दिनांक 23 June 2018 वेळ 3:21 PM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra (page 2)

Blog Archives

कोकणातील मतदारांना सर्वच राजकीय पक्षांनी फसवले, सुवर्णाताई पाटील यांची टीका ;

IMG-20180620-WA0074

  राजतंत्र न्यु नेटवर्क                वाडा, दि. २० :  पदवीधर मतदारसंघातून आजवर ज्या- ज्या  राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व केले त्या सर्वच राजकीय पक्षांनी कोकणातील पदवीधर मतदारांना  फसल्याची टीका  पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुवर्णाताई पाटील यांनी वाड्यात  केली. त्या प्रचाराच्या निमित्ताने वाड्यात आल्या असताना त्यांनी येथील विविध शाळांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला असता त्यांनी ... Read More »

आपल्या आवडीचे क्ष्रेत्र निवडा आणि कामाचा आनंद मिळवा! सौ. धनश्री सिंघे यांचा पोलीस मेळाव्यात सल्ला

IMG20180620130820

वैदेही वाढाण             पालघर, दि, २० : मुलांनी आपल्या आवडीचे क्ष्रेत्र निवडून कामाचा आनंद मिळवला पाहिजे. कोणीतरी सांगते म्हणून कोणतेही क्षेत्र निवडू नये असा सल्ला जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मंजुनाथ सिंगे यांच्या पत्नी सौ. मेघश्री मंजुनाथ सिंघे यांनी पोलिसांच्या मुलांना दिला. जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या १० वी व १२ वीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या मुलांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ... Read More »

वाडा येथील पोलीस निरीक्षकांच्या विरोधात श्रमजीवी संघटनेचा मोर्चाचा इशारा

LOGO-4-Online

प्रतिनिधी            वाडा, दि. २० : वाडा  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे  यांच्याविरोधात  काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी  पालघरच्या  पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली असतानाच आता श्रमजीवी संघटना देखील मैदानात उतरली आहे.             तालुक्यातील विविध प्रकरणात शिंदे यान नि योग्य तपास करण्याऐवजी आरोपींनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला असून ... Read More »

किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरईत शिवणकाम प्रशिक्षण शिबिर

IMG-20180617-WA0015

प्रतिनिधी            मनोर, दि. १७ : किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वरई येथील शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचा उदघाटन कार्यक्रम दहिसरतर्फे मनोर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला.           ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत २५ महिलांना एक महिना मोफत ... Read More »

ज्ञानमाता आदिवासी आश्रम विद्यालयाचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

IMG-20180615-WA0053

प्रतिनिधी मनोर, दि, १९ : तलासरी तालुक्याच्या झरी येथील ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालयाचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.             यावेळी शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष तारपा नृत्य करत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शिक्षकांनी आदर्श परिपाठ दाखवत विद्यार्थ्यांना शाळा स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास आणि शाळा राबवत असलेले उपक्रम सांगितले. तसेच नवीन विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबत माहिती ... Read More »

वन्य व वन्यजीव संवर्धन संस्थेमार्फत भास्करगड येथे बिया रोपण कार्यक्रम .

IMG-20180619-WA0096

प्रतिनिधी  जव्हार दि, १९ : झाडं तोडल्यामूळं जंगल संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जव्हार  व मोखाडा  तालुक्यातील वन व वन्यजीव संवर्धन संस्था जव्हार व मोखाडा येथील निसर्ग मित्रांनी आंबा, बोर, फणस, काजू, शेवगा, सुबाभूळ, जांभूळ, रामफळ, इत्यादी  प्रजातींच्या बिया संकलित करून भास्करगड येथील डोंगरांवर या बियांची लागवड करत एक प्रेरणादायी उपक्रम राबविला.              जव्हार, मोखाडा, डहाणू, येथील तरुणांनी ... Read More »

डहाणूतून महिला बेपत्ता

IMG-20180619-WA0015

राजतंत्र न्युज नेटवर्क            डहाणू, दि. १९ : डहाणू पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजि. नं. ११/ २०१८ मधील मिसिंग नाव नैना कन्हैयालाल आढीया वय ४३ वर्षे, रा. डहाणू गाव युक्ती अपार्टमेंट, टागोर लॅन्ड, डहाणू गाव हि महिला दिनांक १६ जून २०१८ रोजी सायंकाळी ५.१० वाजता आजारपणाला कंटाळून घरातून कोणासही न सांगता निघून गेली आहे. तिचे वर्णन ... Read More »

केळवे समुद्र किनाऱ्यावर ४ मुले बुडाली

LOGO-4-Online

राजतंत्र न्यु नेटवर्क               पालघर, दि. १७ : पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द अश्या केळवे पर्यटनक्षेत्रात फिरण्यासाठी आलेल्या ४ पर्यटक युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ युवकांपैकी ४ जण बुडून मृत्युमुखी पडले असून उर्वरित ३ जण बचावली आहेत. हे सर्व जण नालासोपारा येथील रहिवासी असून २० वर्षाखालील आहेत. आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ... Read More »

मनोर परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी.

LOGO-4-Online

राजतंत्र न्युज नेटवर्क             मनोर, दि. १६ : मनोर परिसरात मुस्लिम लोकवस्ती असलेल्या टेन, दहिसर, सोनावे आणि काटाले येथे काल चंद्र दर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. यावेळी लहान मुलांनी रोझे पूर्ण केल्याने त्यांचे इदी देऊन कौतुक करण्यात आले.            मनोर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक मशिदी मध्ये सकाळी ... Read More »

महावितरणच्या मुख्य वाहिनीमध्ये बिघाड, जिल्ह्याचा रविवार अंधारात

LOGO-4-Online

प्रतिनिधी बोईसर, दि. १७ : शनिवारी पावसाच्या हलक्या सरींना झालेली सुरुवात महावितरणला झेपलेली नसून अर्धा पालघर जिल्हा शनिवारी रात्री अंधारात राहिला. रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे लोकांचा हिरमोड झाला.              शनिवारी पावसाच्या हलक्या सरी ने सुरवात झालेल्या  पहिल्या पावसातच  रात्री वीज पुरवठा खंडित  झाला. शनिवारी बोईसर शहरात संपूर्ण रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.     ... Read More »

Scroll To Top