दिनांक 10 December 2018 वेळ 10:36 PM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 5)

Blog Archives

तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन

TARAPUR EDUCATION SOCIETY AMRUT MHOSTAV

वार्ताहर/बोईसर, दि. 20 : तारापूर एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सवी सोहळा 24 नोव्हेंबर रोजी संस्था संचलित रा. हि. सावे विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे कार्यवाह उदयन सावे यांनी केले आहे. या सोहळ्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 10 जून 1944 रोजी तारापूर गावातील शंकराच्या मंदिरासमोरील चाळीत सुरु झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या ... Read More »

डॉजबॉल स्पर्धेत सोमय्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

DOGDEBALL SPARDHA

प्रतिनिधी/डहाणू, दि. 20 : भिवंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉजबॉलच्या विभागीय स्पर्धेत नरेशवाडीच्या सोमय्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत 10 विभागातील 75 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. 19 व 17 वर्षाखालील वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या. 75 खेळाडूंपैकी सोमय्या शिक्षण संस्थेच्या 6 खेळाडूंची राज्य पातळीवरील निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोहिणी जानी गांगोडा, अभिषेक नायर व विल्सन ... Read More »

जिल्ह्यात महावॉकेथॉनच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती

MAHAWALKATHON

Rajtantra Media/पालघर, दि. 19 : रस्ते सुरक्षा संदर्भात जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने काल, रविवारी सकाळी 8 वाजता जिल्ह्यातील विविध ठिकाणी महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. विविध सेवाभावी संस्था, शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेतला. राज्यात विविध ठिकाणी एकाच वेळी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पालघर तालुक्यातील बोईसर येथे चित्रालय ते रेल्वे स्टेशन ते ... Read More »

वाड्यात बंटी-बबली फेम कारनामा, नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

BANNER

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : मुंबईतील जे. जे. रुग्णालयात तसेच वाडा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर असल्याचे भासवून वाडा शहर व ग्रामीण भागातील युवक-युवतींना दवाखान्यात नोकरीला लावण्याचे अमीष दाखवून कोणाकडून 35 हजार, तर कोणाकडून 40 हजार रुपये उकळून लाखो रुपयांना गंडा घालणार्‍या महिलेस वाडा पोलिसांनी अटक केली असून बंटी-बबली फेम या कारनाम्याची एकच चर्चा सर्वत्र रंगली आहे. शहरातील मंगलपार्क येथे राहणारी मिनाक्षी विलास ... Read More »

“Most Speeches in 24 Hours” : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यासाठी संजीव जोशी सज्ज

Future Image

शिरीष कोकीळ/RAJTANTRA MEDIA : डहाणू दि. 18 : 26 नोव्हेंबर रोजीच्या संविधान दिनाचे औचित्य साधून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी 24 तासांत सर्वाधिक भाषणे देण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्याचा संकल्प केला आहे. यापूर्वी 24 तासांतील सर्वाधिक 30 भाषणांच्या विश्वविक्रमाची नोंद आहे. हा विक्रम तोडण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 वाजेपर्यंत दिवसरात्रीत 32 पेक्षा ... Read More »

महावितरणच्या अधिकार्‍याचा हलगर्जीपणा, विजेच्या धक्काने कर्मचारी ठार

WADA SHOCK

प्रतिनिधी/वाडा, दि. 18 : महावितरणच्या वाडा ग्रामीण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्याने आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वाडा ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या वैभव पंगारा (वय 25) या कंत्राटी कर्मचार्‍याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी (दि.16) संध्याकाळी घडली. शुक्रवारी अबिटघर येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वाडा ग्रामीण विभागाचे कनिष्ठ अभियंता ब्रह्मानंद चौधरी ग्रामीण भागात कंत्राटी काम करणार्‍या ... Read More »

डिजीटल युगातील पत्रकारितेत सामाजिक भान जपणे आवश्यक

PATRAKAR DIN CHARCHA SATRA

> पालघर येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न Rajtantra Media/पालघर, दि. 16 : काळाप्रमाणे पत्रकारितेचे स्वरूपही बदलत असून सध्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजीटल पत्रकारितेलाही महत्त्व आले आहे. यातील समाजमाध्यमे प्रत्येकाच्या हातात उपलब्ध झाल्याने प्रत्येकानेच सामाजिक भान जपणे आवश्यक असल्याचा सूर येथे आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय प्रेस ... Read More »

अनधिकृत शाळांकडून 1 लाखांचा दंड वसूलणार

BANNER

वार्ताहर/बोईसर, दि. 16 : पालघर जिल्ह्यात तब्बल 197 प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याची बाब उघडकीस आली असुन हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणार्‍या या शाळांकडून 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच जोपर्यंत या शाळा बंद होत नाही, तोपर्यंत दरदिवशी 10 हजार प्रमाणे दंड देखील आकारला जाणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या ... Read More »

श्रमजीवी संघटनेची डहाणू तहसील कार्यालयावर धडक

SHRAMJIVI MORCHA

Rajtantra Media/डहाणू, दि. 15 : तालुक्यातील महसूल खाते व डहाणू पंचायत समितीचा कारभार तसेच विजेच्या प्रश्‍नासह विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने हरिचंद्र उंबरकर यांच्या नेत्वृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आज तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. डहाणू सागर नाका ते तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात श्रमजीवीचे हरिचंद्र उंबरकर, सुरेश रेंजड, अनेश सुतार, रवी चौधरी, बारकू दळवी, जानु सांबर, किरणताई दुमाडा, रुपेश ढोके, ... Read More »

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कटिबद्ध -ज्योती ठाकरे

MAHILA BACHAT GAT-JYOTI THAKREY

प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील कष्टकरी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी वाडा येथे नागरी सत्काराला उत्तर देताना केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नुकतीच ज्योती ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणून पालघर जिल्ह्याच्या वतीने बुधवारी (दि. 14) त्यांचा वाड्यातील पी. जे. हायस्कूलच्या प्रांगणात ... Read More »

Scroll To Top