दिनांक 19 February 2019 वेळ 4:37 AM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 4)

Blog Archives

हुतात्मा दिनानिमित जिल्हा परिषदेत महात्मा गांधी यांना मानवंदना

पालघर, दि. 30 : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषदेत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी एन.के. जेजुरकर यांच्या हस्ते गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी किरण भिलारे यांनीही गांधीजी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. जिल्हा परिषदेच्या सामन्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सतीश मांडवेकर यांच्यासह ... Read More »

चिकू फेस्टिव्हलचे 24 लाख रुपयांचे सरकारी अनुदान वादाच्या भोवऱ्यात

RAJTANTRA MEDIA दि. 29: बोर्डी येथे येत्या 2 व 3 फेब्रुवारी होणाऱ्या चिकू फेस्टिव्हलसाठी आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त होणारे 25 लाख रुपयांचे अनुदान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इतके मोठे अनुदान प्राप्त झालेले असताना आयोजकांनी प्रत्येक स्टॉल साठी 5,900 ते 14,160 हजार रुपये आकारले. इतके भाडे स्थानिक लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे पहिली ठिणगी पडली व काही लोकांनी चिकू फेस्टिव्हलच्या बाहेरील जागेवर स्टॉल ... Read More »

विनापरवाना औषधांची विक्री, बोईसरमध्ये 1 लाखांचा साठा जप्त

>> नशेसाठी होत होती औषधाची विक्री? वार्ताहर/बोईसर, दि. 29 : येथील मंगलम बिल्डींगमध्ये विनापरवाना औषधाची विक्री होत असलेल्या एका फ्लॅटवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारुन 1 लाख 15 हजार रुपयांचा साठा जप्त केला असुन नशेसाठी या औषधाची विक्री होत असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. बोईसर रेल्वे स्टेशनजवळील मंगलम इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये नशा होेणार्‍या एका औषधाची विक्री होत असल्याची गुप्त बातमी ... Read More »

लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताचा आदर आणि अल्पमताची कदर करणे आवश्यक! -संजीव जोशी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/दि. 26 : लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताचा आदर करण्याबरोबरच अल्पमताची देखील कदर करणे आवश्यक ठरते. भारतीय संविधान समजून घेतल्याशिवाय आपल्याला लोकशाही समजणार नाही. लोकशाही व्यवस्था समजून घेतल्यास तुमच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल आणि देशाला महासत्ता बनविण्याचे आव्हान तुम्ही पेलू शकाल, असा मंत्र दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी आज (29 जानेवारी) चिंचणी (डहाणू) येथील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयात बोलताना ... Read More »

साहेब येणार असल्याने गेटला टाळे लावले; रुग्णाचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 28 : स्वच्छतेचा दिखाऊपणा करण्यासाठी कर्मचार्‍याने लढवलेली शक्कल एका रुग्णाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना वाडा ग्रामीण रुग्णालयात घडली असुन वेळेवर उपचार न मिळाल्याने रोहिदास मानमुळ या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा उपचाराची अत्याधुनिक मशीन लावण्यात आली असुन या मशीनच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातून व मुंबईहुन तज्ञ येणार असल्याने त्यांच्यासमोर स्वच्छतेचा दिखाऊपणा करण्यासाठी अंतर ... Read More »

दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले उच्च न्यायालयाचे कामकाज

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांच्या पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालय येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 120 विद्यार्थांसह महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अ‍ॅड. दिशा तिवारी, अ‍ॅड. उत्कर्षा जुन्नरकर, अ‍ॅड. राधा मल्होत्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान उच्च न्यायालयाचे वास्तू संग्रहालय व कोर्टापूढे ... Read More »

बोईसरमध्ये चार दिवसीय कलाक्रीडा महोत्सव संपन्न!

>> डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाने पटकावला प्रतिष्ठेचा डॉ. स. दा. वर्तक स्मृतीचषक वार्ताहर/बोईसर, दि. 28 : महाराष्ट्र स्पोर्टस् एज्युकेशन अ‍ॅकॅडमी, तारापूर मार्फत आयोजित चार दिवसीय कलाक्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाने सर्वाधिक पारितोषिके पटकावत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्‍या डॉ. स. दा. वर्तक स्मृतीचषकावरही आपले नाव कोरले. 24 ते 27 जानेवारी अशा चार दिवसाच्या कालावधीत खोदाराम ... Read More »

डहाणू तालुक्यात आणखी दोन भूकंपमापन यंत्र बसविले

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वारंवार घडणार्‍या भूकंपाच्या घटनांची दखल घेऊन भारतीय हवामानशास्त्र विभागाने तालुक्यात नव्याने दोन भूकंपमापन यंत्र (सेस्मोमीटर) बसविले आहे. यामुळे भूकंपाचा तपशील जलद गतीने व अधिक अचूकतेने मिळण्यात मदत होणार असून तालुक्यात एकंदर तीन भूकंपमापन यंत्र कार्यरत झाली आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागात नोव्हेंबर 2018 पासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत असून आतापर्यंत ... Read More »

पालघर येथे विद्यार्थी-प्रशासन परिसंवाद संपन्न 

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 26:  आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख यांच्यात परिसंवाद घडवून आणण्यात आला. या परिसंवादात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात त्यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच सर्व विभागांचे ... Read More »

जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेन्डीग मशीन  

  राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. २७ :  जिल्हा परिषद पालघर कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत प्रजासत्ताक दिनी सॅनिटरी व्हेन्डीग मशीन व इन्सिनेटरचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती धनश्री चौधरी व समाजकल्याण सभापती दर्शना दुमाडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलिस अधिक्षक गौरव ... Read More »

Scroll To Top