दिनांक 23 October 2018 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 20)

Blog Archives

बोईसर, उमरोली येथे आषाढी एकादशी उत्साहात

BOISAR AASHADI1

वार्ताहर          बोईसर, दि. 23 : येथील सेवा आश्रम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच उमरोळी येथील ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणूक काढून व सामाजिक संदेश देत देवशयनी आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा साकारत तसेच विद्यार्थीनींनी डोक्यावर तुळशी घेऊन मिरवणूकीला वारकरी पंथाच्या वारीची शोभा आणली. या मिरवणूकींमधील विठूमाईच्या गजराने बोईसर व उमरोळी परिसर दुमदुमून गेला ... Read More »

पोलीस भरतीच्या अमिषाने फसवणूक :

LOGO-4-Online

जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचार्‍याला अटक राजतंत्र मिडिया/दि. 23 : भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रातील उमेदवारांना पालघर जिल्हा पोलीस दलात भरतीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणार्‍या पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. तर यात त्याला मदत करणार्‍या अन्य एका आरोपीचा शोध पोलीसांकडून घेण्यात येत आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पोलीस कर्मचार्‍याने लातूर येथे सुरु असलेल्या ... Read More »

डहाणूच्या समुद्र किनारी शेकडो किलो प्लास्टिकचा कचरा

छायाचित्र : सुशिल बागुल

राजतंत्र मीडिया /दि. 22 : काही दिवसांपुर्वीच राज्य शासनातर्फे प्लास्टिक व थर्माकॉलवर बंदी घालण्यात आली. या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला तर अनेकांनी नाराजी दर्शवली. मात्र मागील काही दिवसांत समुद्राला आलेल्या उधाणातून समुद्राच्या पोटात जमा झालेला लाखो टन कचरा राज्याच्या विविध समुद्र किनार्‍यावर फेकला गेला असुन यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्यांचा समावेश आहे. डहाणू समुद्र किनार्‍यावरही हीच परिस्थिती असुन 19 जुलै ... Read More »

जव्हार : मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र अचानक बंद

JAWHAR MUKT VIDYAPITH

>> शेकडो विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान, >>अभ्यास केंद्र सुरु करण्याची जव्हारकरांची मागणी मनोज कामडी/जव्हार, दि. 22 : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जव्हार महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र अचानक बंद केल्याने या केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तालुक्यात केवळ एकच कनिष्ठ महाविद्यालय असल्याने येथील विद्यार्थ्यांना आता तलासरी किंवा पालघर केंद्रात प्रवेश घ्यावा लागणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ... Read More »

पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस

PALGHAR PAUS

राजतंत्र मिडिया, दि. 22 : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि तलासरी या 3 तालुक्यांमध्ये चालू वर्षी सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. तर अन्य सर्वच तालुक्यांनी सरासरी केव्हाच ओलांडली आहे. आजपर्यंत सर्व तालुक्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसामध्ये दरवर्षीचे सरासरी पर्जन्यमान दर्शवले आहे. 1) पालघर – 201 सेमी (95 सेमी) 212 टक्के. 2) डहाणू – 195 सेमी (97 सेमी) 201 टक्के. 3) ... Read More »

पालघर पोलीसांची अवैध दारु धंद्यांवर कारवाई

DARU Main

97 हजाराची दारु जप्त, 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल राजतंत्र मीडिया/दि. 26 : पालघर जिल्हा पोलीसांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यांवर कारवाई करत एकुण 96 हजार 805 रुपये किंमतीची दारु जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अर्नाळा, जव्हार, कासा, केळवा, बोईसर, पालघर, मनोर, सफाळा, तारापुर, सातपाटी, विक्रमगड, वालीव, घोलवड, तलासरी, तुळींज, वाणगांव आदी ... Read More »

मनोरमध्ये रानभाजी महोत्सव संपन्न!

MANOR RANBHAJI

प्रदर्शनात 65 प्रकारच्या रानभाज्या, फळे आणि औषधी वनस्पतींचा समावेश नावीद शेख/मनोर, दि. 21 : आदिवासी एकता मित्र मंडळामार्फत मनोरच्या शंकर मंदिर सभागृहामध्ये शनिवारी (दि.21) रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 65 प्रकारच्या रानभाज्या, रान फळे आणि औषधी वनस्पती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल आहे. येथील आदिवासी समाजाची वस्ती जंगल, डोंगर, दर्‍या-खोर्‍या§मध्ये आहे. पावसाळ्यात या जंगलात ... Read More »

तिळसे येथील नदीत तरूण बुडाला, दोन दिवसानंतर मृतदेह सापडला

IMG-20180719-WA0101

प्रतिनिधी             वाडा, दि. १९ : तालुक्यातील तिळसे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डागडुजीच्या कामासाठी आलेला श्रवण चौहान (२०) हा तरुण कामगार हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून नदी प्रवाहात पडून बुडाल्याची घटना बुधवारी ( दि. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला घडली असून वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवान व येथील ग्रामस्थानच्या साहाय्याने दोन दिवसानंतर ... Read More »

बोईसरमधील विविध समस्याविरोधात शिवसेनेचे भिकमागो आंदोलन

IMG20180720114308 (1)

वार्ताहर           बोईसर , दि. २० : येथील रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच इतर नागरी समस्यांविरोधात आज शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत भिख मागो आंदोलन केले. यावेळी सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बोईसर- चित्रालाय रस्त्यावरील सिडको भागात २ तास रास्ता रोको केला. परिसरातील महिला व आबालवृद्द भरपावसात या आंदोलनात सहभागी झाले होते.          बोईसर शहरातील मुख्य रस्त्यांसह ... Read More »

जव्हार शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे.

IMG20180720151121

प्रतिनिधी             जव्हार, दि. २० : नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवर ठिक-ठिकाणी मोठ मोठाले खड्डेच खड्डे पडले असून, जव्हार शहरातील रस्त्यांवर खड्डे कि खड्यात जव्हार अशी दैनिय स्थिती झाली आहे. पावसाळा सुरु झाला कि जव्हार शहरातील रस्त्यांची दरवर्षी हीच परिस्थितीअसते व त्याविरोधात . आवाज उठविल्यानंतरच कशीबशी डागडुगी करून खड्डे बुजविले जातात. मात्र दरवर्षी परिस्थिती जैसे थे होते. ... Read More »

Scroll To Top