दिनांक 10 December 2018 वेळ 11:24 PM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 30)

Blog Archives

कुडूस ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी डाॅ गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड. 

IMG-20180719-WA0012

प्रतिनिधी           कुडूस, दि. १९ : वाडा तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डाॅ. गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर प्रथम उप सरपंच म्हणून अंजुमन सुसे यांची निवड करण्यात आली होती. तर त्याच वेळी दोन वर्षाच्या कालावधीनंतर हे पद डाॅ. गिरीश चौधरी यांना द्यावे असे ठरल्याने, सुसे यांनी स्वखुशीने या पदाचा ... Read More »

मोखाड्यात शाळेची ईमारत कोसळली ४७ विद्यार्थी बचावले शिक्षण विभागाची अनास्था, जि.पचा भोंगळ कारभार

IMG-20180718-WA0009

प्रतिनिधी             मोखाडा. दि. १९ : तालुक्यातील शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंगळवारी मुसळधार पावसामूळे कोसळल्या आहेत.सुदैवाने रात्री उशिरा हि घटना घडल्याने ४७ विद्यार्थी बचावले आहेत. सद्यस्थितीत एका समाजमंदिरात विद्यार्थ्यांची तात्पूर्ती शिक्षणाची व्यवस्था करण्यांत आलेली आहे.या घटनेमुळे .जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.             ... Read More »

ग्रामपंचायत शेल्टे व टर्नकी कंपनीतर्फे वृक्षारोपण

IMG-20180719-WA0038

राजतंत्र न्युज नेटवर्क               वाडा, दि. १९: तालुक्यातील ग्रामपंचायत शेल्टे व ए.एन.जे टर्नकी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेल्टे ग्रामपंचायत हद्दीमध्ये व कंपनीच्या आवारात ग्रामस्थांच्या श्रमदानाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत ७०० झाडे व कंपनीकडून १००० झाडे उपलब्ध करून देण्यात आली.               शेल्टे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ... Read More »

दशरथ पाटील यांचे निधन

DASHRAT PATIL

प्रतिनिधी वाडा, दि. 18 : तालुक्यातील देवघर येथील रहिवासी असलेले व सध्या वाडा येथे राहत असलेले महसूल विभागात पुरवठा अधिकारी म्हणून निवृत्त झालेले दशरथ पाटील (वय 68) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. Share ... Read More »

शुक्रवारी शिवसेनेचे भिख मांगो आंदोलन

LOGO-4-Online

वार्ताहर             बोईसर, दि. १८ : येथील बोईसर स्टेशन ते चित्रालय रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच शहरातील इतर पूल, रहदारी, रस्ते अतिक्रमण आदी प्रश्‍नांवर शिवसेनेतर्फे येत्या शुक्रवारी रस्त्यावर उतरून भिख मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.            बोईसर एसटी डेपोपासून चित्रालयपर्यंतचा रस्ता खड्ड्याने भरला असून रस्त्याची चाळण झाली आहे. याचा त्रास नागरिकांना सहन ... Read More »

पालघर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा! मनसे कार्यकर्त्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

MANASE-OLA DUSHKAL MAGNI

वार्ताहर             बोईसर, दि. १८ : पालघर जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीच्या पार्शवभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर मनसेचे पालघर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.             मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात ... Read More »

बोईसरमधील वसुंधरा कंपनीसमोर राजू शेट्टी यांचा पहारा

DAHANU SHETKARI AANDOLAN-BOISAR

वार्ताहर             गुजरातमधुन दुधाची आयात करणार्‍या बोईसर एमआयडीसीमधील वसुंधरा या अमुल कंपनीच्या प्लांटला खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी भेट देत दूध उत्पादकांचे आंदोलन संपेपर्यंत गुजरातमधुन दुधाची आयात थांबवा, अशी विनंती कंपनी प्रशासनाला केली होती. मात्र कंपनीत रात्रीच्या वेळेस दुधाचे टँकर भरून जात असल्याचे काळताच राजू शेट्टी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून आहेत. Share on: WhatsApp Read More »

अपघातानंतर बांधकाम विभागाने आली जाग भिवंडी-वाडा रस्त्याचे डागडुजीचे काम अखेर सुरु

WADA BHIVANDI MARG

प्रतिनिधी               वाडा दि.१८ : भिवंडी-वाडा महामार्गावर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. तालुक्यातील खुपरी जवळील सनाल्को कंपनीजवळ मोठा खड्डा पडल्याने तेथे प्रचंड पाणीसाठा असून हा वळणाचा रस्ता असल्याने गेल्या महिनाभरात असंख्य अपघात झाले. यात काही निरपराध अपघातग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला, तर काही अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. अखेर अनेक अपघात घडल्यानंतर ... Read More »

डहाणूत शेतकरी संघटनेचे रेल रोको आंदोलन

DAHANU SHETKARI AANDOLAN1

सरकार शेतकर्‍यांच्या आंदोलनापुढे झुकली! -खासदार राजू शेट्टी शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 18 : महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकर्‍यांनी मागील दोन दिवसांपासून दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. बाजारात दुधाचा पुरवठा होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांतर्फे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने चालू आहेत. त्यातच काल, मंगळवारी गुजरातहून रेल्वेमार्गे मुंबईला दुधाचा पुरवठा करण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिल्याने याविरोधात ... Read More »

ऐनशेत गावाला समृद्ध ग्राम पुरस्कार

ENSHET SAMRUDDH GRAM

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावलौकिक असलेल्या ऐनशेत गावाला समृद्ध कोकण संस्थेच्या वतीने समृद्ध ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. समृद्ध कोकण संस्थेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. 16) मुंबईतील दादर येथील वीर सावरकर सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणातील पाच जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये कृषी, पर्यटन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गावांचा गौरव करण्यात आला. ... Read More »

Scroll To Top