019 वेळ 6:12 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़

Category Archives: महान्यूज़

नालासोपार्‍यातील आयटीआय गोल्ड लोनच्या शाखेवर सशस्त्र दरोडा

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 20 : तालुक्यातील नालासोपारा येथील आयटीआय गोल्ड लोन या कंपनीच्या शाखेत शुक्रवारी सकाळी सहा जणांच्या सशस्त्र टोळीने दरोडा घातल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असुन दरोड्यानंतर पोबारा केलेल्या दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान, ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असुन पोलिसांतर्फे सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने दरोडेखोरांचा कसून शोध घेण्यात ... Read More »

डहाणू : जमिनीच्या वादातून काकाचा खून, आरोपी पुतण्याला जन्मठेप

कुर्‍हाडीने घाव घालून केला होता निर्घृण खून प्रतिनिधी/डहाणू, दि. 19 : डहाणू, दि. 19 : जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आपल्या काकांचा कुर्‍हाडीने घाव घालून निर्घृण खून करणार्‍या आरोपीला पालघर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रविंद्र काशिनाथ डगला (वय 28) असे सदर खूनी पुतण्याचे नाव आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारोटीतील डोंगरीपाडा येथे राहणार्‍या रविंद्र काशिनाथ डगला ... Read More »

डहाणू आदिवासी प्रकल्पातील निरीक्षकास 2 हजाराची लाच घेताना अटक!

कुकुटपालनाची रक्कम अदा करण्यासाठी केली होती लाचेची मागणी राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : कुकुट पालन व्यवसायाकरिता आदिवासी लाभार्थाला मंजूर झालेली अनुदानाची रक्कम त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागणार्‍या डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील लाचखोर निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. यशवंत पुरुषोत्तम खानोरे (वय 55) असे सदर लाचखोर निरिक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी ... Read More »

डहाणू-धुंदलवाडी दरम्यानचा 40 वर्ष जुना पुल कोसळला

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : डहाणू व धुंदलवाडी दरम्यान असलेल्या आंबेसरी येथील 40 वर्ष जुना पुल आज, संध्याकाळी अचानक कोसळल्याने अनेक लहान-मोठ्या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांना आता डहाणू, धुंदलवादी तसेच तलासरी येथे जाण्याकरिता मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते. बंद डहाणू, जामशेत, बहारे, वंकास, धुंदलवाडी, चिंचले आदी भूकंपग्रस्त ... Read More »

गरिबीला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : तालुक्यातील गांधरे येथील दिपक ठाकरे (वय 47) या शेतकर्‍याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील गांधरे येथील दिपक ठाकरे यांचे वडील दामोदर ठाकरे यांना अर्धांगवायु झाल्यामुळे घरातील कौटुंबिक जबाबदारी ही पूर्णपणे दिपक यांच्या खांद्यावर होती. त्यातच घरची गरीब परिस्थिती आणि शेतीसाठी घेतलेल्या उसनवारीमुळे त्यांच्यावर मोठ्या ... Read More »

घरफोडीचे 44 गुन्हे दाखल असलेली टाळी अखेर जेरबंद, 53 तोळे सोने हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 11 : तालुक्यातील विविध भागात घरफोड्या करुन धुमाकूळ घालणार्‍या तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला यश आले असुन या टोळीच्या चौकशीत नालासोपारा, तुळींज व अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या तब्बल 44 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, या टोळीकडून पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरलेला 21 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ... Read More »

मोखाडा पंचायत समितीने वाटली पुरस्कारांची खिरापत

सहा ऐवजी 15 शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : सालाबादप्रमाणे चालुवर्षीही मोखाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून खोडाळा येथील मोहिते कॉलेजमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. परंतू केवळ सहाच शिक्षकांना हा पुरस्कार देणे क्रमप्राप्त असतानाही समितीने 15 शिक्षकांना पुरस्कार देण्याचा नविनच पायंडा पाडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या तोंडावर पंचायत समितीने पुरस्कारांची खिरापत वाटली ... Read More »

डहाणू : जनावरांची चोरी करणार्‍या टोळीतील एकाला अटक, तिघे फरार

तिघे फरार, कासा पोलिसांची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 11 : कासा व आजुबाजूच्या परिसरातील मोकाट जनावरे चोरी करणार्‍या टोळीतील एकाला गाय चोरी करताना रंगेहाथ अटक करण्यात कासा पोलिसांना यश आले आहे. तर त्याचे तीन साथिदार अंधाराचा फायदा घेत निसटण्यात यशस्वी ठरले आहेत. शरीफ युसुफ काझी (वय 49, रा. नालासोपारा गाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असुन त्याच्यावर विविध ... Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षपदी नगरसेवक तन्मय शशिकांत बारी

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 9 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डहाणू शहराध्यक्षपदी नगरसेवक तन्मय शशिकांत बारी यांची निवड करण्यात आली आहे. नगरसेवक व शहराध्यक्ष शमी पिरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर तन्मय यांची निवड करण्यात आली. डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक भाजपमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अध्यक्ष सुनील भूसारा यांनी डहाणूत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तडकाफडकी निवड जाहीर ... Read More »

डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट, मिहीर शहा भाजपात

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविलेले विद्यमान स्वीकृत सदस्य मिहीर शहा यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आमदार आनंद ठाकूर यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रवेश कार्यक्रमात ठाकूर यांचा मुलगा करण उपस्थित असल्याने आनंद ठाकूर यांचा केवळ मुहूर्त बाकी असल्याचे संकेत आहेत. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा ... Read More »

Scroll To Top