दिनांक 23 June 2018 वेळ 3:19 PM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 47)

Blog Archives

डहाणू : व्हॉट्सऍपवरुन धार्मिक विद्वेश पसरविणारा मॅसेज पाठविल्याप्रकरणी महिलेस पोलीस कोठडी

दि. 2 जून : डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रिती अक्रे यांना व्हॉट्सऍप सोशल मिडीयावरुन धार्मिक विद्वेश पसरविणारा मॅसेज पोस्ट केल्याच्या आरोपाखाली वाणगांव पोलीसांनी अटक केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. अक्रे यांना डहाणू येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जावेद मुलाणी यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी आरोपीची 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडी सुनावताच अक्रे या न्यायालयाच्या ... Read More »

तारापूर एमआयडीसीतील रासायनिक घनकचर्‍यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडण्याची भिती

वार्ताहर : बोईसर, दि. 29 : तारापूर औद्योगिक परिसरातील सम्प नंबर तीनमध्ये वर्षोनुवर्षांपासून साठलेला रासायनिक घनकचरा (गाळ) सीईटीपी व टिमातर्फे युद्धपातळीवर काम करुन काढण्यात आला आहे. मात्र या घनकचर्‍याची अद्याप व्हिलेवाट लावली नसल्याने पावसाळा सुरु झाल्यास हा घनकचरा नाल्याद्वारे वाहत जाऊन खाडी व समुद्रात मिसळल्यास प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तारापूर औद्योगिक परिसरात जवळपास ... Read More »

पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न!

1 No. IMP

ॠषितुल्य वा. ना. अभ्यंकर व संस्कृती संवर्धन मंडळ ठरले पहिले मानकरी राजतंत्र मिडीया नेटवर्क देशातील पहिल्या बालशिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक व त्यांचा बालशिक्षणाचा वारसा पुढे नेणार्‍या पद्मश्री अनुताई वाघ यांच्या नावे नूतन बाल शिक्षण संघाच्या वतीने जाहिर करण्यात आलेले स्मृती पुरस्कार स्व. ताराबाईंच्या जयंती दिनाचे (19 एप्रिल) औचित्य साधून पूणे येथे आयोजीत करण्यात आलेल्या एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आले. ... Read More »

तारापूर एमआयडीसीतील जलवाहिनीला गळती नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वार्ताहर बोईसर, दि. 26 : तारापूर एमआयडीसीलगतच्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीला कुंभवली परिसरातील इपका फार्मासिटीकल कारखान्याजवळ गळती लागल्याने या जलवाहिनीत रासायनिक सांडपाणी मिश्रीत होऊन आजूबाजूच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सालवड, पास्थळ, पाम, टेंभी, नवापुर, नांदगाव, आलेवाडी, कोलवडे, कुंभवली आदी एमआयडीसीलगत असलेल्या गावांना एमआयडीसीतर्फेच पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या गावांना जलपुरवठा करणार्‍या सर्वच जलवाहिन्या एमआयडीसीतील कारखान्यांजवळूनच जातात. ... Read More »

तारापूर औद्योगिक परिसरातील नऊ कारखान्यांवर कारवाईचा बडगा

बोईसर वार्ताहर प्रदुषणास कारणीभूत ठरलेल्या तारापूर औद्योगिक परिसरातील बड्या सहा कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंद करण्याचे आदेश देत व तीन कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चांगलाच दणका दिला आहे. तारापूर औद्योगिक परिसरात रासायनिक, वस्रोद्योग व स्टील निर्मिती यांसारखे दिड हजार कारखाने असून या कारखान्यांमधून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी थेट सार्वजनिक नाल्यात सोडले जाते. परिणामी कारखानदारांच्या या निष्काळजीपणामुळे ... Read More »

वनश्री तथा आदिवासी सेवक बाबुभाई शेठीया कालवश

BABUBHAI

राजतंत्र न्यूज नेटवर्क दि. २४: महाराष्ट्र शासनाच्या वनश्री तथा आदिवासी सेवक पुरस्कारांसह अनेक मानसन्मान व गौरवास पात्र ठरलेले डहाणूतील ज्येष्ठ समाजसेवक बाबुभाई शेठीया यांचे आज दुपारी १२ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित पुत्र जयप्रकाश व अजय, विवाहित कन्या अंजना, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. बाबुभाईंच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार ... Read More »

बोईसर येथील कॅम्लिन कलर कंपनीने घेतली कलाध्यापकांची कार्यशाळा

विशेष प्रतिनिधी : कुडूस, दि. 18 : बोईसर येथील कॅम्लिन कोकियो कंपनीने रविवारी (दि.16) पालघर जिल्ह्यातील माध्यमिक कलाध्यापकांची कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी कंपनीच्या मालकांनी कलाध्यापकांना रंगांविषयी विशेष माहिती दिली. या कार्यशाळेसाठी पालघर जिल्ह्यातील 80 कलाध्यापक उपस्थित होते. कंपनीच्या वतीने सर्व शिक्षकांना विविध प्रकारचे रंग, ब्रश, कागद, सिस्पेन्सिल आदी साहित्य देवून रंगकाम करण्यास सांगितले. याच वेळी रंगांसंबंधी विशेष चर्चा ... Read More »

आदिवासी विकास: 12 लाखांची लाच घेतली अपर आयक्तांसह उपायुक्तांना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क दि. 16 एप्रिल 2017: आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील अतिरिक्त आयुक्त मिलिंद भगवान गवादे (54) या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यासह याच कार्यालयातील उपायुक्त किरण सुखलाल माळी (39) यांना 12 लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाच्या पालघर पथकाने काल शनिवारी रंगेहात अटक केली आहे. या दोघांविरोधात ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ... Read More »

पत्रकारांना हल्ल्यांपासून संरक्षण देणारे विधेयक मंजूर हल्ला केल्यास दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा

मुंबई, दि. 7 : निर्भीडपणे पत्रकारिता करीत असताना पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने विधेयक मंजूर केले आहे. असा कायदा व्हावा यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विविध संघटना सातत्याने मागणी व पाठपुरावा करीत होत्या. यासाठी अनेक आंदोलने देखील झाली. अखेर आज गुरुवारी अधिवेशनाच्या शेवटच्या ... Read More »

वाहनतळाच्या राखीव भूखंडावर परप्रांतीयांचे अतिक्रमण तारापूर एमआयडीसीमधील प्रकार; प्रशासनाची अनास्था

वार्ताहर बोईसर, दि. 30 : तारापूर औद्योगिक परिसरातील नियमित येणार्‍या वाहनांकरिता निर्माण करण्यात आलेल्या वाहनतळावर परप्रांतीयांचे अतिक्रमण वाढल्याने वाहने उभी करण्यात अडचण निर्माण होत आहे. याकडे औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने वाहनतळाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात आहे. तारापूर येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेले हे औद्योगिक क्षेत्र आशिया खंडातील सर्वात मोठे गणले जाते. येथे मोठ्याप्रमाणावर औद्योगिक कारखाने ... Read More »

Scroll To Top