दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » Author Archives: Rajtantra

Blog Archives

पालघर जिल्ह्यातील महसुली सझेंमध्ये वाढ

cropped-LOGO-4-Online.jpg

प्रतिनिधी पालघर, दि. 13 : राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेऊन राज्यात 3 हजार 165 नवीन वाढीव तलाठी सझे व 528 नवीन महसुली मंडळे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात 86 नवीन महसूल साझे व 50 नवीन मंडळ कार्यालये स्थापन होणार आहेत. जिल्ह्यात नव्याने निर्माण होणार्‍या 86 नव्या ... Read More »

गुंदले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनसेच्या नीलिमा पाटील यांची निवड

GUNDLE GRAMPANCHAYAT

वार्ताहर बोईसर, दि. 14 : मनसे व शिवसेना समोरासमोर आल्याने प्रतिष्ठेच्या झालेल्या गुंदले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत मनसेच्या उमेदवार नीलिमा पाटील यांनी शवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. या विजयानंतर मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष भावेश चुरी, उपजिल्हा अध्यक्ष अनंत दळवी, तालुका अध्यक्ष समीर मोरे, उपतालुका अध्यक्ष शिवाजी रेंबाळकर, चेतन संखे, विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष ... Read More »

बोईसर ग्रामपंचायतीच्या देणगी बँक खात्यात सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार?

BOISAR GRAMPANCHAYAT GAIRVYAVHAR

प्रतिनिधी पालघर, दि. 14 : तालुक्यातील औद्योगिकीकरणासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीने सन 2007 मध्ये पाणीपुरवठा लाइन सुधारणा या नावाने उघडलेले बँक खाते कालांतराने लुप्त झाल्याचे उघडकीस आले असून या अचानकपणे ग्रामपंचायत दफ्तरी व्यवहारातून गायब झालेल्या बँकेच्या खात्यामधून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या बँक खात्याचे ऑडिट झालेले नसून या खात्यातील व्यवहाराच्या नोंदीही कॅशबुकमध्ये ... Read More »

बोईसरच्या तरुणांची सेवाभावासह अनोखी शिर्डी पदयात्रा

BOISAR SHIRDI YATRA

प्रतिनिधी पालघर, दि. 14 : सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मनामध्ये ठेवून स्वच्छ, स्वस्थ, सुंदर भारत निर्मिती अभियानाचा प्रसार करण्यासाठी बोईसर येथील श्री साई मित्र मंडळाने बोईसर ते शिर्डी ही अडीचशे किलो मीटरची पदयात्रा तीन दिवसात पूर्ण केली. या पदयात्रे दरम्यान सामाजिक संदेश देण्यासोबत गरीब गरजूंना समाजोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. बोईसर येथील संजय शेट्टी, बापू गावड, रुपेश ... Read More »

डहाणू : सर्व पक्षांचा प्रचार टिपेला पोहोचला! भाजपने भव्य रॅलीद्वारे केले शक्तीप्रदर्शन

WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1

डहाणू नगरपरिषदेची निवडणूक 4 दिवस लांबणीवर पडल्यामुळे शिथील झालेला सर्वच पक्षांचा प्रचार आता टिपेला पोहोचला आहे. इतके दिवस घरोघर जाऊन प्रचार केला जात होता. भाजप, शिवसेना, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष नहार यांनी एलसीडी व्हॅनवरुन व्हिडीओ प्रक्षेपीत करुन हायटेक प्रचाराकडे कल ठेवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने घरोघरी प्रचारावर अधिक भर दिलेला आहे. या निवडणूकीत कुठल्याच पक्षाच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात भाग ... Read More »

विक्रमगड येथे कुणबी युवा परिषद, विविध जिल्ह्यातील कुणबी युवक घेणार सहभाग

LOGO 4 Online

प्रतिनिधी विक्रमगड, दि. 14 : कुणबी समजोन्नती संघ सलग्न कुणबी युवा मुंबई तर्फे विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथे 16 व 17 डिसेंबर दरम्यान कुणबी युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कुणबी समाजातील ज्वलंत प्रश्‍नांना वाचा फोडणे, घटनात्मक अधिकारांची जागृती, ओबीसी आरक्षण, कुणबी युवा शक्तीचे सशक्तिकरण तसेच पेसा कायद्याचा कुणबी समाजातील शिक्षित तरुणाईवर झालेला दुरोगामी परिणाम, लोकभाषा-संस्कृतीचे जतन, आदी विषयांवर चर्चासत्रांचे या ... Read More »

जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी सैनिक दरबार आयोजित करणार -डॉ. प्रशांत नारनवरे

MAJI SAINIK-NARNAVRE

पालघर दि. 14 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी कार्यक्रमास आपण जसे एकत्र येतो तसेच जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटूंबाच्या काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी आपण जिल्ह्यात दर तीन महिन्याला सैनिक दरबार आयोजित करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात डॉ. नारनवरे बोलत होते. ... Read More »

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला

WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1

शिरीष कोकिळ दि. 13 : डहाणू नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी मैदानात उतरलेल्या नगराध्यक्षपदासाठीच्या 7 व नगरसेवकपदांसाठीच्या 110 उमेदवारांनी प्रचारास सुरवात केली असून आता प्रचाराचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांच्या दृष्टीने ही निवडणूक अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण करणारी ठरणार आहे. काही उमेदवारांच्या अर्जामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांना न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख 13 डिसेंबर ऐवजी 17 डिसेंबर ... Read More »

पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्थेच्या कणसरी दिनदर्शिका 2018 चा प्रकाशन सोहळा संपन्न

DINDARSHIKA SOHLA

प्रतिनिधी : जव्हार, दि. 13 : पालघर जिल्हा आदिवासी सेवा संस्था यांच्या वतीने कणसरी दिनदर्शिका 2018 चा प्रकाशन सोहळा आज येथील स्नेहांकित पेन्शनर भवनात सजन नंदू खुताडे गुरुजी यांच्या हस्ते पार पडला. या दिनदर्शिकेमध्ये आदिवासी साहित्य, आदिवासी सण, विविध शासकीय योजना, पेसा कायदा माहिती तसेच विविध आदिवासी नृत्यांविषयी माहिती, आदिवासी कुल देवतेची माहिती व सर्व शासकीय सुट्ट्यांचा उल्लेख केलेला आहे. ही ... Read More »

डॉ. अमित नहार यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे, तक्रार सैनिकांचा वापर प्रचारात करण्याला आक्षेप!

3 Amit Nahar (1Colmn)

डहाणू नगरपरिषदेच्या 17 डिसेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपला रामराम करुन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार डॉ. अमित नहार यांनी आचारसंहीतेचा भंग केल्याची तक्रार एका नागरिकाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे केली आहे. या तक्रारी अर्जामध्ये दोन आक्षेप आहेत. डॉ. अमित नहार यांनी आपल्या जाहिरनाम्यामध्ये सैनिकांचे फोटो छापल्याने आचारसंहीतेचा भंग झाल्याचा एक आक्षेप तर दुसरा आक्षेप म्हणजे दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव ... Read More »

Scroll To Top